चालू घडामोडींचे विश्लेषण
आर्थिक मंदीचा छोटासा आढावा . . . . !
आर्थिक मंदी . . . !
आज संबंध देशातील प्रत्येक उद्योगधंद्यामधून रोज आर्थिक मंदीची बातमी येत आहे ....मंदीमुळे इतके कामगार काढले , अमुक तमूक उद्योगपतीचे दिवाळे निघाले . . या कंपनीचे शेअर गडगडले , त्या कंपनीला टाळे लागले.
पण हे घडतय का ? नेमका प्रॉब्लेम काय?
इतके तज्ज्ञ असताना , भारताची अर्थव्यवस्था मजबूत असताना हे का घडतंय?
या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न, उत्पादीत मालाला उठाव नसणे व बाजारपेठेत मागणी घटने म्हणजे मंदीची सुरूवात होणे पण मागणी अचानक घटत नाही . . . *लोकांची खरेदी क्षमता हळूहळू कमी होत जाते किंवा याचाच दुसरा अर्थ लोकांचे उत्पन्न नैसर्गिक आपत्ती , सरकारी धोरणे , देशातील परकीय गुंतवणूक काढून घेतली जाणे , लोकांच्या हाताला काम नसने , नवीन रोजगाराची संधी कमी होत जाणे , परदेशात आपल्या मालाची निर्यात कमी होणे , जागतिक स्पर्धेत आपला निभाव न लागणे , वाढती लोकसंख्या , स्पर्धेत टिकू न शकल्याने लघू व कुटीर उद्योगधंदे बंद पडणे व शेतातील तोट्यामुळे ग्रामीण भागात पैसा नसणे , याचा परिणाम म्हणून, ऐकून लोकसंख्ये पैकी ८० लोकांचे विविध कारणांनी उत्पन्न व क्रयशक्ती घटली की , लोक (जनता) मार्केट (बाजारपेठत) मध्ये कमीतकमी खर्च करायला सुरूवात करतात, नवीन गाड्या , नवीन कार व लोकांकडून छोटीमोठी वहाणे खरेदी बंद केली जाते , नवीन घर बांधनी, नवीन गुंतवणूक, लोक नवीन खरेदी हे प्लॅन पुढे ढकलतात, कारण त्यांना भविष्यात खिशात पैसा येईल कि नाही याची काळजी व चिंता लागून राहिलेली असते , त्यामुळे सहाजिकच लोकांच्या खिशात भांडवल कमी होत गेले तर त्याचा फटका व्यापार औद्योगिक क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्राला प्रथमता बसत असतो .
बसणारा फटका कधीकधी पतधोरण, जागतिक उत्पन्न व जागतिक डिमांड यावरही अवलंबून असतो . .
व्यवसायातील मंदी हटायची असेल तर देशातील शेतीसह सर्वच उत्पादीत मालाची निर्यात होणे व रोजगार निर्माण होणेही तितकेच गरजेचे असते . .
त्यासाठी सरकारला उचित पावले उचलून शेती व उद्योगधंदे यांना काही सवलती व अनुदानेही देऊन हातभार लावावा लागतो . . त्यातून संबंधित वर्गाची शक्ति वाढली की रोजगार निर्मिती होते , रोजगार निर्मिती झाली की, लोकांच्या हातात पैसा खेळतो व तोच पैसा परत मार्केटमध्ये उपलब्ध होऊन, उद्योगधंदे व व्यापार पूर्ववत सुरू होतात. . .
पण त्यासाठी आपली निर्यात वाढून, आपल्याकडे परकीय गंगाजळी वाढली पाहिजे . .
मंदी हाटवत असताना थोडीफार महागाई वाढण्याचीही शक्यता असते . . .
मंदी हटवण्याचा आपल्या देशासाठी तरी सर्वात चांगला उपाय म्हणजे जास्तीत जास्त शेतात गुंतवणूक वाढून, शेतातून रोजगार निर्माण करणे , लघू व कुटीर उद्योगातून युवक व युवतींच्या हाताला काम देणे व सामान्य लोकांच्या हातात पैसा कसा जाईल याचा विचार करणे होय!
तरच मंदी हटू शकते
विजय पिसाळ नातेपुते . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा