चालू घडामोडींचे विश्लेषण
प्रती . . .
आदरणीय, मा. श्री . राजसाहेब ठाकरे . . . . .
विषय. .
प्रखर राष्ट्रवाद व हिंदुत्वाची कणखर भूमिका घेणे बाबत. . . .
महोदय. . . . . .
कारणे विनंती पत्रास कारण की ,
आपण राजकारणातील अभ्यासू व व्हीजन असलेले नेतृत्व आहात. तुमच्या कडे आम्ही आदरणीय बाळासाहेब यांच्या नजरेतूनच पाहतो. तुमचे वक्तृत्व, कर्तृत्व आणि लोकांप्रति तुमची असलेली बांधिलकी क्षणोक्षणी जाणवते . विकासाठी असणारी तुमची तळमळ सातत्याने दिसून येते . . .
तुमचे सर्व पक्षात चांगले मित्र आहेत व संबंध आहेत या बद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. . .
पण
मुळातच तुमची संपुर्ण जडणघडण ही बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली व हिंदुत्ववादी विचारसरणीत झाली आहे . . तुमचा संपुर्ण चाहतावर्ग व मतदारही हिंदुत्वाला मानणारा आहे.
पण सध्या तुम्ही हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विचारसरणी कडे झुकू लागल्याने तुमचा चाहता वर्ग अस्वस्थ होत असून तो हळुहळू घटत आहे . खरेतर तुमच्यावर आजही लाखो हिंदू व मराठी जनता व जुने शिवसैनिक मनापासून प्रेम करतात. पण तुम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसला पुरक भूमिका घेतल्याने तुमचे हक्काचे असंख्य लोक तुमच्यापासून दुर जात आहेत. . .
मुळातच तुमचा पिंड कडवट हिंदुत्ववादी व सच्चा राष्ट्रप्रेमी असाच आहे ..प्रथम तुम्ही हिंदुत्वादी असल्याने , भाषावाद , प्रांतवाद हे प्रादेशिक व हिंदू -हिंदू मध्ये एकमेकात फुट पाडणारे मुद्दे सोडून, प्रखर राष्ट्रवाद आणि कट्टर हिंदुत्ववादी विचार घेऊनच मैदानात उभे ठाकले पाहिजे . . .
समान नागरी कायदा . .
यासाठी तुम्ही कठोर भूमिका घेतली पाहिजे .
देशद्रोही व पाकिस्तान धार्जिण्या विरूद्ध तुमचा आवाज घुमला पाहिजे व सर्व हिंदू एक व्हावेत यासाठी तुमचे योगदान असायला पाहिजे ही तमाम भारत देशातील लोकांची इच्छा आहे . कारण भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी व बेगडी आहे . .
त्यासाठीच आदरणीय राज ठाकरे साहेब येणार्या निवडणूका तुम्ही राष्ट्रवाद व हिंदुत्व याच मुद्यावर लढवल्या पाहिजेत. .
महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण देशाला व हिंदू समाजाला तुमची गरज आहे .
शिवसेनेच्या विरुद्ध जास्त उमेदवार उभे न करता , भाजपारुपी ढोंगी हिंदुत्व धारण करून सत्ता गिळंकृत करणार्या अजगराच्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरूद्धच तुम्ही लढले पाहिजे . . . म्हणजे शिवसैनिक सुद्धा जिथे शिवसेनाचा उमेदवार नाही तिथे तुम्हाला साथ देईल. .
मुळातच तुम्हाला संपुर्ण हिंदूचा पाठिंबा आहे व यापुढेही राहिल फक्त काँग्रेसच्या सुरात सुर मिळवला तर मात्र तुमचा मतदार हा भाजपाकडे जाणार तसेच तुम्हाला काँग्रेस व राष्ट्रवादीचा मतदारही कधीच मतदान करणार नाही . . .
परिणामी निवडणूकीत यश कमी मिळेल. . .
आंध्र प्रदेशात ज्या पद्धतीने वाय एस आर काँग्रेस स्वतःच्या ताकदीने पुढे आली त्या प्रमाणेच मनसे पुढे येऊ शकते . . .
फक्त हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवाद आणि समान नागरी कायदा या जोरावर. .
मुळात तुमचा करिश्मा जबरदस्त आहे व तो कधीच कमी होणार नाही ,
तुम्हाला जर परत एकदा तुमचा जुना करिश्मा दाखवून द्यायचा असेल, सत्तेवर यायचे असेल तर कट्टर हिंदुत्वा शिवाय तरणोपाय नाही , भाषा वाद व प्रांतवाद शक्यतो करू नका सगळ्या देशातील, प्रत्येक राज्यातील हिंदू साठी काम करा असे जनतेचे मत आहे . .
देशद्रोही , गद्दारांना तुम्हीच धडा शिकवू शकता . . .
पवार साहेब, असोत कि, राहूल गांधी असोत यांच्या बद्दल आदर असला तरीदेखील त्यांची सेक्युलर विचारसरणी इथल्या जनतेला विशेषतः तरूणांना मान्य नाही . .
ते त्यांच्या जागी कसे का असेनात पण तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहात व तुम्हाला संपुर्ण हिंदू समाज मानतो म्हणून तुम्ही हिंदुत्व घेऊन लढाई लढली पाहिजे . . .
शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार शक्यतो जर कमी दिले व भाजपा विरूद्ध जास्तीत जास्त उमेदवार उभे केले तर सहाजिकच सगळे शिवसैनिक तुमचा छुपा प्रचार करतील व भाजपाच्या उमेदवारवाराला मतदान करण्या ऐवजी तुमच्या मागे येतील कारण तुम्हाला जनता बाळासाहेब म्हणून पहाते. .
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नादी लागू नका संपुर्ण महाराष्ट्रात तुम्ही जिंकाल अशा कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असणार्या मतदारसंघात ताकदीने उतरा व कडवट हिंदुत्व जपा हीच मनोमन इच्छा !
हिंदुत्वावाला विकासाची जोड द्या . . विकासाच्या बाबतीत तुम्ही जिथे जिथे काम केले तिथे तिथे विकास दिसून आला आहे .
महाराष्ट्रात शिवसेना कमी होऊन आपल्याला स्पेस मिळणार नाही तर भाजपा कमी होऊन आपल्याला स्पेस मिळेल असे मला वाटते . . .
एक राज्य शास्त्राचा अभ्यासक म्हणून मला जे वाटते ते तुम्हाला कळवावे वाटले ते कळवले तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा . . . .
विजय पिसाळ नातेपुते . .
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९