vijaypisal49. blogspot. com

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

माळीन गाव दुर्घटना झाली त्यावेळी लिहलेले

माझा लेख आपल्या सर्वांसाठी!
विजयकाका पिसाळ!

आपल्या महाराष्ट्राला संकटे काही नवीन नाहीत!
माळीन गाव असो कि सावित्री नदीवरील दुर्घटना असो,कोठ्यावधी रुपये खर्चून वाहुन गेलेला गोदावरी पार्क असो
अशा घटना आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पहात राहतो हळहळ व्यक्त  करतो सरकार कोणतही   असो त्यावर टीकात्मक  बोलत राहतो!
पण संबंधीत विभागाला  चुकीच्या गोष्टी लक्षात आणून देत नाही!
नदी नाले यातील अतिक्रमणे रोखत नाही
वृक्ष तोड थांबवत नाही
पोखरले जाणारे डोंगर आणि नदी पात्रातील बेसुमार वाळूतस्करी रोखत नाही
अनियंत्रित प्लॅस्टिकचा वापर थांबवत नाही!
अशा असंख्य गोष्टी आपल्या पासुन सुरु होतात आणि आपल्या हातून काहीही न करता नेहेमीच आपण सरकारी यंत्रणा आणि सरकारला दोष देत असतो!
पर्यावरणाच्या बाबतीत जर आपण गंभीर झालो निसर्गाचे नुकसान टाळले तर सगळ्या समाजातील लोकांनी दक्षता घेतली तर कदाचित संकटे येणार नाहीत किंवा संकटांचा मुकाबला तरी व्यवस्थित  करता येईल पण संपुर्ण समाज आज निद्रिस्त झालेला पाहतो आपण!
राजकीय आखाडा आसला कि हजारो लोकांना वेळ असतो पण समाजासाठी काही ठोस कार्यक्रम आखायचा असेल तेंव्हा सगळेच नॉट रिचेबल असतात
नेत्याचे वाढदिवस किंवा एखाद्या कार्यक्रमात डी जे च्या तालावर नाचण्यासाठी एकत्रित येणारी तरुणाई सामाजिक कामा बाबतीत एकत्रित यायला हवी!पण हे घडत नाही!
विघातक कामा ऐवजी विधायक कामासाठी सर्वांनीच देशवासी म्हणुन राजकारण जात पात पक्ष विरहीत काम करायला शिकले पाहिजे!
आपले आदर्श हे आमटे  कुटुंब,राणी व विजय बंग,नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे सिंधूताई सपकाळ हे असले पाहिजेत
पैशासाठी काम करणारे नेते अभिनेते व खेळाडू हे आदर्श असावेत का?
जे समाजासाठी तळमळीने काम करतात आणि कायम लोकांचा विचार करतात किंवा आपल्या कमाईतून काही हीस्सा सामाजिक कामासाठी वापरतात त्यांना आदर्श मानायला हरकत नसावी
अपवादात्मक परस्थितीत नेत्यांच्या कलाकारांच्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्यसभेची किंवा विधान परिषदेची खासदारकी आमदारकी द्यायला हवी पण ९०च्या दशकापासून राजकीय पुनर्रवसन किंवा काही ठराविक लोकांना खूष करण्यासाठी किंवा उपद्रवमुल्य कमी करण्यासाठी वरिष्ठ सभागृत सदस्य पाठवले जातात याला कोणताही पक्ष अपवाद राहीलेला नाही!
आता सगळ्यांनी जागृत होण्याची गरज आहे
आज आपल्या पासुन हाकेच्या अंतरावर असणारी संकटे उद्या कदाचित आपल्या गावावर आणि घरापर्यंत  येऊ शकतात!
समाजासाठी देशासाठी वेळ देणारी संस्कारक्षम युवक मंडळी पुढे यायला हवीत
वैयक्तीक हेवेदावे आणि भेदभाव समाजासाठी  आणि देशासाठी घातक आहेत
येणार्या संकटापासुन सावध रहायला शिकले पाहिजे
तरच आपण पुढच्या पिढीला काहीतरी चांगले देवु!
विजयकाका पिसाळ नातेपुते

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

मराठा समाज आतातरी जागृत होणार आहे का ?

माझी पोस्ट कुणाच्याही विरूद्ध नाही , कुणावर राग नाही फक्त पहावत नाही म्हणून लिहावे लागते !
पटले तर बघा नाहीतर सोडून द्या !
राग आला तर माफ करा पण वाचा . . . .
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

मराठा समाज आतातरी जागृत होणार आहे का ?

विविध पक्षांच्या पालख्या खांद्यावर घेऊन नाचल्यामुळे , आज मराठा सगळीकडे विखुरला गेला आहे .  एकगठ्ठा मतदान होत नसल्याने कोणताही राजकीय पक्ष मराठ्यांना सध्या गांभीर्याने घेत नाही असेच म्हणावे लागते , त्यामुळेच  मराठ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले जात नाहीत, सगळे प्रश्न व समस्या जैसे थे  आहेत , शेती बरीच निसर्गावर, समजा निसर्गाने साथ दिली थोडंफार पिकलंच  तर मुद्दाम बाजाभाव पाडण्याचे सरकारी   षडयंत्र  ,  शिक्षणातील मागालेपण, महागडे शिक्षण घेण्याची संपलेली ऐपत व विविध षडयंत्र रचून मराठा युवकांना कुणी हिंदुत्वाच्या , कुणी बहुजन वादाच्या तर कुणी  राजकारणासाठी विविध व्यसनांच्या नादी लावून माती भडकवून विविध ठिकाणी वापर करून घेत आहेत, हाताला काम नसलेले काही युवक सहाजिकच कोणतीतरी संघडना जॉईन करतो मग, कधी मुस्लिम तर कधी दलित तर कधी ओबीसींना नावे ठेवत बसतो पण ज्यांना आपण नावे ठेवतोय त्यांनी नोकरी , शिक्षण, शेती, उद्योगधंदा यात केलेली प्रगती मात्र पहात नाही ,   सर्वच मोठ्या  राजकीय पक्षांनी मराठा समाजातील प्रस्थापित  नेत्यांना बरोबर काहीतरी पदे  देवून पोटापाण्याची सोय केली आहे व त्या बहुतेक  नेत्यांनी काही मोजकेच कार्यकर्ते सांभाळून आपआपल्या बुरूजांची डागडुजी केली आहे ,
महाराष्ट्रात ३२ ते ३६  %पेक्षा जास्त असलेला समाज प्रमुख चार पक्षांत कमीजास्त ८ ते, ९ टक्केवारीने विभागला आहे ! बाकीच्या शेकडो संघटनांची पताका खांद्यावर आहेच! त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्ष उमेदवारी मराठा समाजाला देतात पण बॉस होऊ देत नाहीत, ताटाखालचे मांजर बनवतात व तेही काहीतरी  पदरात पडते यावर समाधान मानतात!

आता राहिलेला जो इतर समाज ज्या पक्षांच्या   पाठिमागे उभे  राहतात  त्यांचेच उमेदवार विजयी होतात  !
हे गणित सर्वच  पक्षांनी बरोबर ओळखले आहे त्यामुृळे , मराठा समाजाचे मोर्चे प्रचंड मोठे होतात मात्र, मोर्च्याला एकत्र आलेला समाज मतदान करताना मात्र, आपल्या सोयीनुसार व आपल्या नात्यागुत्या नुसार, आपल्या संबंधा नुसार   आपआपल्या नेत्यांना मतदान  करत आसतो,  त्याचा परिणाम असा होतो की, मराठा वोट बँक विखूरली जाते व सहाजिकच अपेक्षीत परिणाम किंवा मराठा समाजाकडून राजकीय पक्षांना धोका पोहचत नाही व काही प्रमाणात जो धोका पोहचतो तो आर्थिक गोष्टींची बेगमी करून भरून काढला जातो , त्यामुळे  मराठा समाजाचे प्रश्न कोणही सोडवू शकत नाही . . हीच वस्तुस्थिती आहे . .
त्यामुळे सत्तेवर कुणीही आले तरी मराठा  समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत,  किमान यापुढे तरी  जो पक्ष ठाम भूमिका घेवून मराठा समाजाची भक्कम बाजू मांडत नाही तोपर्यंत मराठा समाजाने प्रस्थापित पक्षांना जवळ करूच नये  असेच वाटते , जोपर्यंत मराठा समाजाची संघटीत ताकद निवडणुकीत एकसंघ दिसत नाही तोपर्यंत कितीही मोठी आंदोलन झाली तरी सरकार नमणार नाही , मग सरकार कोणतीही असो ! आज छोटेमोठे समाज  संघटीत व ठामपणे एकाच कोणत्यातरी पक्षांना मतदान करतात तेंव्हा त्या पक्षांना त्या घटकांपुढे झुकावेच लागते !
जो पर्यंत मराठा समाज  एकत्रितपणे ठरवून मतदान करत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा कोणताही  प्रश्न सुटेल असे वाटत नाही !
आजच्या प्रत्येक पक्षांला वाटतेय की , आपण मराठा समाजाची बाजू  लावून धरली तर कदाचित  आपली इतर वोट बँक नाराज होईल किंवा दुर जाईल!
म्हणून कुणीही छुपी किंवा उघड भुमिका मराठा समाज्या साठी घेत नाही !
आज आपण पाहतो प्रत्येक जातीसाठी ठामपणे भांडणारा त्या त्या जातीत नेता आहे , ओबीसींना चुचकारून मुंडे साहेबांनी माधव समिकरण तयार केले , मुंडे साहेबांनी जाणीवपुर्वक मराठा नेत्यांना टार्गेट केले शरीर जरी मुंडे साहेबांचे होते तरी ब्रेन मात्र नागपूरकरांचा होता !
मराठा समाजात नेते बरेच झाले मात्र बहुसंख्य नेत्यांना , आमदारकी,खासदारकी , फारतर जिल्हापरीषद व  मंत्रीपद, महामंडळ, असे काहीतरी दिले की तो नेता समाज विसरून जातो व समाजाचे प्रश्न तसेच अनुउत्तरीत राहतात!
प्रत्येक समाजाचा हमखास पक्ष आहे पण मराठ्यांना कोणताही एक  पक्ष नाही ! कारण मराठा विविध पक्षात विखूरला गेला ,
राजकीय आर्थिक लाभ  मिळेल तिकडे समाजातील नेते जातात व समाज नेत्यांचे मागे जातो . . . हेच पिढ्यान पिढ्या चालू आहे ,
आज ब्राह्मण समाजाचा विचार केला तर जवळपास ९५%ब्राह्मण समाज संघ परिवार व भाजपासी ठामपणे जोडलेला आहे व जो ५% राहतो तो इतर पक्षांत फक्त लाभार्थी असतो त्याचे मत सुद्धा कमळालाच असते पण यातुन कोणताही मराठा बोध घेत नाही !
मराठाच काय इतर कोणताही समाज एकाच पक्षांच्या मागे ठामपणे उभा रहात नाही !
अशा परिस्थितीत मराठा समाजातील मुलांना शिक्षण, रोजगार, नोकरी  नाही मिळाले तरीही वाली कोणही नाही ,
मराठा शेतकर्यांनी कितीही आत्महत्या केल्या तरी सरकार जागे होणार नाही ,
जातीपुरता विचार करणारा मराठा कधीच नव्हता , नसावे सुद्धा याच मताचा मिही आहे ,
पण मराठा समाजाच्या समस्या जर कुणी गांभीर्याणे कोण सोडवणार नसेल  तर मराठा समाजातील नव तरूणांनी आता विचार करायची वेळ आली आहे !
कुठेतरी ठाम राजकीय भुमिका घेऊन जो आपले प्रश्न सोडवेल त्याला तरी जवळ करावे किंवा आपल्या समाजातील तरूणांनी एकत्र येऊन एखादा पक्ष तरी काढावा !
नसेल तर आंदोलन बंद करून आहे तसेच जगत रहावे !
बांधवांनो इतक्या दिवस मराठा शेतकरी आत्महत्या करत होते आता मराठा तरूण आत्महत्या करत आहेत,
तरीही सध्याचे राजकीय पक्ष जर लक्ष देत नसतील तर निर्णय घेण्याची वेळ आली आहे !
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
काही चुकले असल्यास माफ करावे !

शनिवार, २१ जुलै, २०१८

मराठा समाजाची मानसिकता

आमची मानसिकता कधी बदलणार?
जो समाज गावाला जेवायला घालत होता !
जो समाज कोणत्याही संकटात सर्वांनाच बरोबर घेऊन संकटावर मात करत होता !
गावगाड्यातील, तंटे असो की कोणताही प्रश्न असो तो पुढे येऊन सोडवत होता !
दुष्काळ असो की अजून काही असो जो समाज स्वतः उपाशी राहून गावाची भुक भागवत होता !
मान सन्मान होता, जमिन जुमला होता , पैसा अडका बर्यापैकी होता !
मग ६० /७० वर्षांत झाले तरी काय
मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ आली !
मित्रांनो कुणी समाजातील  प्रस्थापित नेतृत्वाला दोष देतो !
कुणी सरकारला दोष देतो !
कुणी दुसऱ्या जातीच्या लोकांना दोष देतो
पण
आपण कुठे चुकलो याचा कधी विचार करत नाही !

१ आम्ही कधीही व्यापाराकडे वळलो नाही सांगा
चुक कुणाची
२आम्ही कधीही लघु उद्योग केला नाही , नेहमी लाज बाळगली सांगा चुक कुणाची
३ आम्ही भाव भावकीतील वाद सामोपचाराने मिटवले नाहीत सांगा चुक कुणाची
४ आम्ही जत्रा खेत्रा केल्या पण शिक्षणाकडे लक्ष दिले नाही सांगा चुक कुणाची

५ आम्ही गावाला जेवण घातली , उधळपट्टी केली सांगा चुक कुणाची
६ आम्ही एकमेकांची  राजकारणात जिरवण्यासाठी लाखो रूपयांची उधळपट्टी केली सांगा चुक कुणाची
७ शेतात तोटा होत असताना शहरात धाव घेऊन पर्याय शोधला नाही  सांगा चुक कुणाची
८ उच्च निचता पाळून दुसऱ्या लोकांना दुय्यम वागणूक देवून विनाकारण वाद घालत बसलो सांगा चुक कुणाची
९ रोटी बेटी व्यव्हार करताना सुद्धा मतभेद करत बसलो सांगा चुक कुणाची
१०  विविध व्यसनाच्या आहारी जावून जमिनी गमावायची वेळ आली तरीही व्यसनाचा त्याग केला नाही चुक कुणाची !
११ आम्ही कुणाचे ऐकून कधी हिंदूत्ववादी , कधी बहुजन वादी, कधी धर्मनिरपेक्ष झालो पण प्रपंचात लक्ष केंद्रित केले नाही
१२ कधी , ब्राह्मण, कधी दलित, कधी मुस्लिम तर कधी ओबीसी समाजालाही नावे ठेवत बसलो व विविध समाजातील लोकांशी  गरज नसताना शत्रुत्व निर्माण केली , सांगा दोष कुणाचा !
बांधवांनो , जेव्हा शिक्षणाची ज्ञानाची गरज होते तेंव्हा आपले सर्व बांधव राजकारणात व्यग्र!
जेंव्हा शेतात काम करायची गरज असते तेंव्हा आमचे तरूण गावात कुठेतरी गप्पा टप्पा , राजकीय चर्चात व्यस्त
जेंव्हा मुलांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करायला हवे तेंव्हा मुलं सोशल मिडीयात व्यस्त!
कसा मराठा समाज प्रवाहा बरोबर राहील
आजच्या परिस्थितीत आपण इतरांच्या तुलनेत खूप मागे पडलो आहोत केवळ सोशल मिडियात तेवढा आपला बोलबाला चालतोय!
कोणताही समाज केंव्हा मोठा होतो , जेव्हा तो पडेल ते काम, खडतर परिस्थितीतून शिक्षण, कष्टाची तयारी व व्यसानाला लांब ठेवतो तोच समाज पैसा कमावतो ,
पैसा नसेल तर तुम्हाला काहीही साध्य करता येत नाही !
आता आपली मानसिकता बदलायला हवी अगोदर व्यसना त्याग केला पाहिजे ,
शिक्षणाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे .
लहान मोठा धंदा केला पाहिजे .
मिळेल ति नोकरी केली पाहिजे
पैशाची बचत करायला शिकले पाहिजे
राजकारण व मोठमोठे लग्न सोहळे यातील उधळपट्टी थांबवली पाहिजे !
कोणताही राज्यकर्ता  पक्ष  केवळ मराठा समाजाची बाजू धरणार नाही तर मराठा समाजाला , मराठा समकक्ष जातींना बरोबर घेऊन हा आरक्षणाचा लढा देश पातळीवर घेवून जावा लागेल!
एका जातीला आरक्षण मिळणे कठीण असते , त्या साठी आहे त्या प्रवर्गात किंवा घटनेत बदल करून नवीन प्रवर्ग तयार करून आरक्षण मागावे लागेल व नवीन प्रवर्ग तयार करायचा म्हटलं की , विविध राज्यातील जातींना बरोबर घेऊन लढावे लागेल
तर काहीतरी साध्य होईल.
आरक्षणाचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच प्रश्न समाजाने स्वतःच्या मानसिकतेत बदल करण्याचा सुद्धा आहे !
तुम्हाला खर्च कमी करावेच लागतील, तुम्हाला आधुनिक शेती करावीच लागेल व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाच्या तरी नादी लागून, कुणाला तरी नावे ठेवणे व शत्रूत्व निर्माण करणे बंद करावे लागेल!

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

शुक्रवार, २० जुलै, २०१८

मराठा आरक्षणाची गुंतागुंत

मराठा आरक्षणाची गुंतागुंत! ! !

गेले कित्येक वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय, विविध ठिकाणी आंदोलन करतोय, शांततेच्या मार्गाने मुक मोर्चे निघाले मात्र हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही , काही मराठा बांधव हे मराठा आमदार, खासदार, मंत्री व समाजातील लोकप्रतिनिधी यांना दोष देत आहेत पण कुणालाही वस्तुस्थिती समजुन घ्यावी असे वाटत नाही , काही लोक, पक्ष व संघटना नुसते राजकीय लाभ उठवण्यासाठीही मराठा तरूणांचा निव्वळ वापर करत आहेत,
खरी परिस्थिती हीच आहे की ,
भाजपा व भाजपा विचारधारा ही आरक्षण विरोधी आहे , आजपर्यंतचा इतिहास बघितला तर लक्षात येते की, यांनी मंडल आयोगालाही विरोध केलेला आहे की , व्ही पी सिंग यांचे सरकार केवळ मंडल आयोगावरून पाडले गेले होते . त्यामुळे भाजपा राजवटीत कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळणार नाही . मग आरक्षण हा विषय समजून घ्यायचा असेल तर घटनात्मक गोष्टी समजून घ्याव्या लागतील, आरक्षण ओ बी सी कोट्यातून मागायचे असेल तर मागासवर्ग आयोगापुढे , मराठा समाजाला मागासलेपण सिद्ध करावे लागेल, व तसा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर करावा लागेल व तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला पाहिजे व मराठा समाजाचा समावेश मागास जातीत करावा अशी केंद्र सरकार कडे शिफारस करावी लागेल व केंद्र सरकारने ति शिफारस स्वीकारली पाहिजे तरच, मराठा समाजाचा आरक्षणाच प्रश्न सुटू शकतो , मात्र देशभरात असलेल्या ओबीसी जातींची लोकसंख्या विचारात घेता  कोणतेही सरकार ओबीसी दबावामुळे असा निर्णय घेण्याची शक्यता नाही ! मग मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार?
हा मार्ग सुद्धा देश पातळीवर मराठा समाजाची लोकसंख्या विचारात घेता कठीण आहे पण आशेचा किरण म्हणून
आरक्षण मिळवायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा संसदेत कायदा करून, 2/3बहुमताने सदर कायद्याचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून
देशातील निम्या राज्याच्या विधानसभेत बहुमताने मंजूर करावे लागेल मात्र देशपातळीवर एकट्या मराठा समाजाचे काहिही चालणार नाही , त्या साठी
विविध राज्यातील मराठा समकक्ष लोकांना बरोबर घेऊन किमान १० ते १२ मोठ्या जाती बरोबर घेऊन हा लढा उभारावा लागेल व ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता वेगळा प्रवर्ग तयार करून हा प्रश्न सुटू शकतो मात्र त्या साठी देशपातळीवर मराठा समकक्ष, पटेल, गुज्जर, जाट, रजपूत यांना बरोबर घेऊन  संघटन करावे लागेल!
केवळ मराठा आमदार, खासदार, मंत्री यांना शिव्या देवून चालणार नाही "
कोणताही राजकीय नेता केवळ जातीच्या मतावर निवडून येत नसतो व भविष्यात सुद्धा केवळ जातीवर निवडून येण्याची बिलकुल शक्यता नाही !
प्रत्येक नेत्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जातीच्या घटकांना बरोबर घेऊन चालावेच लागते!
आणि जे जे नेते स्वतःच्या जातीपुरते बघतात ते संख्यात्मक दृष्ट्या  दोन चार पेक्षा जास्त नसतात, व त्यांना बर्याच मर्यादा असतात म्हणून कुणीही उठावे व आमदार खासदार यांना काहीही बोलावे अशी परिस्थिती नाही !
सर्वांनाच माहिती आहे की, बहुतेक मराठा समाज गरीबीत जीवन जगतोय, त्याचा मुख्य व्यवसाय शेती अडचणीत आणली गेली आहे , जमिनीची वाटणी झाल्याने जमिन फार कमी झाली आहे , त्यातून उत्पादन सुद्धा घटले आहे , ओपनसाठी शैक्षणिक फि भरमसाठ असल्याने शिक्षण अवाक्याबाहेर गेले आहे , उद्योग व व्यवसायात समाज नगन्य आहे , नोकरी नाही ,
यामुळे मराठा तरूण बेकारीच्या विवंचनेत आहे पण
याला दिशा न देता या तरूणांचा राजकीय लाभ करुन घेवून काही संघटना व समाजातील काही फक्त समाजाचे म्हणून काम करणारे नेते (सगळे नाही )स्वार्थ साधत आहेत!
बरेच बहाद्दर
कोण, ब्राह्मण समाजाला, कोण ओबीसी समाजाला, कोण मुस्लिम समाजाला , तर कोण, दलित समाजाला नावे ठेवत आहेत,
मुळात कुणाला नावे ठेवून हे प्रश्न सुटणार नाहीत
तर
समाजातील जाणत्या घटकांनी एकत्रितपणे काम करून, शिक्षण, उद्योग यात पुढे येऊन समाजातील कमजोर वर्गाला दिशा दिली पाहिजे , मदत केली पाहिजे !
केवळ कुणाला नावे ठेवून, कुणाच्या तरी नादी लागून समाजातील बेकारी कमी होणार नाही

आजच्या पेक्षाही परिस्थिती समाजाची वाईट होईल
. . . . . . .
मिळेल ते काम केले , व्यसनापासून दुर राहिले , लग्न किंवा इतर कार्यक्रमातील उधळपट्टी बंद केली तर बरेच प्रश्न मार्गी लागतील. . .

शनिवार, २ जून, २०१८

शेतकरी संपाचे निमित्ताने!!!

शेतकरी बांधवांनी, विहीर, मोटार, पाईपलाईन, ठिबक, शेततळी, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, आधुनिक एचटीपी पंप, फळबाग लागवड, जमिनी सपाटीकरण, बोरवेल,  व इतर कारणांसाठी
 विविध बँका, सोसायट्या, पतसंस्था,फायनान्स,  खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घेतले,
कष्ट करून आधुनिक शेती माळरानावर सुद्धा फुलवली, जगाच्या बाजारांत सुद्धा माल पाठवला, मल्चिंग पेपर, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस, सेडनेट, या आधुनिक तंत्राचा वापर करून उत्पादन कित्येक पटीने वाढवले,
 गुर्हाळ घर, गोठा, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराह पालन, असे शेतीपूरक जोडधंदे सुद्धा केले,
इतके कष्ट करून, राबराब राबून
शेतकर्यांची प्रगती होण्याऐवजी अधोगती का होते आहे?
यावर कोणच बोलायला तयार नाही!
उत्पादन दुप्पट करायच्या बाता मारून वेळ मारून नेहली जाते,
पण, मुळ मुद्दा नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, वादळी वारे, गारपीट,
हवामानात होणारे बद्दल, व त्यामुळे होणारे शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान भरून निघण्यासाठी शाश्वत विमा संरक्षण का दिले जात नाही?  हा प्रश्न आहे,
जर
शेतकर्यांच्या मालाला रास्त हमीभाव दिला,
जास्त उत्पादन येताच निर्यातीला पोत्साहन दिले, आयात माल कमी केला तर
तो कधीही तुमच्या दारात कर्जमाफी मागायला येणार नाही, आणि आत्महत्या तर कधीच करणार नाही, जरा शेतमालाला योग्य बाजार मिळायला लागला कि सरकारी पक्षाच्या पोटात गोळा उठतो,
मग बाजार हस्तक्षेप केला जातो विविध शेतमालावर निर्यात बंदी लादली जाते बाजार भाव पाडले जातात मग
सरकार कोणतेही असो!
साले,
परदेशातून, महाग, डाळी, साखर, तेल आयात करतात, आयात दाराला सवलती देतील पण,
इथल्या शेतकर्यांच्या हक्काचं देण्यासाठी अभ्यास चालू आहे हे दोन दोन वर्ष सांगतील,
शेतकरी बांधवांनो यापुढे कोणतेही सरकार आले तरी शहरातील लोकांना खूष करण्यासाठी, त्यांना फुकट, स्वस्त खायला मिळण्यासाठी
तुम्हांला त्रास देणार हे नक्की, कारण शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे विधानसभा व लोकसभा यांचे शहरी मतदारसंघ वाढलेले आहेत, त्यामुळे सगळे राजकीय पक्ष शहरातील लोकांना कायपण सवलती देणार, रस्ते, उड्डाण पुल, मेट्रो, मोनो रेल साठी कितीही पैसा उधळण करणार हेही नक्की, पण तुमच्या साठी मात्र तिजोरी खाली असणार हे नक्की!
म्हणून उत्पन्न दुप्पट करण्याच्या भानगडीत न पडता,
किमान खर्चात थोडकाच पण गुणवत्ता पुर्ण माल काढून (पिकवून )चांगले मार्केटींग तंत्र शिकून
कमी कष्टात व कमी पाण्यात उत्पादन घेणे आवश्यक आहे,
जास्त उत्पादन घेतले की बाजार पाडले जातात, नफेखोरी साठी साठेबाजी होते म्हणून,
आपल्या जमिन क्षेत्रात संपुर्ण पेरणी अगर, पीक लागवड न करता, कमी मजूरात, व आपल्या आवाक्यात एकुण जमीन क्षेत्राच्या फक्त ६०%क्षेत्रावरच लागवड करा,
त्यामुळे बाकीच्या जमिनीला विश्रांती मिळेल, पाणी पुरेसे होईल कष्ट सुद्धा कमी लागतील, वाचलेल्या वेळात उत्पादन केलेला माल डायरेक्ट ग्राहकांना विकता येईल आणि महत्त्वाचे म्हणजे कमी क्षेत्रावरच पेरणी किंवा लागवड केल्याने संपुर्ण मार्केट व्यवस्थेत शेतमालाचा तुटवडा होऊन आपोआपच शेतमालाला योग्य बाजार भाव मिळेल,
मग कुणीही आत्महत्या करणार नाही,
कुणाच्या मनकी बाता ऐकून जास्त तुरी लावल्या कि ८००० क्विंटलची तुर ४००० क्विंटलने घालायला (विकायला )लागते,
कांदे, डाळिंब, बटाटे, टोमॅटो, ऊस रडवतो,
हे करायचे नसेल तर कोणत्याही फालतू सरकारी योजनाकडे, डोळे लावून पहात बसण्यापेक्षा,सरकारच्या नावाचा जप  करत बसण्यापेक्षा दर्जेदार व कमी उत्पादन घ्या मग कोणतेही सरकार असो त्यांना भाव मागायची वेळ येणार नाही!
मागणीच्या तुलनेत शेतमालाचा पुरवठा कमी होईल तरच बाजार भाव चांगला मिळेल,
कोणतेही एकच पीक संपुर्ण क्षेत्रात लावू नका,
बघा तुमच्या कष्टाचे फुकट किंमतीत खायला मागणार्या औलादी व त्यांचे लाड पुरवणारे सरकार आपोआपच झुकेल,  तुमच्या प्रत्येक प्रश्नावर तातडीने निर्णय घेईल,
यासाठी सर्वांनी, जास्त उत्पादन घेण्याच्या व उत्पादन डबल करण्याच्या भानगडीत न पडता कमी क्षेत्रावरच चांगले उत्पादन घ्यावे ही विनंती!
आणि हो आता हळूहळू सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल, किमान विषमुक्त अन्न तरी पिकले पाहिजे,

आहे तो माल योग्य बाजारभावाने खपत नाही व उत्पन्न डबल घेतल्यावर जास्तीचा माल बाजारांत आल्यावर फेकून देण्याशिवाय काय पर्याय असेल!!!
शहरातील काही साले म्हणतात शेतकरी टॅक्स भरत नाही,
अरे या मुर्खांना कुणीतरी सांगा कि
आम्ही घेतो ती प्रत्येक गोष्ट टॅक्स लावून येते साधी बियाण्याची पिशवी सुद्धा दहापट किंमतीने घ्यावी लागते,
बाजारांत शेतमाल जातो तेव्हा तेव्हा तो टोल पासून ते आडत्या हमाल, ते ग्राहक प्रत्येकजण आमच्या जीवावर जगतो,
तुम्ही ज्या कंपनीत नोकर्या करता, माल उत्पन्न करता  किंवा जो व्यवसाय करता त्याचा सगळ्यात मोठा ग्राहक हा शेतकरी असतो, प्रत्येक गोष्ट टॅक्स लावून येते त्यामुळे शेतकरी सगळ्यात जास्त टॅक्स भरतो हेही नक्की आहे!

शेतकर्यांच्या मुलांनो लढाई चालू केली आहे
आता ति लढून दाखवू,

शहरातील बहुसंख्य लोक हिंदू आहेत, सरकार हिंदूत्ववादी आहे
पण खेड्यात काबाडकष्ट करणार्या बहुसंख्य हिंदू शेतकर्यांच्या प्रश्नावर नुसते गोल गोल करते आहे,
कारण यांचे सगळे भाऊबंध शहरात राहतात, त्यामुळे गावातील बहुसंख्य हिंदूंचा छळ करून मुंडी पिरगळून हे शहरात पुरवत आहेत, गावातील ग्रामीण भागातील हिंदूंचं यांना काहीही देणं घेण नाही!
मुळात राजकारणासाठी धारण केलेले  हिंदूत्व     बाकी काही नाही!

हिंदूत्वाची नवी व्याख्या शहरातील बहुसंख्य हिंदूना खेड्यातील बहुसंख्य हिंदू शेतकर्यांनी फुकट, कमी दराने प्रसंगी आत्महत्या करून शेतमाल उपलब्ध करून देणे म्हणजेच कट्टर हिंदूत्ववादी होय!
विजय शंकरराव पिसाळ
नातेपुते ता माळशिरस!!!

शनिवार, १९ मे, २०१८

केवळ लोकशाही साठी !

कर्नाटक सारखा परत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रातही सत्ता परिवर्तनाचा पेचप्रसंग होवू नये या साठी काय करता येईल! ! !

कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहिर झाल्यापासून जो गोंधळ चालू होता तो लोकशाहीला मारक होता, भारतीय राजकारणात कित्येक वेळा विविध राज्यातील  विधानसभा , व देशाच्या लोकसभेत सुद्धा त्रिशंकू अवस्था निर्माण झालेली पाहिली आहे , पण कर्नाटकात झाले ते लोकशाही मानणार्या माझ्या सारख्या  माणसांना वेदना देणारे होते , निवडणूकीत सर्वच पक्ष प्रचंड साम दाम दंड भेद व पैसा वापरून निवडून येतात, ते  स्वतःच्या ताकदी बरोबर पक्षाच्याही ताकदीवर निवडून येतात, हेही खरे आहे
त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू असतो तरीही कायदा मोडून पक्षांतराचे प्रयत्न,  पक्ष फोडून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न होत  असतात ते खरोखर वाईट असतात, याला जबाबदार केवळ भाजपा आहे असेही नाही जवळपास सर्वच पक्षांनी आजवर सत्तेचा दुरुपयोग केला आहे आमदार खासदारच काय स्थानिक स्वराज्य संस्था , विधान परिषदा , राज्यसभा यातही सदस्य निवडताना जो घोडेबाजार होतो तो भयंकर असतो आणि तोच पायंडा पडू पाहतो आहे , या अगोदरच्या काही  प्रकरणात, माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांनी घोडेबाजार टाळण्यासाठी चांगला  पायंडा पाडला होता त्याप्रमाणे सर्व व्यवस्थित चालू होते पण सत्तेसाठी सर्व काही , हीच भावना प्रत्येक पक्षांचीच झाल्याने या घोडेबाजाराला उत आला आहे  साध्या ग्रामपंचायत निवडणूकीत सुद्धा कित्येक लाख उधळून निवडून येणारे लोक आहेत, मग या निवडणूका तर सत्तेची चावीच हाती देणार्‍या असतात, करोडो अब्जावधीचे निर्णय केवळ एका सहीने होतात त्यामुळे सहाजिकच घोडेबाजार होणार पण आज सुप्रीम कोर्टामुळे काहीप्रमाणात तरी कर्नाटकातील घोडेबाजार थांबला असला आहे  तरीही  भविष्यात विविध राज्यात व केंद्रात  निवडनुका झालेनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे याच्या सुचना किंवा स्पष्ट नियम स्पष्टपणे मानणीय  सुप्रीम कोर्टाने द्याव्येत  किंवा संसदेत कायदा तरी व्हावा हीच जनतेची अपेक्षा आहे ,
सत्ता जनता सदैव कोणत्याही एका पक्षाला देणार नाहीच बदल हे होत राहतील पण बदल सुद्धा लोकशाही मार्गाने व्हावे हेच  अपेक्षित आहे , राजकारणात कुणीही साजूक नाही ,बहुतेक संधी मिळताच  प्रत्येकाला कसेही करून सत्ता हवीच आहे पण सत्ता ही ज्या पक्षाचे तिकीट घेवून निवडून आलाय त्याच पक्षाच्या निर्णयाला अधीन राहून राबवली पाहिजे , किमान कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या निर्णया विरूद्ध लोकप्रतीधीला बहुमतावेळी  जाता येवू नये व कोणतीही पळवाट असू नये तरच लोकशाही वाचू शकते व घोडेबाजार टाळले जावू शकतात, लोकशाहीत, केवळ माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा समोरचा नेता आहे म्हणून मि मदत करेल तर हे चालणार नाही, केवळ पक्षाचा व्हीप चालेल हीच तरतूद हवी  कारण आपले राष्ट्र बळकट करण्यासाठी कोणताही पक्ष नव्हे तर लोकशाही टिकली पाहिजे , पक्ष हे मोठे होतील, सत्तेवर नवे पक्ष येतील पण देश मजबूत झाला पाहिजे , केवळ सत्तेसाठी सर्व सरकारी यंत्रणा , सुरक्षा व्यवस्थावर पडणारा तानतनाव व लोकशाहीचा खून होवू नये ,
प्रत्येक लोकप्रतिनीधीने निवडणूक लढवतानाच पक्षाला बांधिल राहून निवडणूक लढवली पाहिजे ज्यांना संधीसाधू वृत्ती ठेवायची आहे त्यांनी खूशाल अपक्ष निवडून येवून स्वतःचा दम सिद्ध करून कुणालाही पाठींबा द्यावा पण पक्षाचा झेंडा घेऊन निवडून आल्यानंतर मात्र फुटताच येणार नाही व पक्षीय बलाबल असेल  तोच बहुमताचा  आकडा ग्राह्य धरवा ! काहीवेळा विविध कारणामुळे नेताशी किंवा पक्षाशी  मतभेद झाले तर पक्षाचा  राजीनामा देवून खूशाल निवडून यावे पण बहुमत सिद्ध करायच्या अगोदर लगेच पक्षाच्या विरोधात जाता आले नाही पाहिजे ,
व निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला सदनात उपस्थित राहणे कंपल्सरी करावेच  जे सदस्य सदनात बहुमत परिक्षेला गैरहजर राहतील त्यांना किमान १२ वर्ष निवडणूक लढवायला बंदी घालावी व आमदारकी , खासदारकीचे सर्व लाभ तात्काळ बंद व्हावेत असा कायदा झाला तरच सत्ता एका पक्षा कडून दुसर्या पक्षाकडे सहज लोकशाही मार्गाने हस्तांतरित होईल, सरकार  स्थिर  चालणे  व लोकहीताची कामे होणे आज काळाची गरज आहे
सत्ता आणि पैशाचा बाजार देशाला रसातळाला घेऊन जाईल, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, गोवा, यात पक्ष कोणते हा मुद्दा महत्त्वाचा नाही तर सरकार बनवण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे, आवाजी मतदान, किंवा गुप्त मतदान सदनात न होता सरळसरळ बॅलेट पेपरच्या  साह्यानेच मतदान व्हायलाच हवे आज कर्नाटकात सर्वच पक्षांनी  जनेतेचा कराचा  पैसा भ्रष्टाचार करून कमावला व निवडनुकीत  उधळला गेला आणि जनतेलाच प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे हेच दुर्देवाने म्हणावे लागते  आहे , कोर्ट, वकील, पोलिस यंत्रणा व संपुर्ण भारतातील जनता यांना जो त्रास झाला तो कदाचित सर्व नियम व लोकशाही संकेत पाळले गेले असते तर कदाचित झालाच नसता व  ही वेळ निर्माण झाली नसती ,जशी  आज सत्तेतून पायउतार होण्याची वेळ भाजपावर आली तीच वेळ कदाचित काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षावर येवू शकते, जर व्यवस्थित नियम झाले , कोर्टाने डायरेक्शन दिले   तर मात्र सत्ता परिवर्तन नीट होवू शकते !
व लोकशाही टिकण्यासाठी सत्ता कुणाचीही येवो मात्र जनतेच्या खर्या मतदानातून आली पाहिजे !
कदाचित भविष्यात इव्हीएम बरोबरच बॅलेट पेपर वापरायची वेळ आली तरीदेखील लोकशाहीसाठी ते करावेच लागेल?
आजचा राजीनामा भाजपाच्या मुख्यमंत्र्याचा असेल कदाचित हीच वेळ नंतर कोणत्याही पक्षावर येवू शकते !
विजय पिसाळ नातेपुते !
९४२३६१३४४९
केवळ लोकशाहीसाठी !

शुक्रवार, १८ मे, २०१८

काँग्रेस अपयशातून धडा घेईल का ?

राजकारणात सत्ताधारी जेंव्हा जेंव्हा कुणाचेही ऐकत नाही तेंव्हा सक्षम विरोधक असावा लागतो सक्षम विरोधक नसेल तर सत्ताधारी मुजोर बनतो म्हणून काँग्रेस टिकलीच पाहिजे . . .

काँग्रेस अपयशातून धडा घेईल का ?

काँग्रेस अजून कीती काळ संयमाने राजकारण करणार!
आज काँग्रेसला आक्रमक व "इट का जवाब फत्थरसे देंगे "अशा नेतृत्वाची प्रत्येक राज्यात जरूर आहे
काँग्रेसला आक्रमक प्रवक्ते , आक्रमक वक्ते पुढे आणावेच लागतील, आय टी सेल जबरदस्त बनवावाच लागेल, खोटा नाटा प्रचार करणार्‍यांचा तशाच भाषेत समाचार घ्यावा लागेल,
आज काँग्रेसचे विरोधक  उद्योगपती , मिडीया , सर्व शासकीय यंत्रणा , साम दाम दंड भेद वापरून प्रत्येक गड सर करत आहे , आजची काँग्रेस नुसत्या गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर विसंबून राहात आहे , हे खेदाची गोष्ट आहे , समोरच्या छावणीत  मोठे मुरब्बी सेनानी आहेत ते बलदंड आहेत, मॅनेजमेंट करण्याबाबत तरबेज आहेत  सर्व गोष्टींत माहिर आहेत, फोडा व राज्य करा ही इंग्रजांची निती हे त्यापेक्षाही खुबीने वापरत आहेत, इलेक्शन कमिशन, न्यायपालिका, पोलिस प्रशासन, व प्रत्येक शासकीय यंत्रणात यांनी माणसे पेरली आहेत,  असे   जबरदस्त  यांच्यासारखे खतरनाक रतिमहारती असतांना इकडे मात्र अजून शिवराय कुणीही होत नाही हे दुर्देवाने म्हणायची वेळ येत आहे,  सगळे जणू आपआपसात भांडत बसून विस्कटलेले आहेत. .
ममता बॅनर्जी , पवार साहेब, जगनमोहन रेड्डी , नारायण राणे यांना काँग्रेसने योग्य सन्मान दिला असता,काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी बेरजेचे राजकारण केले असते तर बरेच काँग्रेस मधील चांगले लोक पक्ष सोडून गेले नसते,  संगमा, तारीक अन्वर यांचा मान राखला असता ,  तर कदाचित  आज चित्र वेगळे असते , आज काँग्रेस कडे, प्रणब मुखर्जी , राजेश पायलट, माधवराव शिंदे अशी दमदार फौज नाही, बरेच मुरब्बी व जेष्ठ नेते योग्यता असूनही अडगळीत टाकले गेले , राज्यसभा , विधान परिषदा यातून नको ते पुढे केले गेले व त्यांनाच मंत्रीपदे व सर्व लाभाची पदे दिली गेली,त्यामुळे जे मास लिडर होते ते तर गेलेच पण   त्यांचेही कार्यकर्तेही पक्ष सोडून गेले ,  त्यामुळे आज  एकटे  राहुल गांधी   नवख्या  सेनापती सारखे  कमी पडतात हेच वास्तव आहे , काँग्रेस प्रत्येक राज्यात अंतर्गत कलह जर मिटवू शकत नसेल तर काय होणार? विरोधकांकडे प्रदेश पातळीवर, आमदार, खासदार, नगरसेवक, या ठिकाणी घराणेशाही आहे पण केंद्रीय नेतृत्व काळानुसार सतत बदलले  जाते व जनमतावर त्याचा अनुकूल परिणाम होतो ! 
पुर्वी काँग्रेसकडे जबरदस्त  लिडरशीप होती कार्यकर्ते व नेते यात ताळमेळ होता ,
राजकीय नेते कार्यकर्ता जपत होते ,राष्ट्रीय भावना होती,  कार्यकर्त्यालाही सत्तेत वाटा होता योग्यतेनुसार काहीतरी मिळत होते ,
आज काँग्रेसमधील नेते कार्यकर्त्याला काहीही देत नाहीत, (विरोधकात तरी सर्व आलबेल आहे असे नाही ),
सर्व सत्तेची पदे व संघटनेतील,  पक्षातील सर्व पदे ,नेते, नेत्यांचे सगेसोयरे ,  बायको, मुलगा ,सुन,  भाऊ, पुतण्या , जावई, मेव्हणा यातच वाटून टाकतात, पक्षाचा निधी सुद्धा कधीच खालीपर्यंत येत नाही , आणि सर्वच जाती धर्मातील,  समाजातील लोकांना  समान धरायच्या ऐवजी मतासाठी प्रत्येक राज्यात विशिष्ट घटकांना अती झुकते माप देते व काही लोकांचे प्रमाणाबाहेर लांगूलचालन करून बहुसंख्य  बाकीच्या लोकांना नाराज करायचा उद्योग केला जातो , आजवर काँग्रेसने खूप चांगल्या योजना राबवल्या पण  त्याची जाहीरात केली नाही,
ज्यांच्या साठी काँग्रेसने भरपूर  योजना राबवल्या  तो वर्ग सुद्धा काँग्रेस पासून दुर गेला , गावागावात विविध तंटे सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बोटचेपी भुमिका काँग्रेस घेत राहिली,
मागच्या काळात मित्र पक्षांची जिरवण्यासाठी मित्र पक्षांवर विविध आरोप करत राहिली,  मित्र पक्ष व त्यांचे नेते याचाही सन्मान केला नाही , पराभवाची कारणे न शोधता ,सतत चुका केल्या , पैसेवाले लोकांना राज्यसभा व विधान परिषद यात झुकते माफ दिले गेले , काँग्रेस सत्तेवर असतांना काही गोष्टींत ठाम राहिली नाही , जाहिरात व मार्केटिंग या गोष्टही केल्या नाहीत याची फळे आज काँग्रेस भोगते आहे , घोटाळे न करता सुद्धा घोटाळेबाज हा शिक्का लावून घेतला , ज्यांनी प्रचंड घोटाळे केले त्यांचेवर जबरदस्त व धड नीट प्रहारही केले नाहीत, हेच काँग्रेसच्या अपयशाचे कारण आहे , केंद्रीय लेवलला इतर पक्ष व्यक्ती पुजा करत नाहीत मात्र काँग्रेस वारंवार व्यक्तीपुजा करते आहे , त्यामुळे सामान्य घरातील लोकांना काँग्रेस मध्ये आपल्याला संधी नाही हीच भावना प्रबळ होताना दिसते आहे ,मनमोहन सिंगा सारखे हुशार गुणी पंतप्रधान जरी काँग्रेसने दिले तरीदेखील मास लिडर असणारे पदापासून दुर ठेवले , त्यामुळेही मासलिडरचा पाठीराखा वर्ग बाजूला गेला,  काँग्रेस निर्णय घेते पण निर्णय झटपट घेत नाही , निर्णय लांबवत बसते व त्यातूनही नाराजी वाढते , आज देशात सक्षम विरोधक पाहिजे त्यासाठी हुशार चाणाक्ष व सर्वांना बरोबर घेवून जाणार्‍या मुरब्बी नेतृत्वाची गरज आहे , आजच्या घडीला काही काळ तरी राहुल गांधींनी बाजूला  होवून दुसर्याला लिडरशिप दिली पाहिजे ,
आज काँग्रेसमध्येही जबरदस्त वक्ते आहेत, जबरदस्त काम करणारे आहेत पण त्यांना संधीच मिळत नाही , जनमताची नस माहिती नसलेले प्रत्येक राज्यात नेते लादले जातात, पृथ्वीराज चव्हाण वैयक्तीक हुशार आहेत, चांगले प्रशासक आहेत मात्र जनतेत त्यांना  फारसी किंमत नाही , त्यामुळे सुद्धा महाराष्ट्र गमवावा लागला, त्यावेळी आक्रमक नारायण राणे मुख्यमंत्री केले गेले असते तर इतकी भयंकर अवस्था झाली नसती, विलासराव देशमुखांचे नंतर संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची बांधणी करणारा नेता दुर्देवाने लाभला नाही ,आज देशाचं नेतृत्व करताना काँग्रेसने स्वतः त्यागाची भुमिका घेवून पवार साहेबांना करायला सांगितले पाहिजे तरच परिवर्तन होईल,
काँग्रेसने , प्रिंट व इलेक्ट्रीक मिडीया व्यवस्थित हाताळला पाहिजे , सोशल मिडियात जी पक्षाची प्रतिमा मलीन केले जातेय ती होवू नये या साठी आयटी सेल स्ट्राँग केला पाहिजे , सिंहाची शिकार करायला नुसती हाकाटी देवून चालणार नाही तर त्याला व्यवस्थित जाळे टाकावे लागेल तरच सिंहाची शिकार होईल,
यांना रोखता येईल!
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

शुक्रवार, ११ मे, २०१८

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

शेतकरी समाज संपण्याच्या वाटेवर!

खेड्यातील सुखी समृद्ध भारत, कृषीप्रधान भारत ही देशाची ओळख संपण्याच्या मार्गावर आहे , वाढती लोकसंख्या , लोकसंखेवर आधारीत शहरात वाढणारे लोकसभा व विधानसभांचे मतदारसंघ यामुळे ग्रामीण भागातील कमी होणारे प्रतिनिधीत्व व शहरी लोकांना समोर ठेवून घेतले जाणारे निर्णय यामुळे ग्रामीण शेतकरी संपण्याच्या मार्गावर आहे, आज ज्यातून शेतकर्यांना हक्काचे चार पैसे मिळत होते, तो दुध धंदा पुर्णपणे तोट्यात आहे, पाण्याची किंमत सुद्धा दुधाला नाही , साखर कडू झाल्याने ऊसाला बाजार नाही, कित्येक साखरकारखाने आजारी आहेत, बंद पडत आहेत, दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत,साधी एफआरफी देवू शकत नाहीत,  तेलबिया , सोयाबीन, मका, कापूस, कांदा , तुर या पिकांच्या बाजारभावाची परिस्थिती तर  भयानक आहे , भाजीपाला , फळभाज्या याला मार्केटमध्ये कवडीमोल किंमत मिळत आहे .
या विदारक परिस्थिती मुळे ग्रामीण अर्थकारण पुर्णपणे कोलमडले आहे,
मुला मुलींची लग्ने रखडली आहेत, मुलांना शिक्षण द्यावे म्हटले तर हातात पैसा नाही ,वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट, हे तर जणूकाही पाचवीलाच पुजलेले आहे , वेळी अवेळी होणारे भारनियमन, सतत बदलणार्या भारनियमनाच्या वेळा काय काय वाढून ठेवले शेतकर्यांच्या नशीबी देव जाणे ,
काहीही कारण नसताना कॅनॉल लगतच्या व नदीकाठच्या शेतकर्यांचा खंडीत केला जाणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी पुर्णपणे खचला आहे ,हैराण आहे  पाणी चोरणारे मोकाट व सर्वसामान्यांचा वीजपुरवठा खंडीत करणे हे महावितरण व इरिगेशनचे काम मोघलशाहीलाही लाजवेल असे आहे , ऊन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असते , विहिरीत पाणी असतांनाही केवळ इरिगेशनचे  अधिकारी व महावितरणचे अधिकारी शेतकर्यांचा छळ करत आहेत, उभी पीके जळताना शेतकर्यांचे ह्रदय सुद्धा जळत आहे . शेतकर्यांनी जगाचे कसे हा प्रश्न आवासून निर्माण झाला आहे ,
बँकेच्या  कर्जाने, व  सावकारी कर्जाने शेतकरी घायाळ झाला आहे . तो पुर्णपणे घायला आलेला असतांना , शेतकर्यांना कोणताही दिलासा मिळत नाही , नुसत्या घोषणांचा पाऊस चालू आहे पण ग्राऊंड लेव्हल वर विकासाचा थेंब सुद्धा पडत नाही ,
शहरात भाजीपाला , फळे, धान्य, दुध,  मांस, अंडी स्वस्त मिळावीत म्हणून विविध मार्गाने निर्यातीत अडथळे आणून, तोच शेतमाल कवडीमोल दराने शहरात कसा जाईल अशी व्यवस्था निर्माण केली जाते आहे!
शेतकर्यांना लागणारे बरेच घटक २८%जीएसटीत आहेत यामुळे आज ग्रामीण भारत मरणासन्न अवस्थेतून जात आहे , "बाप भीक मागू देईना व आई जेवायला घालेना "अशी अवस्था या देशातील शेतकर्याची करून टाकली आहे , यातून मार्ग काढायची भाषा नाही , कोणताही दिलासा नाही , रोज धर्म आणि जातीचे ढोल बडवून समाज दुभंगला जाईल अशा पद्धतीने सर्व गोष्टी केल्या जात आहेत.
ग्रामीण भागातुन शहरात जायचे म्हटले तर शहरी उद्योगपती , कारखानदार हे कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवतात ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळत नाही आणि रोजगार कंपनीत मिळालाच तर  ६ महिने झाले की ब्रेक ठरलेलाच असतो !
शासकीय नोकर्या नाहीत, यामुळे प्रचंड वाढलेली बेरोजगारी व त्यातुन निर्माण होणारी गुन्हेगारी व गुन्हेगारीतून वाढणारे खून व बलात्कार आणि जातीय ताणतणाव, या दृष्टचक्रात सापडलेला तरूण कसा बाहेर येणार,
गावात साधे बांधकाम करायला सुद्धा वाळू भेटत नाही , नियतीने कोणता सुड उगवला हे कळायला मार्ग नाही ,
ग्रामीण भागातील कुणालाही शिक्षण परवडत नाही केवळ नैराश्य व चिंतेचे वातावरण आज जवळून पहावे लागतेय!
शिक्षण, नोकरी , व्यवसाय, धंदा या शिवाय तरूण पिढी भरकटलेल्या अवस्थेत जगते आहे . या सर्वांचा परिणाम मुले व्यसनी बनत आहेत, मावा , गुटखा , दारू तंबाखू , मटका याच्या आहारी जात आहेत, या सर्वांचा परिपाक म्हणून तरूण शेतकरी आत्महात्या करत आहेत,
असो हेही वेळ जाईल तरूण परत पेटून उठेल, ग्रामीण भारत नव्याने झेप घेईल, पण एक पिढी बरबाद झाली आहे ति तुम्हाला कधीच माफ करणार नाही !
जय जवान, जय किसान!
भारत माता की, जय!
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

गरिबांना मोफत शिक्षण मिळायला पाहिजे का?

सर्व जातीतील गरीब मुला मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत किंवा माफक फिमध्ये मिळण्याची व्यवस्था व्हावी का ?

आज सर्वच जातीमध्ये गरिबांची संख्या लक्षणीय आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाची आस आहे. शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घरातील मर्यादित उत्पादनाची साधने , अशिक्षित आईवडील, खेड्यातील जीवनमान, शहरात रहात असेल तर झोपडपट्टीतील राहणीमान, आठराविश्व दारिद्र्य  अशा  परिस्थिती मुळे अभ्यासत येणारे अडथळे या विविध कारणामुळे गरिबांची मुले , प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेर फेकली जात आहेत, त्यामुळे गरिबांचा उच्च शिक्षणातील आलेख फारच कमी आहे . गरिब मुला मुलींचे पालक एकतर रोजंदारीवर कामाला जातात, लोकांच्या घरी मिळेल ती सर्व कामे करतात, किंवा एकदम छोटा मोठा व्यवसाय करतात यात प्रत्येक जातीतील गरिबांचा समावेश होतो, बुद्धी असूनही , पात्रता असूनही , गुणवत्ता असूनही , या मुला मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागते ही गोष्ट समानतेच्या तत्वाविरूद्ध असल्यासारखी वाटते ,
तसे पाहिले तर गरिबी ही जात पाहून येत नाही, श्रीमंत आणि गरिबांची सुद्धा भूक अन्न पाण्याशिवाय भागू शकत नाही , आज खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये गरिबांना जवळपास प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. शासकीय शाळा कॉलेज मोडीत काढून खाजगी शिक्षणसंस्थांच्या बाजारात केवळ श्रीमंतांना शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे , गरिबांची मुले खाजगी कोचिंग क्लासेस लावू शकत नाहीत, चांगल्या नोट्स मिळवू शकत नाहीत त्यामुळेही गरिबांच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असते . आज शिक्षणाचा बाजार निर्माण झाला याला आळा बसणे केवळ अशक्य आहे , यापुढच्या काळात फक्त श्रीमंतांचीच मुलेच उच्चशिक्षण घेतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. गरिबांच्या मुलांनी, आय आयटी, मेडिकल, किंवा इतर दर्जेदार कोर्सेससाठी प्रवेश मिळवण्याची स्वप्न पाहु नयेत का ?
प्रत्येकजण समानतेची , गुणवत्तेची भाषा बोलतो , परिस्थितीच विपरीत असेल, कोणतीही दर्जेदार साधने उपलब्ध नसतील, अभ्यासाला निकोप वातावरण नसेल तर हुशार असूनही चांगली गुणवत्ता कशी दाखवता येईल, जर आई बाप शिपाई, कारकुन, शेतकरी , मोलमजुरी , घरकाम, करणारे असतील तर पैशाअभावी ते मुलांचे व्यवस्थित संगोपन करू शकत नाहीत तर उच्च शिक्षणासाठी दर्जेदार शाळा कॉलेज कसे निवडणार, ट्यूशन कशा लावणार आणि त्याकरिता पैसा कसा उभा करणार,
खरेतर जात पाहून शैक्षणिक फि ठरवण्यापेक्षा गरिबी व श्रीमंती पाहून शैक्षणिक फि ठरवायला पाहिजे शिक्षणाच्या पायाभूत सुविधाच गरिबांच्या मुलांना मिळत नसतील तर ति मुले श्रीमंतांच्या मुलांबरोबर स्पर्धा कशी करणार? शैक्षणिक साधना अभावी मार्क्स कसे मिळवणार, आज बहुतेक ठिकाणी डॉक्टरांची मुले डॉक्टर होतात  , अधिकार्यांची मुले मोठ मोठे क्लास जॉईन करून अधिकारी होतात, केवळ अफाट गुणवत्ता व कुणाच्या तरी वरदहस्तामुळे ५ ते०% गरिबांची मुलेच एम पी एसी व युपीएसीच्या परिक्षांना बसतात व त्यातील काही यशस्वी होतात, बाकीच्यांच्या नशीब एकतर, रोजंदारीवर कामाला जाण्याची वेळ येते, कुणाला खाजगी नोकरदार व्हावे लागते , किंवा मिलिटरी , पोलिस भरती या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात,
आजच्या परिस्थितीत बहुसंख्य लोकांना शिक्षण परवडत नाही म्हणून ते सोडायची वेळ येते , शासकीय नोकरी नाही, खाजगी नोकरीत कायम होण्याची शक्यता नाही , आणि चांगल्या शिक्षणासाठी पैसा नाही या मुळे गरिब श्रीमंत अशी  प्रचंड तफावत व गरिबांमध्ये  मागासलेपणा निर्माण होत आहे .
याला पर्याय काय नुसते लेख लिहून प्रश्न सुटणार नाहीत तर जनमताचा रेटा लावून खालील उपाय शोधावे लागतील!
गरिबी हा घटक मानून सर्व शासकीय, खाजगी  , अशा शिक्षणसंस्था मध्ये किमान ५० %जागा आरक्षित कराव्या लागतील!
गरिबांच्या मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण द्यावे लागेल!
शैक्षणिक स्कॉलरशिप गरिबांच्याही मुलांना मिळालीच पाहिजे !
शासनाने उच्च शिक्षणात शाळा कॉलेजचा मॅनेजमेंट कोटा रद्द केला पाहिजे !
खाजगी शाळा कॉलेज मध्ये सुद्धा गरिबांना ५० %जागा राखीव पाहिजेत!
अशा पद्धतीने जर उपाय केले नाहीत तर या देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात येताच येणार नाही व त्यामुळे अराजक स्थिती निर्माण होवून श्रीमंतांना सुद्धा सुखाने झोपता येणार नाही !
दरोडे , चोर्या , खून, हे संपत्तीच्या विषम वाटणीतून होतील?
म्हणून गरिब मुख्य प्रवाहात यायचा असेल तर त्याला श्रीमंताच्या मुलांसारखे गुणवत्तापुर्ण व मोफत  शिक्षण मिळायला हवे आणि शिक्षणात यशस्वी झाल्या नंतर पात्रतेप्रमाणे नोकरीच्या व व्यवसाय, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत!

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

आयुष्याचे सार्थक कधी होईल

**आयुष्याचे सार्थक कधी होईल!*

**भारतासारख्या महान देशात आपला जन्म होणं हीच गोष्ट मुळात आपल्या भाग्याची आहे*
**विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
**मुळात आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या गोष्ठींचा विसर पडत चालला आहे, आपण आज जगत असताना किती आनंदी असतो ,  आपल्या मनात इतरां बद्दल किती आदर असतो? **
**आपल्या मनाला आपण काही प्रश्न विचारतो का?
मि कोण? माझी निर्मिती कशासाठी ? माझे अस्तित्व का ? मला नेमके काय करायचे आहे ? माझा माझ्यावर विश्वास आहे का ? मला नक्की काय हवंय? मि कशासाठी जगतो आहे ? माझे कोण?
**या प्रश्नांची उत्तेरे शोधायचा आपण सामान्य पण कधीच विचार करत नाही , कुणीतरी आपल्याला ज्ञान देतो,कुणाचेतरी आपण ऐकतो आणि  आपण पैसा , संपत्ती , याच्या मागे लागत लागत कधी वाईट कृत्य करतो हेही आपल्यालाच कळत नाही ,*
मित्रांनो जगायला पैसा लागतो पण, केवळ पैशामुळेच जीवन सुखी होते असा नाही , तुम्हाला तुमच्यातील आतील आवाजाची जाणीव झाली  पाहिजे  तरच तुम्ही या जगातील मोजक्या लोकांच्या पंक्तीत बसू शकता , ईश्वर आहे का ? नाही ? या वादात न पडता स्वतःला काहीतरी विचारा मग तुम्हाला स्वामी विवेकानंद भेटतील,  तुम्हाला तुकोबाराय भेटतील, तुम्हाला शिवराय, बाबासाहेब प्रेरणा देतील, तुमच्यातील गुणांचा परिचय तुम्हाला होईल, **भोगवादी वृत्ती नष्ट होऊन, तुम्ही वास्तविक जीवन जगू लागाल,* गरजा ओळखून तुमचा खर्च कमी होत जाईल पण या साठी तुम्हाला तुमच्या मनासीच संवाद करावा लागेल!
**आपले अस्तित्व शोधावे लागेल, मनातील भय, मनातील आत्मदुर्बलता काढावी लागेल, मंदिरात  कादाचित देव भेटेल की नाही हे मि  सांगू शकत नाही  मात्र एकांता मध्ये , तुम्ही स्वतःशीच बोलून जगातील तुमच्या अस्तित्वाचे कोडे सोडवू शकाल,* मनाची एकाग्रता व मनाची खंबीर भावना कोणत्याही संकटावर मात करायला नक्कीच शिकवेल, पैशाच्या पाठिमागे धावता धावता आपला विनाश तर होणार नाही ना हाही कधीतरी विचार मनासी करायला पाहिजे ,
**ज्ञान प्राप्तीसाठी जशी गुरूंची आवश्यता असते , तसेच कठोर अभ्यास व मनन चिंतन हे तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देवू शकते* ,
**मोबाईल, इंटरनेटच्या या जगात काॅपी पेस्ट करून पोस्ट पुढे पाठवण्या इतके आयुष्य सहज सोपे नाही **,
दुसर्यांची  फसवणूक करून कदाचित काही काळ श्रींमती येते सुद्धा पण अंतरीक मनातून मात्र  समाधान लाभण्याची शक्यता बिलकुल असत नाही**
**साधी सरळ जीवनपद्धती तुम्हाला या जगात महान बनवू शकते **
**कोणत्याही साधू मुनी कडे  संपत्ती नसताना सुद्धा जग पाया पडते* व मोठ मोठे भ्रष्टाचारी नोकरदार, मंत्री संत्री यांना संरक्षणा शिवाय वावरता येत नाही यातच, तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शोधू शकता !
**तुम्हाला जर आयुष्यात काय करावेच वाटले तर तुम्ही प्रथम माणूस बना , आपल्या  संस्कृतीची जपणूक करा , तुमची महानता ही जातीवर, धर्मावर नसते , तुमच्या पैशावरून ठरत नसते , यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद  , डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, साने गुरूजी , अशी थोर व्यक्तीमत्व कळावी लागतील!**
**यापुढेही जावून तुम्हाला , या मनुष्य जातीवर, या पवित्र मातीवर, प्रेम करावेच लागेल, रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसावेच लागतील स्वतःच्या अस्तित्वाचा अभ्यास करावाच लागेल,*
**काहीही न कमावता केवळ विचारांमुळेच संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा,संत सावता महाराज, संत गोरोबाराय, संत गाडगेबाबा , हजारो लोकांच्या तनामनात आजही आहेत*
आणि हजारो कोटीहून जास्तीची संपत्ती असणारे कुणी बाबा बुवा तुरुंगात आहेत तर कुणी आयुष्यात त्रस्त आहेत, कशाचेही पाप नसेल तर भय वाटत नाही व भयमुक्त जीवन हाच मार्ग तुम्हाला ईश्वर असो किंवा नसो मात्र ईश्वर पदा इतके महान करतो ,त्यामुळे निराशा आणि भय हे कधीच बाळगून जगू नका !
**प्रेमाणे  रहा , प्रेम द्या प्रेम घ्या तुमच्या आयुष्याचे सार्थक होवून खर्या अर्थाने तुम्ही महान आहातच अजून महान झाल्या शिवाय रहात नाही !*
आणि हो आयुष्यात दुसर्यासाठी जगणे हाच खरा त्याग असतो !
लोकात मिसळा , लोकांना एकत्र करा ही पवित्र भूमीला तुमची गरज आहे ,
बलात्कार  , खून, दरोडेखोर यांची संख्या तुमच्या सारखे सज्जन शांतपणे पहात असतात म्हणून वाढते आहे केवळ शिवरायांचे नाव घेऊन भागणार नाही तर,
शिवरायांचे विचाराप्रमाणे न्याय निवाडे होण्यासाठी , लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो की, सामाजिक, धार्मिक कार्यात असो चारित्र्य संपन्न लोकांची गरज आहे व ति गरज तुम्हाला पुर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची आहे !
जो लोकशाहीचा शत्रू , जो भारतमातेचा शत्रू , जो गोरगरीब व कष्टकरी शेतकरी  यांचा शत्रू तोच आपला शत्रू ! मुळात कुठलाही जात, धर्म वाईट नसतो तर त्यातील अपप्रवृत्तीच शत्रू असतात!
म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचे अस्तित्व शोधा नक्कीच
या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त होईल
 विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९