मराठा आरक्षणाची गुंतागुंत! ! !
गेले कित्येक वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय, विविध ठिकाणी आंदोलन करतोय, शांततेच्या मार्गाने मुक मोर्चे निघाले मात्र हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही , काही मराठा बांधव हे मराठा आमदार, खासदार, मंत्री व समाजातील लोकप्रतिनिधी यांना दोष देत आहेत पण कुणालाही वस्तुस्थिती समजुन घ्यावी असे वाटत नाही , काही लोक, पक्ष व संघटना नुसते राजकीय लाभ उठवण्यासाठीही मराठा तरूणांचा निव्वळ वापर करत आहेत,
खरी परिस्थिती हीच आहे की ,
भाजपा व भाजपा विचारधारा ही आरक्षण विरोधी आहे , आजपर्यंतचा इतिहास बघितला तर लक्षात येते की, यांनी मंडल आयोगालाही विरोध केलेला आहे की , व्ही पी सिंग यांचे सरकार केवळ मंडल आयोगावरून पाडले गेले होते . त्यामुळे भाजपा राजवटीत कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळणार नाही . मग आरक्षण हा विषय समजून घ्यायचा असेल तर घटनात्मक गोष्टी समजून घ्याव्या लागतील, आरक्षण ओ बी सी कोट्यातून मागायचे असेल तर मागासवर्ग आयोगापुढे , मराठा समाजाला मागासलेपण सिद्ध करावे लागेल, व तसा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर करावा लागेल व तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला पाहिजे व मराठा समाजाचा समावेश मागास जातीत करावा अशी केंद्र सरकार कडे शिफारस करावी लागेल व केंद्र सरकारने ति शिफारस स्वीकारली पाहिजे तरच, मराठा समाजाचा आरक्षणाच प्रश्न सुटू शकतो , मात्र देशभरात असलेल्या ओबीसी जातींची लोकसंख्या विचारात घेता कोणतेही सरकार ओबीसी दबावामुळे असा निर्णय घेण्याची शक्यता नाही ! मग मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार?
हा मार्ग सुद्धा देश पातळीवर मराठा समाजाची लोकसंख्या विचारात घेता कठीण आहे पण आशेचा किरण म्हणून
आरक्षण मिळवायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा संसदेत कायदा करून, 2/3बहुमताने सदर कायद्याचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून
देशातील निम्या राज्याच्या विधानसभेत बहुमताने मंजूर करावे लागेल मात्र देशपातळीवर एकट्या मराठा समाजाचे काहिही चालणार नाही , त्या साठी
विविध राज्यातील मराठा समकक्ष लोकांना बरोबर घेऊन किमान १० ते १२ मोठ्या जाती बरोबर घेऊन हा लढा उभारावा लागेल व ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता वेगळा प्रवर्ग तयार करून हा प्रश्न सुटू शकतो मात्र त्या साठी देशपातळीवर मराठा समकक्ष, पटेल, गुज्जर, जाट, रजपूत यांना बरोबर घेऊन संघटन करावे लागेल!
केवळ मराठा आमदार, खासदार, मंत्री यांना शिव्या देवून चालणार नाही "
कोणताही राजकीय नेता केवळ जातीच्या मतावर निवडून येत नसतो व भविष्यात सुद्धा केवळ जातीवर निवडून येण्याची बिलकुल शक्यता नाही !
प्रत्येक नेत्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जातीच्या घटकांना बरोबर घेऊन चालावेच लागते!
आणि जे जे नेते स्वतःच्या जातीपुरते बघतात ते संख्यात्मक दृष्ट्या दोन चार पेक्षा जास्त नसतात, व त्यांना बर्याच मर्यादा असतात म्हणून कुणीही उठावे व आमदार खासदार यांना काहीही बोलावे अशी परिस्थिती नाही !
सर्वांनाच माहिती आहे की, बहुतेक मराठा समाज गरीबीत जीवन जगतोय, त्याचा मुख्य व्यवसाय शेती अडचणीत आणली गेली आहे , जमिनीची वाटणी झाल्याने जमिन फार कमी झाली आहे , त्यातून उत्पादन सुद्धा घटले आहे , ओपनसाठी शैक्षणिक फि भरमसाठ असल्याने शिक्षण अवाक्याबाहेर गेले आहे , उद्योग व व्यवसायात समाज नगन्य आहे , नोकरी नाही ,
यामुळे मराठा तरूण बेकारीच्या विवंचनेत आहे पण
याला दिशा न देता या तरूणांचा राजकीय लाभ करुन घेवून काही संघटना व समाजातील काही फक्त समाजाचे म्हणून काम करणारे नेते (सगळे नाही )स्वार्थ साधत आहेत!
बरेच बहाद्दर
कोण, ब्राह्मण समाजाला, कोण ओबीसी समाजाला, कोण मुस्लिम समाजाला , तर कोण, दलित समाजाला नावे ठेवत आहेत,
मुळात कुणाला नावे ठेवून हे प्रश्न सुटणार नाहीत
तर
समाजातील जाणत्या घटकांनी एकत्रितपणे काम करून, शिक्षण, उद्योग यात पुढे येऊन समाजातील कमजोर वर्गाला दिशा दिली पाहिजे , मदत केली पाहिजे !
केवळ कुणाला नावे ठेवून, कुणाच्या तरी नादी लागून समाजातील बेकारी कमी होणार नाही
व
आजच्या पेक्षाही परिस्थिती समाजाची वाईट होईल
. . . . . . .
मिळेल ते काम केले , व्यसनापासून दुर राहिले , लग्न किंवा इतर कार्यक्रमातील उधळपट्टी बंद केली तर बरेच प्रश्न मार्गी लागतील. . .
विजय पिसाळ नातेपुते

९४२३६१३४४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा