vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २० मार्च, २०१९

मोहिते -पाटील कुटुंबावर जनता जीवापाड प्रेम का करते ? मोहिते- पाटलांचे समाजकारण, राजकारण कसे आहे ! टीकाकार सुद्धा , अपप्रचार करणारे सुद्धा हा ब्लॉग वाचल्यावर समर्थक होतील तर वाचा संपुर्ण ब्लॉग नक्कीच सर्वांनाच अभिमान वाटेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण

आम्ही मोहिते पाटील समर्थक. . . . . 
वाचा श्री  विजय (काका) पिसाळ यांचे खास  लेखणीतून. . . होय आम्ही मोहिते पाटील समर्थकच का ? 
होय प्रत्येक जिल्हात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा  ठसा उमटवणारा नेता असतो अशा नेत्यामुळे त्या भागाचा व परिसराचा कायापालट होत असतो , त्यांच्या कामामुळेच त्याभागाला ओळख प्राप्त होत असते . .
तशीच ओळख सोलापूर जिल्हाला लाभली ति मोहिते पाटील परिवार व त्यांच्या कामामुळे , त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे . त्यांनी केलेल्या समाजिक व  राजकीय आणि सांस्कृतिक  कामामुळे ! 
 राजकारण असो,  समाजकारण असो, शिक्षण असो की सहकार असो, शेतीचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न असो या प्रत्येक क्षेत्रात आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे सोलापूर जिल्हा व आसपासच्या भागासाठी मोलाचे व फार मोठे  योगदान राहिलेले आहे, प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे , तरूण सक्षम झाला पाहिजे , दलित, मुस्लीम वंचित यांचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच भूमिका घेऊन आजवर मोहिते पाटील यांनी राजकारण समाजकारण केले आहे व त्यातून त्यांचे नेतृत्व फुलत गेलेले दिसून येते , संपूर्ण  मोहिते पाटील कुटूंबाला फार मोठा राजकीय वारसा लाभला आहे कै.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे बंधू यांची वाटचाल राहिली आहे किंबहुना ति त्यांनी जोपासली आहे. *जीवात जीवमान असे  पर्यंत जनतेची सेवा करू* हे सहकार महर्षींचे ब्रीद वाक्य! 
 आज सहकार महर्षींची तिसरी पिढी राजकारण व समाजकारणात काम  करत असताना तंतोतंत पाळत आहे.  
हीच तरूण  पिढी  राजकारणात व समाजकारणात  सक्रीय झाली असून या घराण्याची राजकीय व सामाजिक नेतृत्वाची धुरा आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर आलेली आपल्याला बघायला मिळते , रणजितसिंह मोहिते पाटील यांना  मोलाची साथ लाभते आहे ति आदरणीय, धैर्यशीलभैय्या, अर्जूनदादा, शिवबाबा,किर्तीदादा व राणूदीदी आणि  त्यांच्या नव्या पिढीतील संपुर्ण कुटूंबातील महिलांची ! 
सर्व वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे  . 
आदरणीय रणजितसिंहदादा 
 हे अभ्यासू , सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषीत  व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून पुढे येत आहेत. 
खर्या अर्थाने महाराष्ट्राला अशा सुसंस्कृत व निर्मळ मनाच्या  नेत्याची गरज नव्या राजकारणाला व महाराष्ट्राला  आहे . कारण हा महाराष्ट्र संस्कारी नेतृत्वाचा आहे, 
रणजितसिंहदादा हे पोटात एक, ओठात एक व कृतीत भलतेच  असे नेते नाहीत, तर त्यांचे वागणे बोलणे व चालणे हे प्रामाणिक, सचोटीचे व स्पष्ट पणाचे राहिलेले आहे. 
राजकारण करत असताना समोरच्याला प्रेम देणे त्याला जवळ करणे हा त्यांचा गुण सर्वसामान्य जनतेला मनापासून  भावतो . . 
असंख्य नेते  राजकारण करत असताना आपली पोळी भाजण्यासाठी विविध डावपेच रचत असतात,  कटकारस्थान करत असतात,  कपटी राजकारण करत  असतात, एकमेकांना संपवू पहात असतात,कार्यकर्त्याला मोठे होऊ देत नाहीत, खच्चीकरण करत असतात  मात्र या राजकारणातील प्रवृत्ती पासून रणजितसिंह हे पुर्णपणे अलिप्त आहेत. एखाद्याला जवळ घेऊन त्याला बेसावध करून वार करणारी प्रवृत्ती राजकारणात फोफावत असतानाच रणजितसिंह हे याला अपवाद आहेत. कार्यकर्ताला  जपून प्रेम देणे, त्याला ताकद देणे, त्यावर विश्वास ठेवणे  हे शिकायला मिळते ते केवळ रणजितसिंहदादा कडून त्यांच्या  जवळ गेल्यावरच. ..आजवर 
 मोहिते पाटील 
 घराण्याची वाटचाल व राजकारण महाराष्ट्रातील जनतेने जवळून पाहिले आहे . पक्ष कोणताही असो , पक्षाची सामाजिक व वैचारिक जडणघडण कशीही असो मोहिते पाटील यांच्या लेखी फक्त विकासाला महत्व आहे . पक्षाचा व सत्तेचा वापर केवळ आणि केवळ जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे हीच सहकार महर्षींची शिकवण पाळण्याचे काम अविरतपणे या कुटुंबाकडून चालू आहे . 
मोहिते पाटील  कुटुंबाची वाटचाल फक्त लोकांची कामे करणे व लोकांच्या कामासाठी वाट्टेल तो त्याग करणे हीच राहिलेली दिसून येते , त्यामुळेच  मोहिते पाटलांचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान वाटतो ! 
 सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मोहिते पाटील कुटुंबात घरातील सदस्या प्रमाणे वागणूक मिळते त्यामुळेच त्यांच्याकडे असंख्य  लोक आकर्षित होतात व  त्यांच्यावर प्रभावीत होतात. 
खरेतर मि तसा पुर्णपणे पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता! आपला धर्म जपत असताना, आपल्या धर्माची , संस्कृतीची,  परंपरेची , जोपासना करत असतानाच  इतर जाती  धर्मातील  लोकांचा आदर केला पाहिजे या मतांचा मि पाईक! 
 मानवी जीवन हे जात,  धर्म, पंत, भाषा,  याही पलिकडे सर्वसमावेशक असले पाहिजे ही आमची विचारधारा राहिलेली आहे . 
आम्हाला  टोकाची  धर्मांधता कदापि मान्य नाही . 
धर्मांधता 
 या  विचारांच्या विरूद्ध असणारी माझी  वैयक्तिक मते व माझ्या  जीवनावर छत्रपती शिवराय, फुले , शाहु , आंबेडकर आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा  असणारा प्रभाव व   संस्कार  मनावर खोल रूजला आहे . एक सामान्य युवक म्हणून काम करत असताना मोहिते पाटील परिवार सुद्धा कोणत्याही पक्षात काम केले तरीदेखील सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याची भूमिका कधीच बदलणार नाहीत हाच विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांनी कोणताही पक्ष निवडला तरी मोहिते पाटील कुटूंबावरील प्रेम कदापि कमी करणार नाही . सहाजिकच  आज मोहिते पाटील परिवाराने भाजपा मध्ये प्रवेश केला आणि असंख्य लोकांचे मेसेज आले , फोन आले कित्येकांनी सोशल मिडीयात आमच्या बद्दल मतेही मांडली टीका टिप्पणी केली  पण या सर्वांना मि एकच उत्तर दिले व देऊ इच्छितो की,  मोहिते पाटील परिवार हा विकासाचा कणा आहे व सोलापूर जिल्हाचा ब्रॅण्ड आहे आणि महाराष्ट्रातील मोजक्‍या विकासाचा वारसा पुढे चालवणार्या  परिवारा पैकी एक  आहे,  याच दृष्टीकोनातून 
  आम्ही त्या कुटूंबाकडे पाहतो . त्यामुळेच संपुर्ण जिल्ह्याला या कुटूंबाचा अभिमान वाटतो व त्यामुळेच  मोहिते पाटील परिवारावर प्रेम करत असताना माझे सर्व जातीधर्मातील सहकारी व मावळे या परिवारा बरोबर  शेवटच्या श्वासापर्यंत  नक्कीच राहतील यात तिळमात्र शंका नाही . . 
१९९९ साली खूप मोठ्या विश्वासाने  आदरणीय विजयसिंह दादांनी आपल्या असंख्य सहकार्यांना सोबत घेऊन पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता . पक्ष वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता . . 
आणि त्यामुळेच काही पदे त्यांच्याकडे चालून आली होती उपकार म्हणून नव्हे , पण तरीही पक्षातील काहींना मोहिते पाटीलांचे वर्चस्व सहन झाले नाही म्हणून सतत डावपेच आखून खच्चीकरण चालू केले व 
आज मोहिते पाटील परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेसमधील घुसमटीला ,जाचाला ,  अन्यायाला  कंटाळून भाजपात प्रवेश करायचा निर्णय केला ! 
 आम्हाला विश्वास आहे की, मोहिते पाटील यांचे राजकारण व समाजकारण कोणत्याही पक्षातून चालू राहिले  तरीदेखील संपुर्ण मोहिते पाटील परिवार कालही , आजही व भविष्यातही सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालू राहील, व यापुढेही  सर्वांनाच  बरोबर ठेवेल, व भविष्यातही सर्व जाती धर्मातील लोक सोबत राहतील यात तिळमात्र शंका असायचे कारण  नाही , सहकार महर्षी हे  शेकाप मध्ये होते व नंतर    काँग्रेस मध्ये असतानाही  मोहिते पाटील परिवाराने ,  ब्राह्मण असो दलित, मुस्लीम मराठा , धनगर,साळी , माळी , कोळी , आदीवासी भटके ,  अशा सर्व आठरापगड जाती व बारा बलुतेदार यांना बरोबर घेतलेले आहे. कोणताही  कधीच भेदभाव केला नाही.  त्यामुळे यापुढेही तेच काम हा परिवार करत राहिल हे नक्की . . . 
म्हणून आपण सर्वांनीच आजवर जे प्रेम मोहिते पाटील कुटुंबावर केले आहे तेच यापुढेही करायचे आहे . अगदी आपली संस्कृती व विचारधारा जपून. . 
प्रत्येक जिल्हयात स्वतःच्या नेतृत्वाला मोठे केले जाते जपले जाते  कारण  नेता मोठा  झाला तरच त्या त्या भागाचा विकास होतो !  राज्य व केंद्रीय पातळीवरील भरपूर निधी आणता येतो , आपल्या नेत्याला पाठबळ दिले तरच  नेत्याची मान ताट होते राजकीय दरबारात वजन वाढते व नेत्याच्या शब्दाला किंमत प्राप्त होते . 
आजवर जनतेने कै सहकार महर्षी व आदरणीय दादासाहेबांना जे प्रेम दिले पाठिंबा दिला व त्याच लोकांच्या पाठिंब्याच्या बळावर आदरणीय दादासाहेबांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात वजन प्राप्त झाले म्हणून या भागात असंख्य योजना आल्या ,  व अगणित  विकासकामे सत्ता असो किंवा नसो होत गेली . 
म्हणून यापुढेही आपल्या नेत्याची ताकद वाढवण्यासाठी नव्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी रणजितसिंहदादांच्या  व त्यांच्या बंधूंच्या पाठिशी ठाम उभे रहाण्याची गरज आहे . 
परकीयांची चाकरी ज्या  प्रमाणे छत्रपती शिवरायांनी केली नाही सुरूवातीला छोटे का असेना पण स्वकियांचे,  रयतेचे राज्य निर्माण केले  त्या प्रमाणेच कुणाचीही चाकरी न करता पश्चिम महाराष्ट्राचा व विशेषतः सोलापूर आणि माढा मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी , शाश्वत  विकासासाठी आदरणीय  रणजितसिंहदादांच्या  पाठिमागे ठाम उभे राहण्याची भूमिका आपण घेऊया . . त्यातच आपले हीत आहे . तसे बघितले तर 
मोहिते पाटलांच्या गढीवर एकेकाळी पाणी भरणाऱ्या व मोहिते पाटलांच्या जीवावर मोठे झालेल्या आणि इथेच परत  गद्दारी करून  व सध्या फितूर झालेल्या फुटीरांचे मनसुबे उधळून लावूया हीच मला सर्वांनाच कळकळीची विनंती करायची आहे . 
श्री विजय (काका) पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

सोमवार, १८ मार्च, २०१९

मा. श्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब, जनता तुमच्या निर्णयाची वाट पहात आहे, मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणार्‍या जनतेला या राजकारणाचा व कट कारस्थानांचा विट आलाय, आता निर्णय घ्या !

चालू घडामोडींचे विश्लेषण
दादासाहेब शांत बसू नका . . . 
जनता आता तुमच्या निर्णयाची वाट पहाते आहे . . . 
विजय (काका) पिसाळ नातेपुते यांच्या लेखनीतून! 
बांधवांनो पुर्ण  वाचा व  जागे व्हा ! 
२०१४ साली मोदी लाट असताना भल्या भल्यांची जीरली कित्येक मजबूत गड व बुरूज ढासळले  असंख्य मातब्बरांचा  पालापाचोळा होऊन ते हारले,  राजकारणातून संपले !  काहींनी तर चक्क रणांगणातून  लढाईतून पळ काढला . . .  पण त्याही  वादळात लाट परतवून लावली ति फक्त आणि फक्त मा श्री  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांनी . समोरचा गडी होता भावनेला हात घालणारा ,   रान पेटवणारा,  भाषणबाजीत पटाईत असणारा, हा  गडी सुद्धा चारीमुंड्या चित केला . . . 
 होय सदाभाऊला अस्मान दाखवले  आणि विजयसिंह मोहिते पाटील तथा  दादासाहेब असंख्य  घरभेदी असतानाही विक्रमी मतांनी निवडून आले. कदाचित पक्षांतर्गत विरोधकांना  याचे खूप वाईट वाटले असणार? 
 . . . 
दादासाहेब जिंकले कारण दादासाहेबांना लाभलेले जनसामान्य  जनता जनार्दनाचं  प्रेम ..
दादासाहेब जरी पट्टीचे व फर्डे वक्ते नसले तरीही  मोजके व कामाचे बोलतात ,बोलण्यात तळमळ असते व स्वच्छ आणि प्रामाणिक भावना असते ! 
 कदाचित  भाषणात थोडेफार कमी असले तरीही  कामाच्या जोरावर त्यांनी जनमानसात  आपले आपुलकीचे   स्थान निर्माण केले आहे.. भाषणबाजी करत बसण्यापेक्षा कामं करत रहाणं हा दादासाहेबांचा स्थाईभाव आहे..
गेल्या पाच वर्षात संसदेत 
महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मध्ये दादासाहेबांचे काम असताना सुद्धा . . . पवार साहेबांवर निष्ठा व निवडून येण्याची क्षमता असतानाही,  तसेच  विद्यमान खासदार असतानाही 
 पवार साहेबांनी विनाकारण 
प्रभाकर देशमुख यांना कामाला लावले तसेच,  दीपक साळुंखे  , बबन शिंदे, रश्मी बागल यांचे चुकीचे ऐकुन म्हणा किंवा गैरसमज होऊन म्हणा दादासाहेबांना पराकोटीचा त्रास दिला . . . 
 प्रभाकर देशमुखांना मतदारसंघात फिरायला सांगून संभ्रम निर्माण केला ,,वातावरण गढूळ केले,  राष्ट्रवादी साठी सेफ व अनुकूल असणारा मतदारसंघ हातानेच  प्रतिकूल करून ठेवला . . प्रभाकर देशमुख किंवा इतर कोण चालत नाही असे दिसताच स्वतःच्या उमेदवारीचे  घोडे दामटले, जनमताचा अंदाज न घेता , विजयदादांनीच मला उभे राहण्याचा अग्रह केल्याचा बनाव निर्माण केला , तरीदेखील निष्ठावंत दादासाहेबांनी साहेबांच्या विरूद्ध एक शब्द काढला नाही, 
 मात्र इथला स्वाभिमानी मतदार पेटून उठला , उठाव करू लागला दादासाहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस साहेबांच्या कुटील डावामुळे हैराण झाला , जनमत विरोधात गेल्याची  जाणीव झाली व मग साहेबांनी  माघार घेतली . . यात मोहिते पाटलांचा काय दोष! 
हे रामायण घडत असताना  पुलाखालून बरेच पाणी वाहिले . . . 
पुलाखालून पाणी वाहिल्या नंतर परत दादासाहेबांनाच उभे रहाण्याचा आग्रह केला  गेला . ..पण मनातुन दुःखावलेले दादासाहेब लढायच्या मुडमध्ये नव्हतेच. . . 
पण तरीही दादासाहेबांनी झाले गेले विसरुन नम्रता व साहेबांचा  मान राखून रणजितदादांसाठी तिकिट द्या अशी मागणी केली पण परत तिच -ती तकलादू कारणे पुढे करून निर्णय प्रलंबित ठेवला गेला . . . 
निर्णय प्रलंबित का ठेवला  
 तर  पक्षांतर्गत कुरघोडी ... जे निष्ठावंत नाहीत त्यांचे ऐकणे ,  यामुळेच  वातावरण गढूळ होऊन  गेलं.. ज्या  विजयदादांनी पक्षासाठी व साहेबांसाठी त्यागाची सदैव भूमिका घेतली,  साहेबांचा  प्रत्येक शब्द प्रणाम मानला तिथेच वारंवार  अशा पद्धतीने अवहेलना केली गेली . .  गेली अनेक  वर्ष  सरपंच, जि. प अध्यक्ष,  मंत्रीपदावर, आमदार,ते उपमुख्यमंत्री ,  खासदार,  असल्यापासून जी  कामे केली , जनतेशी नाळ जोडली,  लोकांमध्ये प्रेम मिळवले  व पक्षासाठी कास्था  खालल्या त्याचाही पक्षाने विचार करू नये या पेक्षा आश्चर्य ते काय असू शकते . . 
दादासाहेबांनी उभ्या आयुष्यात सत्ता  कधीच  भोगली नाही तर  सत्तेचा  वापर जनतेसाठी तन मन धनाने केला व  पक्षासाठीही खूप काम केले , 
खरेतर  त्यामुळेच  त्यांचा  मतदारसंघावर प्रथम हक्क होता व आहे . आणि राहिल. . . 
कामाच्या जोरावरच मतदारसंघावर  मजबूत पकड सुद्धा ठेवली  आहे . 
असे असताना नवीन पिढी राजकारणात सक्रिय होत असताना व नव्या पिढीला संधी देण्याची भूमिका असताना , रणजितदादांसाठी तिकीट मागितले तर काय चुकले , रणजितसिंहदादा हे  दादासाहेबांचे नुसते सुपुत्रच नव्हे तर एक उमेदे नेतृत्व म्हणून तरी संधी मिळाली पाहिजे ही लोकभावना आहे.  रणजितसिंहदादांना एक हुशार संघटक म्हणून आणि तरुण रक्ताला म्हणून तरी वाव द्यायला हवा होता . . . 
नवखे पार्थदादा केवळ घरातील म्हणून चालतात? 
पण रणजितसिंहदादा नकोत? 
 पक्षाशी एकनिष्ठ नसणार्या व कानफुकण्यात हातखंडा असणार्‍या लोकांचे ऐकून साहेबांनी रणजितसिंहांच्या उमेदवारीचा  निर्णय घेतला नाही . . याचेच लोकांना  खूप वाईट वाटले . . 
ज्या रणजितसिंहांनी पक्षाच्या बांधनीसाठी जीवाचे रान केले , पक्ष चांद्या पासून बांद्या पर्यंत वाढवला  त्यांनाच अशी वागणूक असेल तर पक्षासाठी कोण काम करेल?  सामान्य कार्यकर्ता कसा जोडला जाईल. . . आज माढ्यातील  जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे . . भयंकर चिड आहे . . 
काही पत्रकार व मिडीयाला हाताशी धरून मोहिते पाटील कुटूंबाची जी  बदनामी करण्याचा कुटील डाव खेळला जातोय  त्याचा तर विट आलाय पण या मतदारसंघातील जनता हे कुटील कारस्थान व  डाव निश्चितपणे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही . . 
मोहिते पाटील घराणे हे ब्रँड असून ब्रँड संपत नसतो व तो संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही त्याची झळ निश्चितपणे लागल्या  शिवाय राहणार  नाही . .  
 असल्या खेळ्यामुळे  जनतेमध्ये व  मतदारांमध्ये खूप मोठा रोष राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या विरोधात निर्माण होत आहे. 
  इथल्याच  काही फितूर लोकांमुळे सोलापुर जिल्ह्याचे  गेल्या दहा वर्षांत  खूप मोठं नुकसान झालं  आहे व याची जाणीव संपुर्ण सोलापुरच्या जनतेला झाली आहे , 
त्या गद्दारांना जनताच धडा शिकवेल, 
आमच्या लोकप्रिय नेतृत्वाची अवहेलना व होत असलेली  मुस्कटदाबी इथली जनता कदापि सहन करणार नाही , त्याची   सव्याज परतफेड  करेल हे मात्र निश्चित आहे . . जनमानसात तिव्र प्रतिक्रिया आहेत  सामान्य लोक म्हणतात. . आजवर 
जीतकी  मुस्कट दाबी झाली आहे , जीतका त्रास झाला आहे ! 

 आता  बसं झाले , अती झाले , पुरे झाले  ! 
मोहिते पाटील हे नामांकित घराणे सोलापूर जिल्ह्याची शान व अभिमान आहे . 
 त्यांना दिला जाणारा त्रास जनता उघड्या डोळ्यांनी पहाते आहे. . काही इथले बेईमान मोहिते पाटीलांनी मोठे केलेले कोल्हे आज साहेबांचे कान भरतात व साहेब त्यांना जास्त सिरियस  घेतात हेच विशेष आहे , पण त्यामुळे पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे त्याचं काय? यांना
पक्ष वाढवायचा का संपवायचा ! हेच कळत नाही . . 
राजकारणात एखादं नामांकित घराणे  संपवण्याचा  कुटील डाव आखला जातो  त्यावेळी मात्र स्थानिक जनता त्या घराण्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी रहाते . . हा इतिहास आहे , विलासराव देशमुख, अनंतराव थोपटे , पृथ्वीराज चव्हाण,  सदाशिव मंडलिक, व अशी  असंख्य घराणी संपवण्याचा अयशस्वी प्रयोग केला गेला पण ठरावीक  काळानंतर ही घराणी परत जोमानं उभी राहिली कारण तिथल्या जनतेला परकं कोण आपलं कोण यातील फरक लवकर कळतोच!   इथल्याही जनतेला नक्कीच कळेल. . . महाराष्ट्रातील 
 स्थानिक जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी  राहीलीच ..
मोहिते पाटील कुटूंबातील कोणीही  कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी त्यांचा विजय हा निश्चित होईल कारण इथली जनता स्वाभिमान जपल्या शिवाय राहणार नाही . . 
 माढा मतदारसंघातील जनता दादासाहेबांना व रणजितसिंहदादांना विनंती करतेय की ,,राष्ट्रवादीने तिकीट दिले तर ठिकच पण विनाकारण तिकीट नाकारले तर मात्र कोणत्याही पक्षातून उभे रहा कारण आमचा आता मोहिते पाटील हाच पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला निवडून यायला काहीच अडचण येणार नाही . . अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनता पेटून उठेल व 
प्रचंड मतांनी मोहिते पाटील घरातील कुणीही असले तरी निवडून येईल  हे निश्चित आहे . 
विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब  यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व मोहिते पाटील परीवारावर निष्ठा ठेवणारा एक कार्यकर्ता . . . . म्हणून हा 
लेखन. . . प्रपंच! 
श्री विजय(काका )पिसाळ नातेपुते ९६६५९३६९४९

शनिवार, १६ मार्च, २०१९

पवार साहेबांना खुले विनंती पत्र! वेळेत रणजितसिंहांच्या उमेदवारीचा निर्णय घेऊन, तातडीने सर्वांनाच कामाला लागायचे आदेश द्या !

चालू घडामोडींचे विश्लेषण
साहेबांना खुले पत्र. . . . 

आदरणीय साहेब होय. . . 
आदरणीय. . . 
मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब. . . . 
सप्रेम नमस्कार. . . साहेब 
खरेतर तुमचे आचार विचार व अफाट काम करण्याची शक्ती तुम्हाला  जनतेच्या प्रश्नांची असणारी जाणीव, काळानुसार अचूक व योग्य निर्णय घेण्याची तुमची  क्षमता ! 
 राजकीय क्षेत्रात बहुतांश  नेत्यांकडे सभ्यता नसते मात्र तुमच्याकडे राजकारणात असूनही  राजकारणातील पराकोटीची  सभ्यता आणि माणसे जोडण्याची तुमची अफलातून कला या व अजून असंख्य गुणांमुळे तुम्हाला जनतेत   , जानते राजे, चाणक्य, तेल लावलेले पैलवान अशा नानाविध विशेषणांनी तुमचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. . 
देशातील जी मोजकी सर्वमान्य व सर्व पक्षातील लोकांशी स्नेह जपणारी माणसे आहेत, यातही तुमचे स्थान सर्वोच्च असेच आहे . ..शेती , सहकार, शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक  अशा विविध क्षेत्रात तुमचे काम अतिउच्च व तेजोमय असे आहे . या तुमच्यातील असंख्य गुणांमुळे आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि त्यामुळेच अगदी लहानपणापासून तुमचे चहाते झालो,  कार्यकर्ते झालो , तुमच्या विचारांनी प्रभावीत झालो . . तुम्ही पंतप्रधान व्हावे हे आम्हाला  मनोमन वाटू लागले व ते आमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला हीच योग्य  वेळ आली आहे . . . 
त्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक एक जागा महत्वाची आहे हे तर सर्वजण आपण जाणतो . . . 
तरीही आपल्या पक्षात विविध ठिकाणी गटबाजी उफाळून येते ति गटबाजी एका क्षणात संपवायची तुमची क्षमता आहे व तुमच्या शब्दाबाहेर पक्षात कुणी असायचे कारण नाही . . . 
अशाच माढा लोकसभा  मतदारसंघात असलेल्या किरकोळ गटबाजी बद्दल तुम्हाला हे कळकळीचे पत्र लिहावे असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. . . 
आदरणीय साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस हे एक घर असून, 
 घराचे कुटूंब प्रमुख तुम्ही आहात सहाजिकच घरातील किरकोळ कुरबुरी , एखाद्या दुसर्‍या सदस्यांची शुल्लक भांडणे व तक्रारी तुमच्याकडेच येणार हेही खरे आहे  , काही सदस्य दुसर्‍या सदस्या बद्दल तक्रारींचे सुर आवळणार व त्या तक्रारींचे निराकरण सुद्धा तुम्हालाच करावे लागणार. . 
जवळपास, कोल्हापुर, सातारा , शिरूर, बीड, मावळ,अशा बहुतांश  मतदारसंघातील तक्रारींचे निराकरण तुम्ही लिलया  केले व सर्वांनाच निवडणूक  कामाला लावले . . 
महाडीक असतील,  उदयनराजे असतील यांना तर त्या ठिकाणी टोकाचा विरोध असतानाही तो विरोध मोडून काढून तिथला तिढा  तुम्ही सोडवला . . . 
माढ्यात मात्र तुमचे असे कोण आहे की ते ऐकत नाहीत. . 
पक्षाच्या विरूद्ध लढून सुद्धा संजय शिंदे   आमदार बबनदादा  यांच्या इच्छेनुसार  जि प अध्यक्ष झाले , पक्षाच्या  अधिकृत सदस्यांनी संजयमाला मदत केली . . 
त्याहीपुढे जाऊन संजय शिंदे व परिचारक, जानकर, यांनी दीपकआबाचा  विधानपरिषदेत पराभव केला . . तरीदेखील तुम्ही त्यांना दापले नाही . . तरीदेखील आम्हाला वाटायचे साहेब योग्यवेळी काहीतरी निर्णय घेतील व गटबाजी संपून जाईल, व परत एकदा पक्ष सोलापूर जिल्ह्यात पुर्वी सारखा एकसंघ होईल  . . . 
पण गटबाजी थांबली नाही . . 
तुम्ही ज्यांना भरभरून दिले तेच पक्षांपुढे आव्हान उभे करू लागले . . 
या परिस्थितीत जनतेत जनाधार असलेले , जनतेत खरे  प्रेम असणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा आदरणीय दादासाहेब तुमच्याशी व पक्षाशी निष्ठा ठेवून राहिलेले एकमेव नेते आहेत. 
आज दादासाहेब असो की तुम्ही असो , 
दोघांनाही वाटतेच ना आपली पुढची पिढी आता संसदीय राजकारणात यावीत. . 
नव्यानेच पक्षात सक्रिय झालेले पार्थदादा असोत की रोहितदादा असोत हे उमेदवारी करत असताना व तरूणांना वाव द्यायची तुमची भूमिका असताना या वेळेस रणजितसिंहांना तुम्ही उमेदवारी दिली तर काय हरकत आहे . . 
आज बबनदादांना आमदार होण्यासाठी  माढा विधासभा आहे , रश्मींना करमाळा आहे पण माळशिरस राखीव असल्यामुळे रणजितसिंहांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना लोकप्रतिनीधी म्हणून कुठून तरी वाव मिळायला हवा  म्हणून सगळे लोक व तरूणवर्ग त्यांची उमेदवारी मागत आहेत. . 
आजवर रणजितसिंहांनीही पक्ष वाढीसाठी योगदान दिले आहे . . झोकून देऊन काम केले आहे . .  याचाही विचार तुम्ही करायला हवा. . 
निवडून यायची क्षमता या  जर निकषावर उमेदवारी द्यायची असेल तर रणजितसिंह परफेक्ट विजयी उमेदवार होऊ शकतात. . 
कारण मोहिते पाटील परिवाराला मानणारा संपुर्ण चाहता वर्ग आज माढा लोकसभा क्षेत्रात आहे व राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र ताकद लागली की रणजितसिंह हे दोन लाखांवर मतांनी निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही . . 
आणि गटबाजीचे म्हणाल तर तुम्ही सर्वांनाच  एकत्र बसवून तुमच्या खास शैलीत कामाला लागा हा आदेश वडीलकीच्या व कुटूंब प्रमुख म्हणून दिला की माढ्याचा तिढा सुटला म्हणून समजा . . . 
पण या साठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे . 
रश्मी बागल, बबनदादा व दीपकआबा यांना समजावून सांगितले पाहिजे , पक्ष वाचायचा असेल तर गटबाजी थांबवा . . . तरच गटबाजी थांबून सर्वजण कामाला लागतील. . . 
साहेब,  विजयसिंहदादांनी राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यापासून तुम्हाला साथ दिली आहे . . सोलापूरात व पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पडत्या काळात तुमच्या पाठिमागे खंबीरपणे  शक्ती उभी केली आहे . . कधीही तुमचा जाहीरपणे किंवा छुपा  विरोध केलेला नाही . 
पक्षाचे काम करत असताना मिळेल ति जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे , 
खरेतर तुमच्यावरील निष्ठा कधीच तुसभरही ढळू दिली नाही . . 
खरेतर विजयसिंहदादांसाठी व रणजितसिंहांसाठी माढा जिंकणे ही गोष्ट अवघड नाही . . 
गेल्या वेळी पेक्षाही यावेळी अनुकूल स्थिती आहे . . 
एकटा माळशिरस विधानसभा क्षेत्रात रणजितसिंहांना ९० हजारापेक्षा जास्त लीड निश्चित मिळेल यात शंका नाही . . 
मात्र काही जणांच्या किरकोळ तक्रारीमुळे रणजितसिंहांची उमेदवारी नाकारली गेली तर या ठिकाणी भावनिक मुद्दा होईल व जनतेत अन्यायाची भावना तयार होऊन पक्षाच्या विरोधात नकारात्मक वातावरण होईल. . पाठिमागे कारण नसताना एकनिष्ठ सदाशिव मंडलिक यांना डावलल्यामुळे हातचा कोल्हापुर गेला होता . . 
तसे व्हायचे नसेल तर गटबाजी पेक्षाही निवडून यायची क्षमता याच बेसवर रणजितसिंहांना उमेदवारी द्या ही विनंती . . 
आणि प्रत्येकाला कामाला लावा तरच सोलापुर जिल्हातील सगळे विधिसभा मतदारसंघ व जिल्हा परिषदेवरील सत्ता परत मिळवता येईल. 
पक्षातील बेकीचा फायदा विरोधकांना होवू नये व हातचा मतदारसंघ जावू नये यासाठीच तरूण अभ्यासू व निष्ठावंत रणजितसिंहांनाच तुम्ही उमेदवारी द्याल हीच अपेक्षा ! 
विजय पिसाळ नातेपुते . 
ता . माळशिरस. .

गुरुवार, १४ मार्च, २०१९

लढाई लढूया आर या पार ! करूया रणजितदादांना खासदार

चालू घडामोडींचे विश्लेषण

मन लावून वाचा नक्कीच डोक्यात प्रकाश पडेल. . . 
विजय पिसाळ नातेपुते . 
९६६५९३६९४९. . . . . 
आता निवडणूक अशी लढाईची , पायाला भिंगरी बांधून, मिळेल ति चटणी भाकरी खाऊन, गावोगावी जाऊन, वाड्यावस्त्या फिरून, एकमेकांचे हातात हात धरून, 
तन मन धन लावून. . 
सर्व काम धंदा थोडाकाळ बाजूला ठेवून. . . . 
जीवाचं रान करून. . . 
समोर हत्ती असो की, कोल्हा असो की, लांडगा असो माघार नाहीच. . . 
आता लढायचं . . . 
कारण मोहिते पाटील हे जनमानसातील सिंह आहेत हेच दाखवून देऊ. . . 
कारण मोहिते पाटीलांनी आपल्यासाठी न मागता खूप काही दिलं आता त्यांच्या साठी झोकून द्यायचं . . . 
राजकारणात मोहिते पाटलांनी मोठी केलेली असंख्य माणसांपैकी थोडीफार गद्दार बेईमान झाली तरी सामान्य कार्यकर्ता आजही मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करतो व हेच प्रेम आता खर्या अर्थाने कृतीतून दाखवून द्यायची वेळ आली आहे . . . 
मोहिते पाटीलच का ?  व त्यांचाच प्रचार कशासाठी . . . 
खेडोपाडी केलेले रस्ते आठवा . . . 
गावागावात दिलेले सभामंडप आठवा . . . 
जागोजागी उभे राहिलेले एस टी पीकअप शेड बघा . . 
हायमास्ट दिवे . . बघा . 
जागोजागी उभी राहिलेली वीज उपकेंद्रे . 
गावागावातील  प्राथमिक आरोग्य केंद्र. . . पहा . . 
वाड्यावस्त्यावर केलेले , खडीकरणाचे व डांबरी  रस्ते . . . 
पिण्याच्या पाण्याच्या बांधून दिलेल्या टाक्या  दिसतात . . 
मोठ्या शहरातून 
भुमीगत गटारे  केली . . . 
विविध तिर्थक्षेत्रांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला . . . 
कधी नव्हे इतकी घरकुलांची कामे करण्यात आली . . . 
डाळींब, कांदा, भाजीपाला , केळी यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली . . पंचायत समितीचे माध्यमातून गरीब व गरजू महिलांना 
शिलाई मशीनीचे वाटप., सायकली वाटप  ..केले. . . 
खते बियाणे औजारे वाटप. . . . एच टी पी पंप. . छोटे टॅक्टर  , पॉवर टिलर यांना दिलेले अनुदान. . . 
पाण्याचे नियोजन. . . 
रेल्वेचा प्रश्न. . 
महामार्गांचे प्रश्न. . . . 
बाजार समितीचे माध्यमातून लोकांना हक्काची मिळवून दिलेली बाजारपेठ. . . 
छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांसाठी उभे केलेले शेकडो गाळे. . . 
हे करत असतानाच. . . . 
कित्येकजणांना विविध कामाच्या  शिफारसी दिल्या . . 
योग्य ठिकाणी सोयीनुसार  बदल्या तात्काळ करून दिल्या . . . 
छोटे मोठे ठेकेदारांना कामे मिळवून दिली . . 
वीटभट्टी धारकांचे प्रश्न असो  वाळूचे , प्रश्न असो . ते सहज  सोडवले ! 
वाड्यावस्त्यावर शाळांसाठी इमारतीं दिल्या . . . 
पोलिस स्टेशन. . . 
तहसील ऑफिसमधील कामे. . . 
प्रांत ऑफिसमधील कामे , 
आर टी ओ ऑफिसमधील कामे , तातडीने सोडवली . . . 
हे सर्व फक्त आणि फक्त जनतेच्या व आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर केले सक्षम लोकप्रतिनीधी म्हणून 
राज्यातील प्रत्येक योजना मतदारसंघात प्रथम आणली . . . . 
त्यामुळे आपली जबाबदारी आहे. . . 
अशा नेतृत्वासाठी आता नाही पळणार तर कधी पळणार व कधी फिरणार. . . 
मि लिहलेली कामे फार मोठी आहेत व या ठिकाणी  मोजकीच लिहली आहेत. . . 
अजून ही यादी खूप मोठी आहे . . . 
फक्त त्याकडे बघण्याचा लोकांचा  दृष्टीकोन 
सकारात्मक करायची जबाबदारी आपली आहे . . . 
आहो इथक्या धावपळीत वेळात वेळ काढून, आपली लग्ने, वास्तुशांती , व कधीकधी घडणारे दुःखद प्रसंग या ठिकाणी सुद्धा मोहिते पाटील कुटूंबातील सदस्य धावून येतात. . ..सहभागी होतात. .  म्हणून 
विचार करा जास्तीत जास्त प्रचार करा. . . 
काही बाजारबुनगे नक्कीच आडवे चालणार पण त्यांचा विचार करू नका   . . . . 
माढा लोकसभा व माळशिरस विधिसभा आणि संपूर्ण सोलापुर जिल्हा प्रगतीच्या वाटेवर असाच ठेवायचा असेल तर आता ही लढाई आपल्यालाच लढावी लागेल. . . म्हणून २०१९ ची 
लोकसभा जिंकावीच लागेल. . . . 
विजय पिसाळ नातेपुते . . . . 
९६६५९३६९४९
९४२३६१३४४९

बुधवार, १३ मार्च, २०१९

विकासाची तळमळ असणारे युवा नेतृत्व मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण


विकासाची तळमळ असणारं युवा नेतृत्व. . . . 
मा श्री रणजितसिंह मोहिते- पाटील. . . . . . 
लेखन. . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९६६५९३६९४९/९४२३६१३४४९
महाराष्ट्रातील जिकाही  मोजकी घराणी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपाला आली, जनसामान्य लोकांची तारणहार झाली ,   त्यामध्ये अकलूजचे  सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांच्या घराण्याचा समावेश होतो . . . 
संबध सोलापूर जिल्हा व  महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय राजकारणात या घराण्याची चर्चा होत असते.  सत्तेची विविध पदे या घराण्याकडे,  घराण्यात निर्माण झालेल्या कर्तृत्वान पुरूषांमुळे चालून आली या घराण्यात अनेकांना , सरपंच, सभापती , जि.  प.  अध्यक्ष, आमदार, खासदार, व मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ,  देश पातळीवरील सर्व दिग्गज नेते या ना त्या कारणाने अकलूज परिसराचा  व माळशिरस तालुक्यातील झालेला विकास पाहण्यासाठी येत असतात. . या ठिकाणी  राजकीय चर्चा भेटीगाठी व अकलूजचा आशीर्वाद मिळावा म्हणून असंख्य कार्यकर्ते आपल्या नेत्याला भेटायला येत असतात. . 
सहकार महर्षींनी जो विकासाचा मार्ग आखून दिला त्याच मार्गाने सहकार महर्षींचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय मा. श्री. विजयसिंह मोहिते -पाटील यांनी  कारभार केला त्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांच्या सर्व बंधूंनी त्यांना मोलाची साथ दिली, त्यामुळे माळशिरस तालुक्याचे नंदनवन झाले . . . एकेकाळी 
माळाचं शिर असणारा तालुका . . . 
कारखाने, दुध संघ, फळबाग, ऊसाचे मळे , द्राक्ष, डाळींब, भाजीपाला , याने समृद्ध झाला , विविध गुणवत्तापुर्ण  शिक्षण देणार्या शिक्षण  संस्था , सहकारी संस्था , यामुळे लोकांच्या जीवनात खर्या अर्थाने सुबत्ता याच घराण्याने आणली . . . 
अशा कर्तृत्वान, कार्यकुशल आणि संस्काराची शिदोरी असणाऱ्या घरात आदरणीय मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील तथा रणजितदादा यांचा जन्म झाला . . . 
जन्मताच घराण्याचा लौकिक व विकासाचा वारसा त्यांना मिळाला त्यामुळे राजकारणाचे धडे गिरवताना त्यांना कसलीही अडचण आली नाही.  वडील आदरणीय विजयसिंह मोहिते- पाटील व सर्व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितदादा आपोआपच परिपक्व होत गेले.  राजकारणातील बारकावे , निष्ठा , झोकून देऊन काम करायची तयारी हे गुण त्यांच्यात घरातून त्यांच्या अंगी आले . ..लहाण वयातच   त्यांच्यातील संघटन कौशल्य व लोकांना जोडण्याची कला हे गुण ओळखून आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केल्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा रणजितसिंहांवर विश्वासाने सोपवली . . 
व रणजितदादांनीही पायाला भिंगरी बांधून विदर्भ, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे पोहचवली गावागावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शाखा काढून संपुर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय केला . . . त्यांनी केलेल्या कामामुळे राष्ट्रवादीमध्ये युवक फळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली , पक्षाशी जोडली गेली . . त्यातून पक्षाची विचारधारा जनतेत पोहचवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी , पक्षाला  मोठे करण्यासाठी कित्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, व आमदार, खासदार  , रणजितसिंहदादांच्या संघटन कौशल्यामुळे  मिळाले . . . या त्यांच्या कामाची पोच म्हणून पक्षानेही , सोलापूर विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार केले व २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून साहेब निवडून गेल्या नंतर रणजितसिंहांना राज्यसभेवर पाठवले . . 
रणजितदादांनी आमदार असताना सोलापुरला स्वतंत्र विद्यापीठ असावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला , जिल्ह्यातील असंख्य प्रलंबित प्रश्नांना हात घातला . . . 
व राज्यसभा सदस्य झाल्या नंतर फलटण, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणाऱ्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला , पत्रव्यव्हार केला तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दीदी असे संबोधून  रक्षाबंधनाची भेट म्हणून पंढरपूर लोणंद  रेल्वे मार्ग करण्याची कळकळीची विनंती केली हाच  २००९ पासून थंड पडलेला रेल्वे मार्गाचा प्रश्न आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी , सहकार महर्षींच्या जयंतीला तत्कालीन रेल्वे मंत्री मा श्री नामदार सुरेश प्रभू यांना निमंत्रित करून कायमचा  सोडवला . . . संपुर्ण 
मराठवाडा , सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारी अशी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी म्हणून कित्येकवेळा प्रयत्न केले , निवेदने, सह्यांची मोहिम आणि संबंधित खात्यांचे  मंत्री महोदय, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला . . ही तळमळ, कुठेतरी कामी येणार हे नक्की आहे . . . 
त्यानंतर  विजयसिंह मोहिते पाटील तथा  दादासाहेब २०१४ ला  खासदार झाले आणि  जो २०१४ ते २०१९ या काळात खासदार म्हणून ठसा उमटवला व रेल्वे ,वीज,  रस्ते , पाणी, चारा , असे विविध प्रश्न सत्ता नसतानाही सतत पाठपुरावा करून सोडवले , सातत्याने जनसंपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तोच वारसा व विचार रणजितसिंहदादांच्या रुपाने पुढे चालावा ही संपुर्ण माढा मतदारसंघातील जनतेची भावना आहे . . . 
खरेतर रणजितदादांचा स्वभाव हा मुळातच  मनमिळावू , समजूतदार, असा आहे, लोकांमध्ये  मिसळने, त्यांच्या  अडीअडचणी जाणणे हा त्यांचा स्थाईभाव आहे . कधीकधी रणजितदादा स्पष्ट बोलतात, जे काम होणार नाही ते लगेच तोंडावर सांगतात त्यामुळे काही लोकांना त्यांचा स्वभाव तापट वाटतो पण जवळ गेल्या शिवाय खरंकाही कळत नसते ,  यापाठिमागे त्यांचा हेतू स्वच्छ असतो , तो म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला किंवा लोकांना कामासाठी विनाकारण हेलपाटे घालायला लागूनयेत आणि लोकांचा वेळ व पैसा वाचावा . . खोटी आश्वासने देऊन लोकांची हेळसांड व दिशाभूल करण्यापेक्षा स्पष्ट सांगून प्रश्नांची तड तातडीने लागावी याच भावना असतात.
जीकामे करणे शक्य असते त्या कामाबाबतीत तातडीने संबधितांना फोन करणे , तशी शिफारस देणे हे केले जाते . . 
बर्याचदा काही विरोधक बदनाम करण्यासाठी विविध वावड्या उठवत असतात मात्र त्याचा अनुभव कोणीही घेतलेला नसतो . . . 
त्यामुळे पारावार नको त्या चर्चा केल्या जातात. . . 
मात्र जो जो आदरणीय रणजितदादांना भेटलाय त्यांच्याशी बोललाय तो तो आजन्म रणजितदादांवर प्रेम केल्याशिवार राहणार नाही . . . मोहिते पाटील घराणे व तिसर्‍या पिढीतील रणजितसिंहदादा यांचेवर 
लिहण्यासारखे खूप आहे व यापुढेही माझ्या हातून खूप  लिहले जाईल. . 
पण या निमित्ताने सर्व जनतेला विनंती आहे की, देशात विविध भागातील जनतेला चांगले नेतृत्व न लाभल्याने विकासापासून वंचित रहावे लागते . . 
मात्र आपले भाग्य आहे की , आदरणीय सहकार महर्षींचा सक्षम वारसा जपणारे व आदरणीय विकासाची गंगा खेडोपाडी , तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे वारसदार म्हणून आपल्याला लाभत आहेत, 
मोहिते पाटील हा एक ब्रँड  आहे व तोच ब्रँड आपल्या माढा मतदारसंघाची विकासाची भूख  भागवेल याची सर्वांनाच खात्री आहे . . म्हणून जनतेने नजीकच्या काळात आपल्या भावना समजू शकणारे , सहज उपलब्ध होणारे नेते आदरणीय रणजितसिंह दादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे . . 
कोणत्याही  अपप्रचाराला बळी न पडता सतर्क राहून यावेळी फक्त दोन महिने तन मन धनाने काम करायचे आहे व आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांची  , निवडणूक मिच  लढतोय व  मिच  उमेदवार आहे असे  समजून, आपण सर्वजण  मोहिते पाटील परिवारातीलच  एक सदस्य आहोत अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला लागायचे आहे . . . 
अब की बार. . . . 
रणजितसिंह मोहिते पाटील खासदार. . . 
लेखक. . . . 
विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/
९६६५९३६९४९

विकासाची तळमळ असणारे युवा नेतृत्व. . मा श्री रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील




चालू घडामोडींचे विश्लेषण


विकासाची तळमळ असणारं युवा नेतृत्व. . . . 
मा श्री रणजितसिंह मोहिते- पाटील. . . . . . 
लेखन. . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९६६५९३६९४९/९४२३६१३४४९
महाराष्ट्रातील जिकाही मोजकी घराणी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपाला आली, जनसामान्य लोकांची तारणहार झाली ,   त्यामध्ये अकलूजचे  सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांच्या घराण्याचा समावेश होतो . . . 
संबध सोलापूर जिल्हा व  महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय राजकारणात या घराण्याची चर्चा होत असते.  सत्तेची विविध पदे या घराण्याकडे घराण्यात निर्माण झालेल्या कर्तृत्वान पुरूषांमुळे चालून आली, या घराण्यात अनेकांना , सरपंच, सभापती , जि प अध्यक्ष, आमदार, खासदार, व मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ,  देश पातळीवरील सर्व दिग्गज नेते या ना त्या कारणाने अकलूज परिसराचा  व माळशिरस तालुक्यातील झालेला विकास पाहण्यासाठी येत असतात. . या ठिकाणी . राजकीय चर्चा भेटीगाठी व अकलूजचा आशीर्वाद मिळावा म्हणून असंख्य कार्यकर्ते आपल्या नेत्याला भेटायला येत असतात. . 
सहकार महर्षींनी जो विकासाचा मार्ग आखून दिला त्याच मार्गाने सहकार महर्षींचे जेष्ठ सुपुत्र आदरणीय मा श्री विजयसिंह मोहिते -पाटील यांनी  कारभार केला त्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांच्या सर्व बंधूंनी त्यांना मोलाची साथ दिली त्यामुळे माळशिरस तालुक्याचे नंदनवन झाले . . . एकेकाळी 
माळाचं शिर असणारा तालुका . . . 
कारखाने. . दुध संघ, फळबाग, उसाचे मळे , द्राक्ष, डाळींब, भाजीपाला , याने समृद्ध झाला , विविध शिक्षण संस्था , सहकारी संस्था , यामुळे लोकांच्या जीवनात खर्या अर्थाने सुबत्ता याच घराण्याने आणली . . . 
अशा कर्तृत्वान, कार्यकुशल आणि संस्काराची शिदोरी असणाऱ्या घरात आदरणीय मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील तथा रणजितदादा यांचा जन्म झाला . . . 
जन्मताच घराण्याचा लौकिक व विकासाचा वारसा त्यांना मिळाला त्यामुळे राजकारणाचे धडे गिरवताना त्यांना कसलीही अडचण आली नाही वडील आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व सर्व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितदादा आपोआपच परिपक्व होत गेले राजकारणातील बारकावे , निष्ठा , झोकून देऊन काम करायची तयारी हे गुण त्यांच्यात घरातून त्यांच्या अंगी आले . ..लहाण वयातच   त्यांच्यातील संघटन कौशल्य व लोकांना जोडण्याची कला हे गुण ओळखून आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केल्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा रणजितसिंहांवर विश्वासाने सोपवली . . 
व रणजितदादांनीही पायाला भिंगरी बांधून, विदर्भ, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येय व धोरणे पोहचवली गावागावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शाखा काढून संपुर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय केला . . . त्यांनी केलेल्या कामामुळे राष्ट्रवादीमध्ये युवक फळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली , पक्षाशी जोडली गेली . . त्यातून पक्षाची विचारधारा जनतेत पोहचवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी , पक्षाला  मोठे करण्यासाठी कित्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, व आमदार खासदार  रणजितसिंहदादांच्या संघटन कौशल्यामुळे  मिळाले . . . या त्यांच्या कामाची पोच म्हणून पक्षानेही , सोलापूर विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार केले व २००९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून साहेब निवडून गेल्या नंतर रणजितसिंहांना राज्यसभेवर पाठवले . . 
रणजितदादांनी आमदार असताना सोलापुरला स्वतंत्र विद्यापीठ असावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला , जिल्ह्यातील असंख्य प्रलंबित प्रश्नांना हात घातला . . . 
व राज्यसभा सदस्य झाल्या नंतर फलटण, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणाऱ्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला , पत्रव्यव्हार केला तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दीदी असे संबोधून  रक्षाबंधनाची भेट म्हणून पंढरपूर लोणंद  रेल्वे मार्ग करण्याची कळकळीची विनंती केली हाच  २००९ पासून थंड पडलेला रेल्वे मार्गाचा प्रश्न आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी , सहकार महर्षींच्या जयंतीला तत्कालीन रेल्वे मंत्री मा श्री नामदार सुरेश प्रभू यांना निमंत्रित करून कायमचा  सोडवला . . . संपुर्ण 
मराठवाडा , सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारी अशी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी म्हणून कित्येकवेळा प्रयत्न केले , निवेदने, सह्यांची मोहिम आणि संबंधित खात्यांचे  मंत्री महोदय, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला . . ही तळमळ, कुठेतरी कामी येणार हे नक्की आहे . . . 
त विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांनी हे २०१४ खासदार झाले आणि  जो २०१४ ते २०१९ या काळात खासदार म्हणून ठसा उमटवला व रेल्वे , विज,  रस्ते , पाणी, चारा , असे विविध प्रश्न सत्ता नसतानाही सतत पाठपुरावा करून सोडवले , सातत्याने जनसंपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तोच वारसा व विचार रणजितसिंहदादांच्या रुपाने पुढे चालावा ही संपुर्ण माढा मतदारसंघातील जनतेची भावना आहे . . . 
खरेतर रणजितदादांचा स्वभाव हा मुळातच  मनमिळावू , समजूतदार, असा आहे, लोकांमध्ये  मिसळने, त्यांच्या  अडीअडचणी जाणणे हा त्यांचा स्थाईभाव आहे . कधीकधी रणजितदादा स्पष्ट बोलतात, जे काम होणार नाही ते लगेच तोंडावर सांगतात त्यामुळे काही लोकांना त्यांचा स्वभाव तापट वाटतो पण जवळ गेल्या शिवाय खरंकाही कळत नसते ,  यापाठिमागे त्यांचा हेतू स्वच्छ असतो , तो म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला किंवा लोकांना कामासाठी विनाकारण हेलपाटे घालायला लागूनयेत आणि लोकांचा वेळ व पैसा वाचावा . . खोटी आश्वासने देऊन लोकांची हेळसांड व दिशाभूल करण्यापेक्षा स्पष्ट सांगून प्रश्नांची तड तातडीने लागावी याच भावना असतात. . 
जि कामे करणे शक्य असते त्या कामाबाबतीत तातडीने संबधितांना फोन करणे , तशी शिफारस देणे हे केले जाते . . 
बर्याचदा काही विरोधक बदनाम करण्यासाठी विविध वावड्या उठवत असतात मात्र त्याचा अनुभव कोणीही घेतलेला नसतो . . . 
त्यामुळे पारावार नको त्या चर्चा केल्या जातात. . . 
मात्र जो जो आदरणीय रणजितदादांना भेटलाय त्यांच्याशी बोललाय तो तो आजन्म रणजितदादांवर प्रेम केल्याशिवार राहणार नाही . . . मोहिते पाटील घराणे व तिसर्‍या पिढीतील रणजितसिंहदादा यांचेवर 
लिहण्यासारखे खूप आहे व यापुढेही माझ्या हातून खूप  लिहले जाईल. . 
पण या निमित्ताने सर्व जनतेला विनंती आहे की, देशात विविध भागातील जनतेला चांगले नेतृत्व न लाभल्याने विकासापासून वंचित रहावे लागते . . 
मात्र आपले भाग्य आहे की , आदरणीय सहकार महर्षींचा सक्षम वारसा जपणारे व आदरणीय विकासाची गंगा खेडोपाडी , तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे वारसदार म्हणून आपल्याला लाभत आहेत, 
मोहिते पाटील हा एक ब्रँड  आहे व तोच ब्रँड आपल्या माढा मतदारसंघाची विकासाची भूख  भागवेल याची सर्वांनाच खात्री आहे . . म्हणून जनतेने नजीकच्या काळात आपल्या भावना समजू शकणारे , सहज उपलब्ध होणारे नेते आदरणीय रणजितसिंह दादा यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे . . 
कोणत्याही  अपप्रचाराला बळी न पडता सतर्क राहून यावेळी फक्त दोन महिने तन मन धनाने काम करायचे आहे व आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांची  , निवडणूक मिच  लढतोय व  मिच  उमेदवार आहे असे  समजून, आपण सर्वजण  मोहिते पाटील परिवारातीलच  एक सदस्य आहोत अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला लागायचे आहे . . . 
अब की बार. . . . 
रणजितसिंह मोहिते पाटील खासदार. . . 
लेखक. . . . 
विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/
९६६५९३६९४९

मंगळवार, १२ मार्च, २०१९

खरेतर पवार साहेबांची माढ्यातून उमेदवारी दादासाहेबांनीच मागितली होती , परंतु साहेबांनी राज्यसभेवर राहण्याचा निर्णय घेतल्याने आदरणीय साहेबांच्या निर्णयाचा आम्ही सर्वजण आदरच करतो व जर पक्षाने मोहिते पाटलांना उमेदवारी दिली तर मनापासून सर्वजण स्वागतच करू, आणि मोहिते पाटलांच्या उमेदवारी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटीच मिळणार ! हेही निश्चित आहे





मोहिते पाटलांच्या   उमेदवारी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार बळकटी . . . 
लेखन. . विजय पिसाळ नातेपुते . . . ..वॉटसप  ९४२३६१३४४९
आदरणीय रणजितसिंह (दादा ) मोहिते पाटील  असोत कि, विजयसिंह मोहिते पाटील तथा मोठे  दादासाहेब असोत. .  सातत्याने पवार साहेबांवर प्रेम करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सदैव  निष्ठा ठेवून काम करत आले आहेत पक्षात विविध कारणांनी जरी किरकोळ विरोध झाला किंवा किरकोळ मतभेद झाले किंवा डावलले गेले  तरीदेखील दादासाहेब व रणजितसिंहदादांची  साहेबांवरील निष्ठा बिलकुल कमी न होता सतत पक्षाने दिलेल्या संधीचं सोनंच करायचं काम दोन्ही दादा आणि मोहिते पाटील परिवाराने केले आहे . . आदरणीय रणजितसिंहदादांनी तर युवकचे प्रदेशाध्यक्ष असताना संपुर्ण महाराष्ट्रात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे पोहचवली आहेत व त्याच कामाची पोचपावती म्हणून रणजितसिंहदादांना विधान परिषदेत व राज्यसभेवर काम करायची संधी पक्षाने दिली  व या संधीचे सोने करत रणजितसिंहदादांनी , रेल्वे , रस्ते , सोलापूर विद्यापीठ याचा पाठपुरावा करून आपल्या कामाची चुणूक दाखवली व युवक आमदार व एक युवक खासदार कसा असावा हा आदर्शच नव्या पिढीला घालून दिला ! आदरणीय रणजितसिंहदादांनी 
जुन्या व नव्या पिढीतही आपल्या कामाच्या बळावर दांडगा संपर्क ठेवलेला आहे . मतदारसंघातील 
गावागावात आदरणीय दोन्ही दादांनी स्थानिक नेतृत्वाला नेहमीच बळ दिले व सर्वांनाच  मोठे करत असतानाच पक्षाची नवीन तरूण फळी निर्माण केली  . 
गाव तिथे राष्ट्रवादी व पवार साहेबांचा विचार पोहचवला  , विरोधक सुद्धा दोन्ही दादांना मनापासून ताकदीने  विरोध करत नाहीत कारण दोन्ही दादांनी व मोहिते पाटील परिवाराने  सर्वांशीच राजकारणा पलिकडचे नाते जपायचे काम केले आहे आणि यामुळे माढा मतदारसंघात मोहिते पाटील परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग आपणाला दिसून येतो, विजयसिंहदादा किंवा त्यांच्या घरातील कुणीही सत्तेवर असता कधीही सुडाचे राजकारण केले नाही ,  आज माढा मतदारसंघात जेवढे आमदार, जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य  आहेत त्यातील बहुतांश जणांना अडचणीच्या काळात मोठी मदत मोहिते पाटील परिवाराने केली आहे , राजकीय महत्वकांक्षा प्रत्येकास असतात व त्यातून काहीजण उमेदवारी जाहीर होईपर्यंत किरकोळ विरोध करत असतात मात्र साहेबांनी प्रत्येकाला मोलाचा सल्ला दिला तर मात्र सर्वजण ऐकोप्याने काम करतात हा मागील इतिहास आहे, 
आजच्या परिस्थितीत पाडापाडीचे राजकारण केले तर सर्वजण सत्तेपासून दुर तर राहतील पण आपसातील हेव्यादाव्यामुळे पक्षाची व पर्यायाने सर्वांचीच शक्ती क्षीण होईल याची जाणीव प्रत्येकास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही , त्यामुळे आदरणीय साहेब सर्वांनाच एकत्र बसवून कानउघाडणी करून सक्रीय करतील हे नक्की , यातच सर्वांचेच हित आहे, आज देशात, कारखानदारी , दुध धंदा , सहकार, बँकींग, बेरोजगारी  शेतीचे  व इतर नागरी प्रश्न आवासून उभे आहेत, सध्याचे शासनातील प्रमुख हे सर्वांना न्याय देत नाहीत ही भावना आहे , आजच्या काळातील  नवतरूण मतदार हे अभ्यासू व वैचारिक झालेले आहेत त्यामुळे  त्यांना अभ्यासू व प्रभावी वक्तृत्व असणाऱ्या नेतृत्वाची ओढ आहे व ति ओढ आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील हे पुर्ण करतील हा जनतेत दृढ विश्वास आहे , निष्ठा व वैचारिक भूमिका हेच बलस्थान रणजितसिंह मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांचे आहे,  व त्यामुळेच २०१९ च्या लोकसभेच्या उमेदवारीची माळ मोहिते पाटील परिवारातील दोन दादां पैकी नक्कीच एका दादांचे गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही , 
आज, सुप्रियाताई असतील,  धनंजय मुंडे साहेब,  पार्थदादा , रोहितदादा,  यांच्यावर पक्षाची जबाबदारी येत असून त्यांच्या जोडीला पक्ष वाढीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील असने  तितकेच महत्वाचे आहे , 
नुसता माढाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष बळकट करायचा असेल तर गतीमान नेतृत्वाची गरज आहे आणि त्यासाठी तरूणांचे संघटन मोलाचे ठरते त्यामुळे अभ्यासू रणजितदादा हे सुप्रिया ताई व पार्थदादा यांच्या बरोबर संसदेत असावेत अशी तरूणांच्या मनात भावना आहे, व ति भावना आदरणीय पवार साहेब निश्चित जाणतील  यात तिळमात्र शंका नाही , रणजितसिंहदादांचे प्रभावी वक्तृत्व व असलेले सखोल ज्ञान संसदेत पक्षाची भूमिका मांडायला व पक्ष वाढीसाठी महत्वाची ठरेल, 
 मागच्या काळात  पक्षांतर्गत,  सर्वांकडूनच ज्या किरकोळ चुका झाल्या त्या टाळून परत एकदा , सोलापूर जिल्ह्याची  थोडीफार विस्कटलेली घडी पवार  साहेबांच्या आदेशाने व  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,  बबनदादा, रश्मी दिदी, दिपकआबा, राजन पाटील साहेब, सोपल साहेब, व संपुर्ण मोहिते पाटील परिवार एकत्र येऊन नक्कीच परत एकदा बसवतील व परत एकदा संपुर्ण सोलापुर जिल्हा राष्ट्रवादीमय करतील हीच भावना सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे , आदरणीय साहेब पंतप्रधान व्हावेत व आदरणीय अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हीच जनभावना महाराष्ट्रातील जनतेची आहे . 
माढा लोकसभा मतदारसंघा पुरते बोलायचे झाले पक्ष मजबूत असल्यामुळे  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब, रणजितसिंहदादा , प्रभाकर देशमुख साहेब,  दिपक आबा हे इच्छुक होते सर्वांचेच काम चांगले आहे, पक्ष लोकशाही मानणारा असल्यामुळे अनेकजण इच्छुक हे राहणारचं व पक्षात लोकशाही असल्यामुळेच, विजयसिंह मोहिते पाटील साहेब,  भुजबळ साहेब, कै.  आर आर पाटील साहेब, आदरणीय अजितदादा या सर्वांनाच पक्षाने उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली  व यापुढेही पक्षात लोकशाही  राहिल!
 बदलत्या परिस्तिथी नुसार जेंव्हा  साहेबांना पंतप्रधान पदाची संधी येतेय हे जाणून आदरणीय विजयसिंहदादांनी साहेबांनाच माढ्यातून उभे राहण्याची विनंती केली व साहेबांनीही दादासाहेबांचा मान राखून होकार दिला इथेच नेतृत्वावर  निष्ठा कशी  असावी याचा आदर्शच दादासाहेबांनी घालून दिला , कार्यकर्ते जरी भावनेच्या भरात नाराज झाले तरीदेखील दादासाहेबांनी समजूत घालून साहेबांचेच निष्ठापुर्वक काम करायचे हाच आदेश दिला . . 
 मात्र पवार साहेबांच्या  कुटूंबातून सर्वांनीच एकमुखाने  साहेबांनी न लढता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी हे ठरल्यामुळेच आदरणीय रणजितसिंहदादांचे नाव माढा लोकसभेला व मावळ मधून पार्थदादांचे  प्रकर्षाने पुढे आले व रणजितसिंहदादांचे  व पार्थदादांचे नाव  पुढे येताच तरूणांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले म्हणून आता पक्षातील धुरीणांनी नव्या पिढीला संधी द्यायचा निर्णय घेतलाच आहे  तर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच  उमेदवारी द्यावी हीच भावना आहे माढा मतदारसंघात आहे 
व समजा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांच्या अनुभवाचा पक्षाला  फायदा करून घ्यायचा असेल तर दादासाहेबांचा विचार करावा , आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब किंवा इतर सर्व इच्छुकांना भविष्यात पक्षानेही मानसन्मान देऊन योग्य ठिकाणी संधी द्यावी मात्र यापुढे सर्वांनीच गटबाजीला मुठमाती देऊन आदरणीय साहेबांची दिल्लीतील ताकद आणि मान उंचावण्यासाठी एकदिलाने काम करावे हीच आम्हा सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते मंडळींची भावना आहे . . 
विजय पिसाळ नातेपुते !

रविवार, १० मार्च, २०१९

दिपक शामराव ठोंबरे यांचे पोलिस उपनिरीक्षक निवडीने नातेपुते गावात चैतन्य!

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते नगरीत श्री शामराव (दादा) ठोंबरे हे आपला पारंपारिक व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करताना एकवेळ काम कमी झाले तरी चालेल पण ग्राहकाला चांगली सेवा देणे स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणे आणि येणार्‍या प्रत्येक ग्राहका बरोबर हसतखेळत बोलून काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी नातेपुते परिसरातील असंख्य माणसे जोडली व त्यांचा ग्राहक सुद्धा त्यांच्याशी  आदरपूर्वक आस्थेवाईक संबध जपून राहिला . . 
त्यांच्या वागण्यात, बोलण्यात व राहणीमानात जी विनम्रता व वाणीमध्ये जो गोडवा आहे तोच गुण त्यांच्या तिन्ही  मुलांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो . . 
थोरला रणजित  हा सुरवातीला त्यांना  त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मदत करत असे शामरावदादांच्या हाताखाली काम करत करत तोच आता त्यांचा व्यवसाय पुर्णपणे सांभाळतो  गावातील इतर दुकानांच्या तुलनेने जास्त दर ठेवून सुद्धा स्वच्छता व टापटीप यामुळे ग्राहक कोणतीही कुरकुर न करता जास्तीचे पैसे देतात हाच शामरावदादांचा  व्यवसायिक पैलू रणजित जपतोय. . 
दुसरा किशोर यानेही शिक्षण घेत असताना खडतर प्रवास केला आहे , एबीए करत असताना त्यालाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागला पण त्यानेही कधीच चिकाटी सोडली नाही , जेव्हा त्याचे शिक्षण चालू होते तेंव्हा तो सुट्टीत शामरावदादांना व रणजितला मदत करत असे एकदाही वेळेचा कधी त्याने अपव्यय केलेला दिसला नाही . तो जेंव्हा जॉबला लागला तेंव्हा पासून शामराव दादांना आधार वाटू लागला , रणजित हाताखाली काम करत होता व किशोर जॉबला लागल्याने दिपकलाही पुढील अभ्यासासाठी मदत करणे शक्य होत गेले , 
 सदैव परिस्तिथीची जाणीव ठेवणार्या कुटूंबातील दिपक सर्वात लहान पण तोही हुशार, त्याकाळात त्याने शाळेत गुणवत्तेने शिक्षण घेत  असताना कुठेतरी लवकर मुलगा रुटीनला लागावा म्हणून शामरावदादांनी त्याला डीएडला ठेवले पण त्याचे डिएड पुर्ण होताच शिक्षक भरती पुर्णपणे थंडावली आणि त्याच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला खीळ बसली पण खचून न जाता त्याने कॉलेज पुर्ण केले व कॉलेज पुर्ण केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बनण्याचा उराशी ध्यास बाळगला , सतत अभ्यास, परिश्रम आणि चिकाटी या बळावर तो परिक्षा देत राहिला , खरंतर मागील तिन चार परिक्षात त्याचे थोड्या किरकोळ मार्कांनी  सिलेक्शन हुकायचे  मात्र त्याने हार मानली नाही आणि २०१७ ला दिलेल्या परिक्षेत तो यशस्वी झालाच. . व खर्या अर्थाने शामरावदादा ठोंबरे यांच्या खडतर जीवन प्रवासाचे चिज झाले . . 
तिनही मुले संस्कारी , निर्व्यसनी आणि कर्तृत्वान निघाली . . 
कुठेतरी त्यांच्या मनाला आतुन समाधान मिळत असेलच आणि तिनही मुलांसाठी शामरावदादांच्या सौभाग्यवती व तिघांच्या मातोश्री यांचीही मोलाची व अखंड कष्टमय साथ मिळाली याचेही त्यांनाही खूप खूप समाधान असेल. . 
नव्या पिढीतील मध्यमवर्गीय घरातील व  सर्वांनीच या कुटुंबातील मुलांकडून प्रेरणा घेऊन आपले भविष्य घडवायला हवे . . 
नातेपुते गावातील समस्त नागरिकांना या कुटूंबाचा अभिमान वाटतो. . . 
खरंतर गावातील, जयपाल देठे , अभिमान माने, मोरे व असंख्य मुले ही सर्वसाधारण घरातून पुढे आली व यशाला गवसणी घालून गावचे नाव मोठे केले . . . तिच प्रेरणा इतर तरूणांनी घ्यावी . . . 
शब्दांकन. 
विजय पिसाळ नातेपुते

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण









नातेपुते येथे शिवजयंती उत्साहात साजरी . 

नातेपुते येथे शिवजयंती निमित्त सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करून खर्या अर्थाने शिवरायांना विशिष्ट एका जाती पुरते मर्यादित ठेवण्याला विरोधक करणारी व शिवविचार सर्वांच्याच मनात रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न  करणारी म्हणून नातेपुते पंचकृषीत नावलौकिक असणारी  म्हणजेच,  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते* यांच्या वतीने मंगळवार दिनांक  १९ फेब्रुवारी रोजी खास  निवृत्त लष्करी अधिकारी मेजर श्री हनुमंत माने,मेजर  श्री दाजी जानकर, मेजर सुरेश पांढरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले ! 
यातुन लष्करी सेवेत असताना  सर्व देशवासियांचे,  सिमेवर संरक्षण करणार्‍या जवानांना निवृत्ती नंतरही समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा मिळावी या उदात्त हेतुने माजी सैनिकांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने शिवरायांचे  पुतळ्यांचे  पुजन करण्यात आले , 
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, आप्पासाहेब  भांड,  पत्रकार सुनिल राऊत, पत्रकार आनंद जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य   श्रीगणेश पागे व  समिर सोरटे ,शिक्षक  श्री संजय ढवळे, व बाबुराव जमाले  तसेच  सामाजिक कार्यकर्ते  एकनाथ ननवरे ,राहुल पदमन,कैलास सोनवणे,   करीम शेख, सुनिल ढोबळे , सागर बिचुकले ,रुपेश इंगोले, राहुल बोत्रे,  विजय डुबल,चंद्रशेखर शेटे, विवेक राऊत, गणेश ठोंबरे , धनंजय राऊत, रवि भंडारे  आदी मान्यवर  उपस्थित होते !
कार्यक्रमाची सांगता झाले  नंतर वेळात वेळ काढुन  माझी सरपंच अमरशील देशमुख, माजी उपसरपंच श्री धैर्यशील देशमुख,प्रा.  उत्तम सांवत यांनीही भेट देऊन प्रतिमा पुजन केले ,  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी !  शिवजयंती सोहळा समितीचे  प्रमुख. . . 
श्री विजय पिसाळ,
श्री संभाजी पवार,
श्री सतिष जाधव,  
अक्षय बावकर, 
ओकांर निकम, 
यांनी विशेष परिश्रम घेतले !


सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

नातेपुते नगरीचे कर्तव्यदक्ष सपोनि श्री राजकुमार भुजबळ साहेब.

चालू घडामोडींचे विश्लेषण

नातेपुते नगरीचे कर्तव्य दक्ष सपोनि *मा श्री राजकुमार* यांनी नातेपुते गावचा सपोनि चा कार्यभार सांभाळल्यापासून, विविध गुन्हे उघडकीस आणले , त्याच प्रमाणे गुन्हेगारांवर बर्यापैकी वचक बसवला ,बर्याच गुन्ह्याचा छडा तातडीने लावून संबधितांना न्याय मिळवून दिला ,  विशेष म्हणजे गावात होणारे सतत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी नातेपुते नगरीतील नागरीकांचे सहकार्याने "गावातील सर्व मुख्य वर्दळीच्या ठिकाणी" *सीसीटीव्ही कॅमेरे* बसवून अभिनव असा उपक्रम राबवला आणि त्यातून, मोटारसायकलचे  पेट्रोल चोरी असेल, मोटारसायकलींची  चोरी असेल, रोड रोमियोंचा  शाळा व कॉलेजमधील मुलींना होणारा त्रास असेल  हा बर्याच अंशी कमी झाला आहे .
 एसटी स्टँड व परिसरात होणार्‍या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली, साहेबांनी सीसीटीव्ही बसवल्यामुळे व बरेच  गुन्हे तात्काळ उघडकीस आले आहेत. याच बरोबर भुजबळ साहेब नातेपुते येथे रूजू झाले पासून गावातील शांतता व जातीय सलोखा अबाधित आहे व ति  टिकण्यास खूप मोठी भुमिका साहेबांनी पार पाडली आहे .  
कुणावरही कधीही कसलाही  अन्याय न करता नातेपुते हे पुर्णपणे शांततामय कसे राहिल व किरकोळ वाद कसे मिटतील व सामान्य जनतेला कसा न्याय मिळेल हीच भुमिका भुजबळ साहेबांची नेहमी असते. गावातील सर्वांनाच सहकार्याची भुमिका साहेब घेतात, या सर्व गोष्टीमुळे *आदरणीय राजकुमार भुजबळ साहेबांना व नातेपुते पोलिस स्टेशनला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे* 
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्या गुणांकन संकल्पनेनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणे व पोलिस उपविभागाच्या कार्यालयाचे एकुण कामकाजावरून केलेल्या गुणांकनाच्या आधारे जानेवारी २०१९ मध्ये नातेपुते पोलिस ठाणे व सपोनि राजकुमार भुजबळ यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे . 
या विशेष  गौरवा बद्दल  भुजबळ साहेबांचे  मनःपूर्वक  हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा . . . 
विजयकाका  पिसाळ नातेपुते

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

आता फक्त युद्ध करूया !

चालू घडामोडींचे विश्लेषण
संपुर्ण ब्लॉग वाचा व मगच प्रतिक्रिया द्या ! 

प्रत्येकाचे रक्त सळसळतंय,होय!  पाकिस्तानचा बदला घ्यायला हात शीवशीव करतात, मनात रागाचा कडेलोट होतोय, सगळे चॅनलवाले, पत्रकार व संपुर्ण देशप्रेमी हेच सांगत आहेत, 
युद्ध करावं माजलेल्या  पाकिस्तानला धडा शिकवावा , पाकव्याप्त  काश्मीर पासून सुरूवात करावी ते थेट , लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, अशी शहरं , एकामागून एक,  एका दिवसात बेचिराख करावीत, लाखो सैनिक घुसवून एका एका सैनिकाच्या बदल्यात किमान  हजार तरी मारावेत, 
रक्तपात करावा , 
सगळं पाकिस्तान जाळून टाकावं , बेचिराख करावं , नेस्तनाबूत करावं , जगाच्या नकाशावरून त्याचं निशाण  कायमचं मिटवावं ! 
हेच प्रत्येक भारतीयाला वाटतंय! पाकिस्तानचा रागच तितका आलाय,  
 वाटणं सहाजिकच आहे . पण हे करताना , कितीजण सैनिकांबरोबर जायला तयार आहेत, कितीजण कुटूंब घरदार, बायका -मुलं आई वडील सोडून युद्धभुमिवर जायला तयार आहेत, भारतमातेची सेवा करायला व जीवाची बाजी लावून जीवनाची आहुती द्यायला कोण कोण येणार आहे,  कितीजण, आजच्या पेक्षा दुप्पट टॅक्स भरायला तयार आहेत, कितीजण, युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलाबाळांची जबाबदारी घेणार आहेत, कितीजण, त्यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण, व पत्नीला आधार देणार आहेत! 
कितीजण, त्यांचे अश्रू पुसणार आहेत?  कितीजण आपल्या उत्पन्नातील किमान चवथा हिस्सा शहिदांच्या वारसांना द्यायला तयार आहेत, दहा रूपये  दान करताना ज्यांची फाटते ते नुसते फेसबुक व वॉटसपवर मोकळी अक्कल पाजळतात  , मला माहीत आहे बहुसंख्य भारतीय त्याग करतीलही पण, सगळेच  करतील का ?  याचे उत्तर इतिहासाची पाने चाळताना  पहावे लागेल  !  
पाकिस्तान बेचिराख करताना , तो नुसते शेपूट घालून पळून जाईल का ? 
त्यांचे १० मारताना आपलेही २ ते ३ जण शहीद होतील की नाही ?  याचा तरी कधी विचार केलाय का ? 
युध्दज्वर चढविणे व अंगात संचारणे  सहज शक्य होते पण युद्ध करणे हे विनाशाकडे घेऊन जाते, हे कधीतरी शहीद कुटुंबाचे वारसांना भेटा मग कळते , फुकटचे सल्ले देणारे,  प्रत्यक्षात सगळे नाही पण बरेच भेकड सुद्धा असतात, लेखनीला तरबेज असतात व वेळ आलीच तर  कडी लाऊन आत बसून अक्कल पाजळतात, कारण त्यांच्या घरचा कुणीच सीमेवर लढत नसतो, पाकिस्तानचे  युद्धात  समजा ४०लाख मारले तर किमान आपलेही १० लाख तरी शहीद होतील याचातरी विचार केलाय का ?  पानिपतची तेंव्हा लढाई झाली होती तर कित्येकजण युद्ध कैदी होऊन आजही पाकव्याप्त बलुचिस्तान मध्ये जगताना दिसतात, पहिल्या व दुसर्‍या महा यु़द्धाच्या कथा जरी इतिहासात वाचल्यातरी जगाचा विनाष युद्धामुळे होऊ शकतो, संपुर्ण मानवजात संपुष्टात येवू शकते कारण आता मोठे युद्ध कदाचित अणुबॉम्बचेही होऊ शकते , नालायक पाकिस्तान बरोबर युद्ध करत  असताना , त्यांच्या बाजूने चीन उतरला व आपल्या बाजूनेही , ब्रिटन  , अमेरिका , रशिया , उतरले व आपल्या पक्षाची सरसी होऊ लागली व त्यांनी पराभवाच्या भितीमुळे का होईना प्रथम  अणुबॉम्बचा  हल्ला केला तर व  आपली , दिल्ली , मुंबई, बेंगळुरू , कलकत्ता , अशी शहरं त्यांनी लक्ष केली तर कितीजणांना जीव गमवावा लागेल, किती कुटुंबे बेचिराख होतील हे नुसते मनात विचार करून बघा , किंकाळ्या , आरोळ्या  , विव्हळत पडलीली , जणावरे , माणसे , मुलं बाळं रक्त मासाचे सेडच्या सडे, पडलेली प्रेत तरी उचलायला माणसे राहतील का ? 
कारण आताचे युद्ध मुळात तलवारीचे राहिलेले नाही , टँक बारूद, अणुबॉम्ब व कितीतरी नरसंहारक घातक शस्त्रांचा वापर युद्धात होऊ शकतो , 
जैविक व रासायनिक हल्ले वेगळेच! 
समजा असा विचार करा की,  आपल्याच घरावर बाँब टागला गेला व आपलीच  लहान लहान मुलं , आईवडील व आपण त्याचे शिकार झालो तर काय होईल! हडा मासांच्या चिंध्या चिंंध्या झाल्यातर सोसेल का ? 
 व समजा आपणही अणुबॉम्ब टाकायला सुरूवात केली तर त्याचे जागतिक  काय परिणाम होतील, याचा तरी विचार केलाय का ? 
अणुबॉम्ब मुळे तसेही कुठलेच राष्ट्र दुबळे राहिले नाही . 
हो अतिरेकी संपवायलाच पाहिजेत पण त्यासाठी योग्य मार्ग निवडवा लागेल, मुसद्दी पणाने छुपे लढावे लागेल, हो त्यासाठी आपल्या यंत्रणा बळकट कराव्या लागतील, 
दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे . . .
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र यायची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून शिक्षण दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसताव लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्याच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच   वार्तांकन करता आले नाही पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाणे , बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायला पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. 
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते