vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २० मार्च, २०१९

मोहिते -पाटील कुटुंबावर जनता जीवापाड प्रेम का करते ? मोहिते- पाटलांचे समाजकारण, राजकारण कसे आहे ! टीकाकार सुद्धा , अपप्रचार करणारे सुद्धा हा ब्लॉग वाचल्यावर समर्थक होतील तर वाचा संपुर्ण ब्लॉग नक्कीच सर्वांनाच अभिमान वाटेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण

आम्ही मोहिते पाटील समर्थक. . . . . 
वाचा श्री  विजय (काका) पिसाळ यांचे खास  लेखणीतून. . . होय आम्ही मोहिते पाटील समर्थकच का ? 
होय प्रत्येक जिल्हात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा  ठसा उमटवणारा नेता असतो अशा नेत्यामुळे त्या भागाचा व परिसराचा कायापालट होत असतो , त्यांच्या कामामुळेच त्याभागाला ओळख प्राप्त होत असते . .
तशीच ओळख सोलापूर जिल्हाला लाभली ति मोहिते पाटील परिवार व त्यांच्या कामामुळे , त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे . त्यांनी केलेल्या समाजिक व  राजकीय आणि सांस्कृतिक  कामामुळे ! 
 राजकारण असो,  समाजकारण असो, शिक्षण असो की सहकार असो, शेतीचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न असो या प्रत्येक क्षेत्रात आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांचे सोलापूर जिल्हा व आसपासच्या भागासाठी मोलाचे व फार मोठे  योगदान राहिलेले आहे, प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे , तरूण सक्षम झाला पाहिजे , दलित, मुस्लीम वंचित यांचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच भूमिका घेऊन आजवर मोहिते पाटील यांनी राजकारण समाजकारण केले आहे व त्यातून त्यांचे नेतृत्व फुलत गेलेले दिसून येते , संपूर्ण  मोहिते पाटील कुटूंबाला फार मोठा राजकीय वारसा लाभला आहे कै.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे बंधू यांची वाटचाल राहिली आहे किंबहुना ति त्यांनी जोपासली आहे. *जीवात जीवमान असे  पर्यंत जनतेची सेवा करू* हे सहकार महर्षींचे ब्रीद वाक्य! 
 आज सहकार महर्षींची तिसरी पिढी राजकारण व समाजकारणात काम  करत असताना तंतोतंत पाळत आहे.  
हीच तरूण  पिढी  राजकारणात व समाजकारणात  सक्रीय झाली असून या घराण्याची राजकीय व सामाजिक नेतृत्वाची धुरा आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर आलेली आपल्याला बघायला मिळते , रणजितसिंह मोहिते पाटील यांना  मोलाची साथ लाभते आहे ति आदरणीय, धैर्यशीलभैय्या, अर्जूनदादा, शिवबाबा,किर्तीदादा व राणूदीदी आणि  त्यांच्या नव्या पिढीतील संपुर्ण कुटूंबातील महिलांची ! 
सर्व वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे  . 
आदरणीय रणजितसिंहदादा 
 हे अभ्यासू , सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषीत  व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून पुढे येत आहेत. 
खर्या अर्थाने महाराष्ट्राला अशा सुसंस्कृत व निर्मळ मनाच्या  नेत्याची गरज नव्या राजकारणाला व महाराष्ट्राला  आहे . कारण हा महाराष्ट्र संस्कारी नेतृत्वाचा आहे, 
रणजितसिंहदादा हे पोटात एक, ओठात एक व कृतीत भलतेच  असे नेते नाहीत, तर त्यांचे वागणे बोलणे व चालणे हे प्रामाणिक, सचोटीचे व स्पष्ट पणाचे राहिलेले आहे. 
राजकारण करत असताना समोरच्याला प्रेम देणे त्याला जवळ करणे हा त्यांचा गुण सर्वसामान्य जनतेला मनापासून  भावतो . . 
असंख्य नेते  राजकारण करत असताना आपली पोळी भाजण्यासाठी विविध डावपेच रचत असतात,  कटकारस्थान करत असतात,  कपटी राजकारण करत  असतात, एकमेकांना संपवू पहात असतात,कार्यकर्त्याला मोठे होऊ देत नाहीत, खच्चीकरण करत असतात  मात्र या राजकारणातील प्रवृत्ती पासून रणजितसिंह हे पुर्णपणे अलिप्त आहेत. एखाद्याला जवळ घेऊन त्याला बेसावध करून वार करणारी प्रवृत्ती राजकारणात फोफावत असतानाच रणजितसिंह हे याला अपवाद आहेत. कार्यकर्ताला  जपून प्रेम देणे, त्याला ताकद देणे, त्यावर विश्वास ठेवणे  हे शिकायला मिळते ते केवळ रणजितसिंहदादा कडून त्यांच्या  जवळ गेल्यावरच. ..आजवर 
 मोहिते पाटील 
 घराण्याची वाटचाल व राजकारण महाराष्ट्रातील जनतेने जवळून पाहिले आहे . पक्ष कोणताही असो , पक्षाची सामाजिक व वैचारिक जडणघडण कशीही असो मोहिते पाटील यांच्या लेखी फक्त विकासाला महत्व आहे . पक्षाचा व सत्तेचा वापर केवळ आणि केवळ जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे हीच सहकार महर्षींची शिकवण पाळण्याचे काम अविरतपणे या कुटुंबाकडून चालू आहे . 
मोहिते पाटील  कुटुंबाची वाटचाल फक्त लोकांची कामे करणे व लोकांच्या कामासाठी वाट्टेल तो त्याग करणे हीच राहिलेली दिसून येते , त्यामुळेच  मोहिते पाटलांचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान वाटतो ! 
 सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मोहिते पाटील कुटुंबात घरातील सदस्या प्रमाणे वागणूक मिळते त्यामुळेच त्यांच्याकडे असंख्य  लोक आकर्षित होतात व  त्यांच्यावर प्रभावीत होतात. 
खरेतर मि तसा पुर्णपणे पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता! आपला धर्म जपत असताना, आपल्या धर्माची , संस्कृतीची,  परंपरेची , जोपासना करत असतानाच  इतर जाती  धर्मातील  लोकांचा आदर केला पाहिजे या मतांचा मि पाईक! 
 मानवी जीवन हे जात,  धर्म, पंत, भाषा,  याही पलिकडे सर्वसमावेशक असले पाहिजे ही आमची विचारधारा राहिलेली आहे . 
आम्हाला  टोकाची  धर्मांधता कदापि मान्य नाही . 
धर्मांधता 
 या  विचारांच्या विरूद्ध असणारी माझी  वैयक्तिक मते व माझ्या  जीवनावर छत्रपती शिवराय, फुले , शाहु , आंबेडकर आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा  असणारा प्रभाव व   संस्कार  मनावर खोल रूजला आहे . एक सामान्य युवक म्हणून काम करत असताना मोहिते पाटील परिवार सुद्धा कोणत्याही पक्षात काम केले तरीदेखील सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याची भूमिका कधीच बदलणार नाहीत हाच विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांनी कोणताही पक्ष निवडला तरी मोहिते पाटील कुटूंबावरील प्रेम कदापि कमी करणार नाही . सहाजिकच  आज मोहिते पाटील परिवाराने भाजपा मध्ये प्रवेश केला आणि असंख्य लोकांचे मेसेज आले , फोन आले कित्येकांनी सोशल मिडीयात आमच्या बद्दल मतेही मांडली टीका टिप्पणी केली  पण या सर्वांना मि एकच उत्तर दिले व देऊ इच्छितो की,  मोहिते पाटील परिवार हा विकासाचा कणा आहे व सोलापूर जिल्हाचा ब्रॅण्ड आहे आणि महाराष्ट्रातील मोजक्‍या विकासाचा वारसा पुढे चालवणार्या  परिवारा पैकी एक  आहे,  याच दृष्टीकोनातून 
  आम्ही त्या कुटूंबाकडे पाहतो . त्यामुळेच संपुर्ण जिल्ह्याला या कुटूंबाचा अभिमान वाटतो व त्यामुळेच  मोहिते पाटील परिवारावर प्रेम करत असताना माझे सर्व जातीधर्मातील सहकारी व मावळे या परिवारा बरोबर  शेवटच्या श्वासापर्यंत  नक्कीच राहतील यात तिळमात्र शंका नाही . . 
१९९९ साली खूप मोठ्या विश्वासाने  आदरणीय विजयसिंह दादांनी आपल्या असंख्य सहकार्यांना सोबत घेऊन पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता . पक्ष वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता . . 
आणि त्यामुळेच काही पदे त्यांच्याकडे चालून आली होती उपकार म्हणून नव्हे , पण तरीही पक्षातील काहींना मोहिते पाटीलांचे वर्चस्व सहन झाले नाही म्हणून सतत डावपेच आखून खच्चीकरण चालू केले व 
आज मोहिते पाटील परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेसमधील घुसमटीला ,जाचाला ,  अन्यायाला  कंटाळून भाजपात प्रवेश करायचा निर्णय केला ! 
 आम्हाला विश्वास आहे की, मोहिते पाटील यांचे राजकारण व समाजकारण कोणत्याही पक्षातून चालू राहिले  तरीदेखील संपुर्ण मोहिते पाटील परिवार कालही , आजही व भविष्यातही सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालू राहील, व यापुढेही  सर्वांनाच  बरोबर ठेवेल, व भविष्यातही सर्व जाती धर्मातील लोक सोबत राहतील यात तिळमात्र शंका असायचे कारण  नाही , सहकार महर्षी हे  शेकाप मध्ये होते व नंतर    काँग्रेस मध्ये असतानाही  मोहिते पाटील परिवाराने ,  ब्राह्मण असो दलित, मुस्लीम मराठा , धनगर,साळी , माळी , कोळी , आदीवासी भटके ,  अशा सर्व आठरापगड जाती व बारा बलुतेदार यांना बरोबर घेतलेले आहे. कोणताही  कधीच भेदभाव केला नाही.  त्यामुळे यापुढेही तेच काम हा परिवार करत राहिल हे नक्की . . . 
म्हणून आपण सर्वांनीच आजवर जे प्रेम मोहिते पाटील कुटुंबावर केले आहे तेच यापुढेही करायचे आहे . अगदी आपली संस्कृती व विचारधारा जपून. . 
प्रत्येक जिल्हयात स्वतःच्या नेतृत्वाला मोठे केले जाते जपले जाते  कारण  नेता मोठा  झाला तरच त्या त्या भागाचा विकास होतो !  राज्य व केंद्रीय पातळीवरील भरपूर निधी आणता येतो , आपल्या नेत्याला पाठबळ दिले तरच  नेत्याची मान ताट होते राजकीय दरबारात वजन वाढते व नेत्याच्या शब्दाला किंमत प्राप्त होते . 
आजवर जनतेने कै सहकार महर्षी व आदरणीय दादासाहेबांना जे प्रेम दिले पाठिंबा दिला व त्याच लोकांच्या पाठिंब्याच्या बळावर आदरणीय दादासाहेबांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात वजन प्राप्त झाले म्हणून या भागात असंख्य योजना आल्या ,  व अगणित  विकासकामे सत्ता असो किंवा नसो होत गेली . 
म्हणून यापुढेही आपल्या नेत्याची ताकद वाढवण्यासाठी नव्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी रणजितसिंहदादांच्या  व त्यांच्या बंधूंच्या पाठिशी ठाम उभे रहाण्याची गरज आहे . 
परकीयांची चाकरी ज्या  प्रमाणे छत्रपती शिवरायांनी केली नाही सुरूवातीला छोटे का असेना पण स्वकियांचे,  रयतेचे राज्य निर्माण केले  त्या प्रमाणेच कुणाचीही चाकरी न करता पश्चिम महाराष्ट्राचा व विशेषतः सोलापूर आणि माढा मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी , शाश्वत  विकासासाठी आदरणीय  रणजितसिंहदादांच्या  पाठिमागे ठाम उभे राहण्याची भूमिका आपण घेऊया . . त्यातच आपले हीत आहे . तसे बघितले तर 
मोहिते पाटलांच्या गढीवर एकेकाळी पाणी भरणाऱ्या व मोहिते पाटलांच्या जीवावर मोठे झालेल्या आणि इथेच परत  गद्दारी करून  व सध्या फितूर झालेल्या फुटीरांचे मनसुबे उधळून लावूया हीच मला सर्वांनाच कळकळीची विनंती करायची आहे . 
श्री विजय (काका) पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा