चालू घडामोडींचे विश्लेषण
साहेबांना खुले पत्र. . . .
आदरणीय साहेब होय. . .
आदरणीय. . .
मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब. . . .
सप्रेम नमस्कार. . . साहेब
खरेतर तुमचे आचार विचार व अफाट काम करण्याची शक्ती तुम्हाला जनतेच्या प्रश्नांची असणारी जाणीव, काळानुसार अचूक व योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता !
राजकीय क्षेत्रात बहुतांश नेत्यांकडे सभ्यता नसते मात्र तुमच्याकडे राजकारणात असूनही राजकारणातील पराकोटीची सभ्यता आणि माणसे जोडण्याची तुमची अफलातून कला या व अजून असंख्य गुणांमुळे तुम्हाला जनतेत , जानते राजे, चाणक्य, तेल लावलेले पैलवान अशा नानाविध विशेषणांनी तुमचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. .
देशातील जी मोजकी सर्वमान्य व सर्व पक्षातील लोकांशी स्नेह जपणारी माणसे आहेत, यातही तुमचे स्थान सर्वोच्च असेच आहे . ..शेती , सहकार, शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात तुमचे काम अतिउच्च व तेजोमय असे आहे . या तुमच्यातील असंख्य गुणांमुळे आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि त्यामुळेच अगदी लहानपणापासून तुमचे चहाते झालो, कार्यकर्ते झालो , तुमच्या विचारांनी प्रभावीत झालो . . तुम्ही पंतप्रधान व्हावे हे आम्हाला मनोमन वाटू लागले व ते आमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला हीच योग्य वेळ आली आहे . . .
त्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक एक जागा महत्वाची आहे हे तर सर्वजण आपण जाणतो . . .
तरीही आपल्या पक्षात विविध ठिकाणी गटबाजी उफाळून येते ति गटबाजी एका क्षणात संपवायची तुमची क्षमता आहे व तुमच्या शब्दाबाहेर पक्षात कुणी असायचे कारण नाही . . .
अशाच माढा लोकसभा मतदारसंघात असलेल्या किरकोळ गटबाजी बद्दल तुम्हाला हे कळकळीचे पत्र लिहावे असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. . .
आदरणीय साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस हे एक घर असून,
घराचे कुटूंब प्रमुख तुम्ही आहात सहाजिकच घरातील किरकोळ कुरबुरी , एखाद्या दुसर्या सदस्यांची शुल्लक भांडणे व तक्रारी तुमच्याकडेच येणार हेही खरे आहे , काही सदस्य दुसर्या सदस्या बद्दल तक्रारींचे सुर आवळणार व त्या तक्रारींचे निराकरण सुद्धा तुम्हालाच करावे लागणार. .
जवळपास, कोल्हापुर, सातारा , शिरूर, बीड, मावळ,अशा बहुतांश मतदारसंघातील तक्रारींचे निराकरण तुम्ही लिलया केले व सर्वांनाच निवडणूक कामाला लावले . .
महाडीक असतील, उदयनराजे असतील यांना तर त्या ठिकाणी टोकाचा विरोध असतानाही तो विरोध मोडून काढून तिथला तिढा तुम्ही सोडवला . . .
माढ्यात मात्र तुमचे असे कोण आहे की ते ऐकत नाहीत. .
पक्षाच्या विरूद्ध लढून सुद्धा संजय शिंदे आमदार बबनदादा यांच्या इच्छेनुसार जि प अध्यक्ष झाले , पक्षाच्या अधिकृत सदस्यांनी संजयमाला मदत केली . .
त्याहीपुढे जाऊन संजय शिंदे व परिचारक, जानकर, यांनी दीपकआबाचा विधानपरिषदेत पराभव केला . . तरीदेखील तुम्ही त्यांना दापले नाही . . तरीदेखील आम्हाला वाटायचे साहेब योग्यवेळी काहीतरी निर्णय घेतील व गटबाजी संपून जाईल, व परत एकदा पक्ष सोलापूर जिल्ह्यात पुर्वी सारखा एकसंघ होईल . . .
पण गटबाजी थांबली नाही . .
तुम्ही ज्यांना भरभरून दिले तेच पक्षांपुढे आव्हान उभे करू लागले . .
या परिस्थितीत जनतेत जनाधार असलेले , जनतेत खरे प्रेम असणारे विजयसिंह मोहिते पाटील तथा आदरणीय दादासाहेब तुमच्याशी व पक्षाशी निष्ठा ठेवून राहिलेले एकमेव नेते आहेत.
आज दादासाहेब असो की तुम्ही असो ,
दोघांनाही वाटतेच ना आपली पुढची पिढी आता संसदीय राजकारणात यावीत. .
नव्यानेच पक्षात सक्रिय झालेले पार्थदादा असोत की रोहितदादा असोत हे उमेदवारी करत असताना व तरूणांना वाव द्यायची तुमची भूमिका असताना या वेळेस रणजितसिंहांना तुम्ही उमेदवारी दिली तर काय हरकत आहे . .
आज बबनदादांना आमदार होण्यासाठी माढा विधासभा आहे , रश्मींना करमाळा आहे पण माळशिरस राखीव असल्यामुळे रणजितसिंहांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना लोकप्रतिनीधी म्हणून कुठून तरी वाव मिळायला हवा म्हणून सगळे लोक व तरूणवर्ग त्यांची उमेदवारी मागत आहेत. .
आजवर रणजितसिंहांनीही पक्ष वाढीसाठी योगदान दिले आहे . . झोकून देऊन काम केले आहे . . याचाही विचार तुम्ही करायला हवा. .
निवडून यायची क्षमता या जर निकषावर उमेदवारी द्यायची असेल तर रणजितसिंह परफेक्ट विजयी उमेदवार होऊ शकतात. .
कारण मोहिते पाटील परिवाराला मानणारा संपुर्ण चाहता वर्ग आज माढा लोकसभा क्षेत्रात आहे व राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र ताकद लागली की रणजितसिंह हे दोन लाखांवर मतांनी निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही . .
आणि गटबाजीचे म्हणाल तर तुम्ही सर्वांनाच एकत्र बसवून तुमच्या खास शैलीत कामाला लागा हा आदेश वडीलकीच्या व कुटूंब प्रमुख म्हणून दिला की माढ्याचा तिढा सुटला म्हणून समजा . . .
पण या साठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे .
रश्मी बागल, बबनदादा व दीपकआबा यांना समजावून सांगितले पाहिजे , पक्ष वाचायचा असेल तर गटबाजी थांबवा . . . तरच गटबाजी थांबून सर्वजण कामाला लागतील. . .
साहेब, विजयसिंहदादांनी राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यापासून तुम्हाला साथ दिली आहे . . सोलापूरात व पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पडत्या काळात तुमच्या पाठिमागे खंबीरपणे शक्ती उभी केली आहे . . कधीही तुमचा जाहीरपणे किंवा छुपा विरोध केलेला नाही .
पक्षाचे काम करत असताना मिळेल ति जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे ,
खरेतर तुमच्यावरील निष्ठा कधीच तुसभरही ढळू दिली नाही . .
खरेतर विजयसिंहदादांसाठी व रणजितसिंहांसाठी माढा जिंकणे ही गोष्ट अवघड नाही . .
गेल्या वेळी पेक्षाही यावेळी अनुकूल स्थिती आहे . .
एकटा माळशिरस विधानसभा क्षेत्रात रणजितसिंहांना ९० हजारापेक्षा जास्त लीड निश्चित मिळेल यात शंका नाही . .
मात्र काही जणांच्या किरकोळ तक्रारीमुळे रणजितसिंहांची उमेदवारी नाकारली गेली तर या ठिकाणी भावनिक मुद्दा होईल व जनतेत अन्यायाची भावना तयार होऊन पक्षाच्या विरोधात नकारात्मक वातावरण होईल. . पाठिमागे कारण नसताना एकनिष्ठ सदाशिव मंडलिक यांना डावलल्यामुळे हातचा कोल्हापुर गेला होता . .
तसे व्हायचे नसेल तर गटबाजी पेक्षाही निवडून यायची क्षमता याच बेसवर रणजितसिंहांना उमेदवारी द्या ही विनंती . .
आणि प्रत्येकाला कामाला लावा तरच सोलापुर जिल्हातील सगळे विधिसभा मतदारसंघ व जिल्हा परिषदेवरील सत्ता परत मिळवता येईल.
पक्षातील बेकीचा फायदा विरोधकांना होवू नये व हातचा मतदारसंघ जावू नये यासाठीच तरूण अभ्यासू व निष्ठावंत रणजितसिंहांनाच तुम्ही उमेदवारी द्याल हीच अपेक्षा !
विजय पिसाळ नातेपुते .
ता . माळशिरस. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा