मैत्रीणी...
आज आमच्या सौभाग्यवती स्फुर्तीच्या वर्ग मैत्रीणी मेघा, लता व सिमा सौभाग्यवतींना भेटायला सातारा येथून 100 किलोमीटरचा एसटीने प्रवास करुन नातेपुतेला आल्या त्यामुळे आमच्या सौभाग्यवतींना खूप आनंद झाला. शालेय जीवनातील त्यांच्या आठवणी परत त्यांनी जागवल्या.
तिच्या मैत्रीणी येणार म्हणून मी सकाळी छानपैकी बटाट्याची भजी व कांदाभजी, पालक व कोथींबीरची वडी , फोडणीचे वरण , व भात तसेच छानपैकी वांग्याची भाजी आणि चपाती असा बेत केला.
स्वीट डिश ऐवजी बागेतून एक कलिंगड आणुन त्याचे छोटे काप केले व ते फ्रिजमध्ये ठेवले
थंड झाल्यावर कलिंगड अतिशय छान लागते , त्यातील गोडी व थंडगार पणामुळे एक छान चव मिळते.
कलिंगडचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांना आंब्याच्या बागेत फिरायला घेऊन गेलो तिथे एक पेरुचे झाड आहे , त्याचे पेरु त्यांना दिले , ते रुचकर पेरु खाऊन त्यांना खूप आनंद झाला, नंतर आम्ही सर्वजण आमच्या पिंपरी येथील शेतात फेरफटका मारायला गेलो. सिताफळ आणि थोडे चिक्कू त्यांना काढून दिले शेतातील प्रसन्न वातावरण थंड सावली देणारी आंब्याची झाडे व सगळ्या शेतातील हिरव्यागार वातावरणामुळे त्या सर्वजणी खूप आनंदी झाल्या , शहरातील रोजच्या गर्दीतून त्यांचा आजचा दिवस म्हणजे कित्येक दिवसांनी मिळालेला जणू मोकळा श्वास वाटावा आणि मनात चैतन्य निर्माण व्हावे असा दिवस होता, आमच्या पिंपरी येथील शेताच्या शेजारी श्री. किसन सुळ व विधिज्ञ श्री. हरिष सुळ साहेब यांनी छान महादेव मंदिर बांधले आहे, त्या ठिकाणी जाऊन मनोभावे शंभू महादेवाचे दर्शन घेतले.
कित्येक दिवसांनी या शालेय मैत्रीणी भेटल्या मुळे सगळ्याजणी खूप आनंदी होत्या..
शेतातून फिरून आलो आणि छानपैकी मी आले व वेलची टाकून चहा बनवला आणि त्यांचा थकवा दुर झाला.
आजचा दिवस अतिशय छान वातावरणात सर्व मैत्रीणींचा गेला. तसेतर
आमच्या सौभाग्यवतींच्या खूप मैत्रीणी आहेत सगळ्याजणी तीला खूप जीव लावतात पण तिची अजून एक जीवलग मैत्रीण रिना आज आली नव्हती ,त्यामुळे
रिनाला यांनी खूप मिस केले.. सर्वांनी रिनाची खूप आठवण काढली ,कारण आमच्या सौभाग्यवती व रिना कबड्डी खेळाडू आणी बेंच पार्टनर , दोघींची मैत्री लग्नानंतर सुद्धा गेल्या 26 वर्षात किंचितही कमी झाली नाही. रिनाचा व हिचा स्वभाव म्हणजे दोन जीव आणि एक मन अशी त्या दोघींची मैत्री, रिना म्हणजे सगळ्या सुख दुःखात लगेच हजर राहणारी , वेळोवेळी तातडीने धावून येणारी , संकटात हिला धीर देणारी म्हणून हिला रिनाचा आठ दिवस फोन आला नाही किंवा रिनाला सुद्धा हीने फोन केला नाही तर करमत नाही. या दोघी एकमेकींसाठी जीव की प्राण आहेत. आज आलेल्या तिघींनी सुद्धा मनापासून दिवसभर आपलेपणाने घरात वेळ घालवला , एकमेकींना साथ देणाऱ्या व समजून घेणाऱ्या अशा जीवलग मैत्रीला जपणे सोपे नसते.
त्यांच्या वाड्यातील आणि वर्गातील अजून एक मैत्रीण मंगल सुद्धा पाठीमागे नातेपुते ला एकदिवस मुक्कामी आली होती, तेंव्हाही खूप छान दिवस गेला होता. आमच्या घरातील मोकळे वातावरण आणि सर्वांशी आपुलकी जपण्याची वाडवडिलांची शिकवण यामुळे कुणालाही परकेपणा जाणवत नाही.
त्यामुळे हक्काने तिच्या सर्व मैत्रीणी आमच्याकडं येतात. रिना ही मैत्रीण तर तिचे हक्काचे घर म्हणून आवर्जून आमच्याकडे व आम्हीही त्यांचेकडे जातोच , रिनाच्या हातची चव अप्रतिम असते. माझी मुलं कुठेही जायला मागत नाहीत पण रिनाकडे आवर्जून मुक्कामी जातात. कारण रिना त्यांना खूप जीव लावते.
तिच्या सर्व मैत्रीणी तिला खूप जीव लावतात त्याचा मला वेळोवेळी प्रत्येय येतो..
आज अजून एक खास गोष्ट म्हणजे तिघींनी तिला खूप आपुलकीने मनापासून धीर दिला त्यामुळे असे वाटते की , ऋणानुबंधामुळे मन भाराऊन जाते , बाकी सर्व गोष्टी गौण असतात पण त्या पाठीमागची मैत्रीची भावना महत्वाची असते. मनापासुन आपुलकी खूप मनाला भावते, अर्थात नाती निर्माण होतात ती जपणे महत्वाचे असते. खरेतर तिच्या सर्व मैत्रीणी भारी आहेत आणि तिच्या आनंदात मी पण सहभागी होत असतो . तिच्या सर्व मित्र मैत्रिणींना आमचे हे घर आपले वाटते हे खूप महत्वाचे. सर्वांना आमच्या घरी करमुन जाते.
विजय पिसाळ नातेपुते..
