vijaypisal49. blogspot. com

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

नातेपुते गावात शिवजयंती उत्साही वातावरणात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण






*सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, सर्वधर्म समभावाचे प्रतिक व दृष्ट  दुर्जनांचे संहारक, प्रजाहितदक्ष राजे, मानवतेचे रक्षक, सर्व जाती धर्माला एकत्र करून  हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे , सर्व जाती धर्मातील नागरिकांचे दैवत,  जाती पातीच्या चौकटी बाहेरील राजे , अन्याय अत्याचार व जुलूमशाही विरुद्ध रणशिंग फुंकनारे*

 श्रीमंत योगी .  श्री श्री श्री 
*छत्रपती शिवराय* यांचे  जयंती  निमित्त  बुधवार  दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी . सकाळी  ९ वाजता .  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते* यांचे वतीने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . 
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन . श्री. नारायणगाव देशमुख, श्री आप्पासाहेब भांड, श्री सुनिल राऊत यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन व शिवरायांचे मुर्तीला गुलाब पुष्पांचा पुष्पहार घालून  करण्यात आले  . 
सदर कार्यक्रमाला 
श्री अमरशिल देशमुख, श्री  धनंजय देशमु़ख, श्री प्रशांत सरुडकर, श्री हेमंत   देशमुख, श्री बाळासाहेब बळवंतराव, श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे ,  श्री संजय ढवळे , श्री संजय उराडे  , श्री किशोर ढवळे , श्री शक्ति पलंगे , श्री सुरज चांगण, श्री रोहित चांगण,  श्री सर्जेराव पाटील, श्री समिर सोरटे , श्री जयंत चिंचकर,  श्री नंदकुमार धालपे, श्री कुलभुषण रोटे ,  श्री सुनिल ढोबळे ,  श्री सुरज पवार, श्री संजय चांगण, श्री अरुण कर्चे , श्री प्रशांत इटकर,  श्री अमरसिंह निकम, गणेश निकम.  आदी मान्यवर व गावातील बहुसंख्य नागरीक  आणि शिवप्रेमी  बोलगोपाळ  उपस्थित होते . 
सदर कार्यक्रम अतिशय  उत्साही वातावरण संपन्न झाला . शिवजयंती सोहळा समितीच्या वतीने सर्वांना अल्पउपोहारची सोय करण्यात आली होती . 
या प्रसंगी कैलास सोनवणे यांनी  शिवरायांच्या जयघोषाच्या   घोषणा देऊन वातावरणात उत्साह  निर्माण केला .  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहळा समितीचे , 
 श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे , श्री  कुलभुषण रोटे , श्री सुरज चांगण  , रोहित चांगण, श्री  आबा जाधव, श्री साधू आवळे , यांनी परिश्रम घेतले .

विशेष म्हणजे सर्व शिवप्रेमी नागरीक हे कोणालाही फोन न करता सुद्धा  व्हॉट्सप व फेसबुकवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थित होते .































सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

भारत हा धर्मशाळा नाही . कुणीही बेकायदा या ठिकाणी रहावे आणि देशातील जनतेने निमुटपणे सहन करावे !

चालू घडामोडींचे विश्लेषण





भारतीयांनो जागे होऊया !  हा देश आपल्या  सर्वांसाठी  महत्वाचा आहे . सत्ता कुणाचीही येईल जाईल पण आपल्या सर्व देशवाशियांमधील विश्वास डळमळीत होता कामा नये ! इंग्रजांचे फोडा  व राज्य करा या नितीला बळी पडूनच आपल्या देशाचे तुकडे झाले . देशात एक सुत्रता येण्यासाठी . . स्वतःच्या  धर्माचे आचरण करताना , हा देश कोणत्याही धर्मातील तत्वानुसार किंवा धर्मगुरूंच्या इशार्यावर न चालता घटनेच्या व कायद्याच्या चौकटीनुसार चालला पाहिजे . या देशातील प्रत्येकाचे हक्क अधिकार देतानाच, प्रत्येकाला कर्तव्याची सुद्धा जाणीव असली पाहिजे . जात पात धर्म बाजूला ठेवून सर्व भारतीयांसाठी सर्व कायदे समान असले पाहिजेत. त्याच बरोबर, अल्पसंख्यांक, आदिवासी, सामाजिक व आर्थिक मागास आणि भटक्या जाती जमाती यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत, त्यासाठीच त्यांची संपुर्ण माहिती एका छत्राखाली असायला पाहिजे . म्हणूनच
*संपुर्ण भारतीयांची  धर्म, जात,  प्रांत , जिल्हा, तालुका  व गावनिहाय  जनगणना होऊन एक रजिस्टर बनले पाहिजे . .*
विजय पिसाळ नातेपुते .  संपुर्ण लेख वाचा . .
भारत हा विविध भाषा , विविध संस्कृती , विविध चालीरीती , विविध  रुढीपरंपरा विविध जाती , विविध  धर्म  यांनी बनलेला विशाल मोठा देश आहे . या देशावर पुर्वीच्या काळात असंख्य राजे , महाराजे , यांनी राज्य केले , विविध परकीय आक्रमकांनी शेकडोवेळा या देशाची लुट केली , राजेशाही नंतर भारतावर,  सर्वाधिक काळ  राज्य केले ते ब्रिटीशांनी , शेकडो वेळा लुट होऊन, हजारो लढाया,  रणसंग्राम होऊनही या देशाची संस्कृती टिकली  या देशात  ब्रिटीश राजवटीपर्यंत फारशा समस्या नव्हत्या ,  सातत्याने युद्ध व यादवी याने जरी अंतर्गत कलह होता तरीदेखील  हा भूभाग समृद्ध होता , अखंड  भारतात जेंव्हा ब्रिटीशांनी इथल्या सर्व  राजेशाहींचा पराभव करून एकछत्री राज्यकारभार सुरू केला व या देशातील हातमाग, लघुउद्योग,  कुटीर उद्योग, संपुष्टात आणले  आणि या  देशातील सगळ्या संपत्तीची लुट केली , जनतेला गुलाम बनवले ,  अन्याय अत्याचार केले तेंव्हा पासून एकसंघ भारतीयांच्या मनात असुरक्षित वातावरण तयार झाले , जणू भारत देश गुलामगिरीच्या खाईट लोटला गेला .  ब्रिटीशांच्या धोरणाला कंटाळून जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन सरकार विरूद्ध सामूहिकपणे जनक्षोभ तयार होऊ लागला तेंव्हा ब्रिटीशांनी आपल्या कुटील डावपेचांना सुरुवात केली , सुरूवातीला त्यांनी बळाचा वापर करून, तरूणांची धरपकड करणे , १८५७ उठाव मोडून काढणे , असंख्य नेते व तरुणांना तुरुंगात डांबणे हे प्रयोग केले , जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणले पण जनक्षोभ काही केल्या कमी होत नाही हे दिसताच धर्माच्या आधारे  बंगालच्या फाळणीचा घाट घातला व भारतीय समाजात फुटीची बीजे रोवली , बॅरिस्टर  जीना सारख्या कपटी व महत्वकांक्षी मुस्लिम नेत्याला हाताशी धरून अखंड भारताचे तुकडे तुकडे कसे होतील हेच पाहिले . भारतीयांच्या दुर्दैवाने बॅरिस्टर  जीनाने देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच धर्माच्या आधारावर भारताचे तुकडे तुकडे केले . . पाकिस्तानची निर्मिती , जम्मू काश्मीरचे सामिलीकरण, व बांग्लादेशची निर्मिती हे विषय वेगवेगळे आहेत त्यावर नक्की कधीतरी लिहीणं होईलच. पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या देशातील वातावरण पुर्णपणे गढूळ करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले ते कायमचेच!!  हिंदूंचे  मुस्लिमांकडे संशयाने पहाणे व मुस्लिमांना असुरक्षित वाटू लागणे यातूनच धार्मिक संघर्ष आणि कट्टरवादाचा उदय झाला व असंख्य तरूण यात भरडले गेले .
हे मात्र नक्की . .  पाकिस्तान जरी मुस्लिम राष्ट्र झाले तरीदेखील भारताने धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारले , आणि भारताचा  प्रगतीचा प्रवास सुरू झाला !  पाकिस्तान व बांग्लादेशच्या निर्मिती नंतर पाकिस्तानी व बांग्लादेशी नेतृत्वाला तिथला राज्य कारभार नीट करता आला नाही व त्या ठिकाणी लोकशाही नीट  रुजली नाही त्यामुळे त्याठिकाणी बर्याचदा लष्कर आणि राजकीय पक्ष यांच्यात विसंवाद होऊन सरकारे बरखास्त केली गेली , लष्करी राजवटी तिथे आल्या !  भारत पाकिस्तान यांचे वय सारखे असूनदेखील व तुलनेने पाकिस्तान समृद्ध असूनदेखील, तिथल्या मूलतत्त्ववाद्यामुळे त्या देशात दहशतवाद रुजला फोफवला  ,,त्यामुळे त्या देशाची प्रगती पुर्णपणे खुंटली , पाकिस्तान आज भिकारी व बकाल झाला  तिच परिस्थिती बांग्लादेशची झाली  त्यामुळे तिथे अनियंत्रित लोकसंख्या वाढत गेली , मूलतत्त्ववाद्यांना इस्लाम कधीच कळला नाही, त्यामुळेच पाकिस्तानमध्ये  दहशतवाद्यांचे तळ निर्माण झाले .  पराकोटीचे दारिद्र्य निर्माण झाले , तरुणांच्या हाताला काम मिळत नाही , अशा परिस्थितीत तितल्या तरूणांना मूलतत्त्ववाद्यांनी जिहादी बनवण्याचा  एककलमी कार्यक्रम  हाती घेतला . पर्यायाने पाकिस्तान तर बकाल झालाच पण बांग्लादेश सुद्धा फार नीट राहिला नाही . सहाजिकच त्याची झळ   पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांच्या  सिमेवरील भारतातील  राज्यांना बसू लागली . शेजारी जर दरिद्री असेल तर चांगल्या लोकांना सुद्धा नीटपणे जगता येत नाही तिच परिस्थिती भारताची झाली .  बांग्लादेश व पाकिस्तानात  लोकांची होणारी  उपासमार व अंतर्गत गढूळ वातावरण यामुळे हाताला काम मिळावे , पोट भरता यावे यासाठी पश्चिम बंगाल, नेपाळ, आसाम, जम्मू काश्मीर या प्रदेशातून आपल्याकडे भयंकर घुसखोरी होत राहिली . तिनही देशातील सीमावर्ती भागातील संस्कृती सारखीच असल्यामुळे व सुरुवातीला आपलीही लोकसंख्या कमी असल्यामुळे त्याची झळ आपल्याला जाणवली  नाही पण हे घुसखोरीचे लोण देशाच्या कानाकोपर्या पर्यंत पसरू लागले व इथूनच खर्या अर्थाने चिंता निर्माण होऊ लागली . घुसखोरी बरोबरच आतंकवादी या देशात मुक्त संचार करू लागले आणि या देशातील लोकांचे जगणे खराब केले .
 कायदेशीर मार्गाने व्हिसा व पासपोर्ट काढून रोजगारासाठी कुणी या देशात आला असता तर समजू शकलो असतो . पण या देशातील सीमावर्ती राज्यात यांनी घुसखोरी करून स्थानिकांना हाताशी धरून कागदपत्रे बनवली , ते भारताचे रहिवासी झाले . हळूहळू ते निवडणूका लढवू लागले इतकेच काय तर इथल्या स्थानिक भारतीय नागरिकांवर अन्याय,  अत्याचार सुद्धा  करू लागले . त्यामुळे सर्वप्रथम इंदिरा गांधी यांनी घुसखोरा विरूद्ध कठोर भूमिका घेतली परंतु त्यांची नंतर हत्या झाली . नंतरच्या काळात  दुर्दैवाने राजकारणापाई घुसखोरीचा हा गंभीर मुद्दा कुणालाच गांभीर्याने घ्यावा असे कधी वाटले नाही . या देशात जे १९४७ साली लोक राहिले, या देशाची घटना व कायदे जे पाळतात  त्यांच्या बद्दल कुणाचा आक्षेप किंवा तक्रार असायचे कारण नाही . मग ते धर्माने , मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध, पारसी अशा कोणत्याही जाती धर्मातील असोत, त्यांच्या हक्क आणि अधिकारांना कुणालाही धक्का लावता येणार नाही . मात्र कोणत्याही परिस्थितीत १९४७ नंतलर पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करून बेकायदा आले त्यांची बाजू घेण्याचा व त्यांना अधिकार मागण्याचा व त्यांच्या साठी आंदोलने करण्याचा  कुणालाही हक्क  नाही   किंवा १९७१ नंतर जे बांग्लादेश किंवा अन्य देशातून बेकायदा या ठिकाणी वास्तव्य करत आहेत त्यांचीही बाजू कुणी घेऊ नये दुर्दैवाने घुसखोरीचा मुद्दा बाजूला ,,पडलाय धार्मिक रंग देऊन ध्रुवीकरण केले जातेय व त्याला बळी मात्र सामान्य पडत आहेत   आणि राजकारण मात्र जोरात चालू आहे .
सांगण्याचा मुख्य आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की , यापुढे जर या देशात बाहेरील कुणी बेकायदा घुसखोरीचा प्रयत्न केला किंवा घुसखोरी करून वास्तव्य करू लागला तर त्यांना शोधायची आपल्याकडे कोणतीही यंत्रणा दिसत नाही . Caa व nrc जरी बाजूला ठेवले तरी देशातील प्रत्येक नागरिकांच्या नोंदीचे रजिस्टर हे तयार झालेच पाहिजे . बेकायदा लोक परत घुसले व जर  नोंदणी रजिस्टर  असेल  तर ते लोक  शोधून काढता येतील.
आपल्या देशात, जमीन, रस्ते , दागिने , वस्तू ,  घरे  प्रॉपर्टी , गाड्या , प्राणी , पक्षी , यांची रितसर नोंदणी होते इतकंच काय, मतदार, पदवीधर, विविध संस्था , राजकीय पक्ष, संघटना  यांचीही नोंदणी होते .  मग देशातील नागरीकांची नोंदणी करायला कुणाचा आक्षेप असायचे कारण काय?  हा प्रश्न हिंदु -मुस्लिम या दृष्टिकोनातून बघण्याची व त्यावर राजकारण करण्याची मानसिकताच देशाला रसातळाला घेऊन जाईल. आपल्या देशातील कोणताही नागरीक बाहेर देशात बेकायदा वास्तव्य करू शकत नाही किंवा तसा कुणी प्रयत्न केला तर संबंधित देश घुसखोरावर कठोर कारवाई करतात हे आपण वेळोवेळी पाहिले आहे . मग आपण आपल्या देशात बाहेरील बेकायदा घुसखोर खपवून घे़ण्याची गरज काय?
देशात जर कायदा , सुव्यवस्था  चांगली रहायची असेल तर सर्वांनाच एकमेकांच्या हक्क व अधिकारांची जपणूक करावीच लागेल.
सवलती मिळवताना , सरकारला आपण पाहिजे ति कागदपत्रे देतोच की , साधा पासपोर्ट काढायचा असेल किंवा जातीचा दाखला काढायचा असेल त्यांना सरकारने सांगितलेली कागदपत्रे देणे बंधनकारक असते तिच या ठिकाणी पद्धत राहणार आहे . पण सध्या विनाकारण वाद निर्माण होत आहेत. राजकारण केले जात आहे .
तसेतरी आपल्या देशात राहणार्‍या प्रत्येकाला तुझे मुळ गाव कोणते , तु कोणत्या कारणांनी या गावात रहायला आला आहे . तु या ठिकाणी काय काम करतो आहे . कुणाकडे भाड्याने  राहतो आहे . याची संपुर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे यापुढे बंधनकारक केलेच पाहिजे .  घुसखोरीमुळे गुन्हेगारी वाढतेय, स्थानिकांना रोजगार नाही व बाहेरून ही घुसखोरी . पाणी , रस्ते , वीज, शिक्षण, आरोग्य अशा असंख्य समस्या या देशातील नागरिकांच्या पुढे आ वासून उभ्या आहेत. प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे की  , आपल्या शेजारी जर काही संशयास्पद घडत असेल  , बाहेरची अनोळखी लोक वारंवार एखाद्या ठिकाणी  एकत्र येत असतील. हिंदू विरूद्ध मुस्लिम असे कट रचत असतील तर त्याची खबर देशातील सुजाण नागरिकांनी पोलिसांना दिली पाहिजे . पुलवामा , पठाणकोट, मालेगाव, २६/११  , मुंबईतील साखळी बाँबस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोट  अशा प्रकारची असंख्य उदाहरणे समोर असताना नागरिकांनी गप्प राहता कामा नये . कोणत्याही कायद्याला लोकशाही मार्गाने विरोध जरूर करता येतो ये जरी खरे असले तरीदेखील कायद्याचा आपण अभ्यास न करता विरोध करणे चुकीचे आहे . राजकारणापाई देशातील वातावरण गढूळ करून सामाजिक शांतता भंग करण्याचा कुणालाही हक्क व अधिकार नाही . माझे तर प्रामाणिक मत आहे . पॅन कार्ड  , आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र अशी असंख्य ओळपत्रा ऐवजी , संपूर्ण कुटूंबाची माहिती असणारे , तो कुठेही रहायला गेला तरीदेखील मुळ गावाची व तिथली माहिती असणारे व सध्या राहतो तिथले असे एकत्र माहितीचे एकच ओळखपत्र तयार करून त्याची नोंद रजिस्टरमध्ये केली पाहिजे . त्या रजिस्टरमध्ये , त्याची प्रॉपर्टी व संपुर्ण कुटुंबांची  माहिती असली पाहिजे . खरेतर
देशातील गुन्हेगारी व अनागोंदी याला जबाबदार आपण सर्वजण आहोत.
बाहेरील घुसखोरांना सहानुभूती दाखवण्याची बिलकुल गरज आपल्याला नाही .
 सरकारने बेकायदा देशात वास्तव्य करणार्‍या लोकांना हुडकण्यासाठी गुप्तचर यंत्रणा निर्माण करून, घुसखोरांना शोधून काढले पाहिजे . भारत हा धर्मशाळा नाही व कु़णाचीही जहागीरही नाही . त्यामुळे सरकारने कठोरपणे गुप्तचर यंत्रणा निर्माण करून देशात अशांतता निर्माण करणाऱ्या , गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे  आणि बाहेरील घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.  जात धर्मावरून होणारी आंदोलने व हिंसक घटना या बंद झाल्या पाहिजेत मग ते कोणीही असो व  कोणत्याही जाती धर्मातील असो . .
भारतभूमी सर्वांची आहे .
तिचे अखंडत्व राखणे आपले कर्तव्य  आहे . घटनेच्या चौकटीत राहून  सर्वांसाठी समान कायदे , समान संधी व समान  नियम असले पाहिजेत.
विजय पिसाळ नातेपुते .
९४२३६१३४४९

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा "स्नेहमेळावा २९डिसेंबर २०१९ रोजी संपन्न "

चालू घडामोडींचे विश्लेषण












डॉ. बा. ज. दाते प्रशाला नातेपुते या शाळेत सन १९९२/१९९३ या साली  इयत्ता  वी ला   असणार्‍या माजी  विद्यार्थी /विद्यार्थीनींचा  *स्नेहमेळावा*  २६  वर्षानंतर रविवार दिनांक २९/डिसेंबर २०१९ रोजी  मोठ्या उत्साही  वातावरणात संपन्न झाला . 
सन १९९२/१९९३ या वर्षी डॉ. बा. ज. दाते प्रशाला नातेपुते या शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा संपन्न झाला ,  सदर मेळाव्याचे   उद्घाटन  दाते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन बी दीक्षित सर व उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका  यांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पुजन  करून करण्यात आले .  सुरवातीला श्री समिर सोरटे यांनी आलेले सर्व  गुरूजन तसेच   त्या काळातील शिक्षकेतर कर्मचारी, माजी  विद्यार्थी आणि  विद्यार्थीनी यांचे स्वागत केले . 
व त्यानंतर इयत्ता तिसरीतील कु. 
स्वेतश्री पिसाळ, कु. वेदिका उराडे, कु. मैथली बडवे कु. रसिका ढवळे व इयत्ता चौथीतील कु. श्रेयशी भांबुरे यांनी शालेय प्रार्थना म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले .  जणू या शाळेतील बाल विद्यार्थीनींनी  त्याकाळातील शाळेत होणार्‍या प्रार्थनेच्या आठवणी जाग्या केल्या . तर  श्री विजय पिसाळ यांनी प्रास्तविक करताना 
प्रास्तविकामध्ये शालेय जीवनात या शाळेत  होणारी मान्यवरांची  व्याख्याने, क्रिडा स्पर्धा , स्काऊट गाईडचे कँप, आर एस पी चे संचलन, शाळेचे बँड पथक,  शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, त्याकाळात शाळेत भरणारी विज्ञान प्रदर्शने , वक्तृत्व स्पर्धा , सुंदर  हस्ताक्षर स्पर्धा , चित्रकला स्पर्धा यांचा संपुर्ण आढावा घेतला , त्याचप्रमाणे शाळेतील शिस्त, शिक्षक व विद्यार्थी यांचे असलेले आदरयुक्त नाते आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम याचाही आढावा घेतला , त्याचप्रमाणे गणित, इंग्रजी , मराठी , इतिहास, भुगोल, हिंदी ,  संस्कृत, कार्यानुभव, चित्रकला व क्रिडा  या विषयातील प्रत्येक शिक्षकांची विद्यार्थांना शिकवण्याची  हातोटी  , शिक्षकांची   गुण वैशिष्ट्ये , शिक्षकांचा दरारा व विद्यार्थी यांचेशी असणारे नाते यांचाही उल्लेख करून दिला .  दाते प्रशाला व त्याकाळातील शिक्षक यांच्यामुळे आम्ही कसे घडलो हेही सांगितले . 
सदर स्नेहमेळाव्यास उपस्थितीत शाळेचे माजी मुख्याध्यापक 
मा.  श्री.  वहीकर सर, 
मा. श्री . एस पी दिक्षित सर
मा. श्री . एस. एम. ढोपे सर
मा. श्री. एस. एस शिंदे सर
मा. श्री सी.  डी. जैन सर 
मा. श्री . सुनिल बी.  साळवे सर. 
मा.सौ.एन. एस.मुल्ला (इनामदार ) मॅडम 
मा. श्री. पुरुषोत्तम ए. भरते
 सर
मा. श्री एस एन डांगे सर 
मा. श्री.ए. ए.  स्वामी सर 
मा. श्री.ए. वाय सोनवणे सर 
मा. श्री . एस. एम कुचेकर सर 
मा. श्री एन. जे. जमदाडे सर
 विद्यमान मुख्यध्यापक 
मा. श्री. एन बी दिक्षित सर
मा. श्री. पी. वाय. बडवे सर
मा. सौ.एस. एस कुलकर्णी मॅडम ( एम. पी. के मॅडम )
मा. श्री. ए. के.  खडतरे सर 
मा. श्री. एच. आर. गोरे सर
मा. श्री. आबासाहेब देवकाते सर 
(वरिष्ठ लिपिक )
 या सर्वांचा सत्कार  मानपत्र,  मानाचा फेटा बांधून, हार व श्रीफळ आणि गुलाबपुष्प  देऊन  करण्यात आला .  विजय पिसाळ यांनी लिहलेल्या मानपत्रााचे वाचन श्री औदुंबर बुधावले सर यांनी केले .  
 तसेच त्या काळातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला .  
विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचे प्रतिनिधी म्हणून 
जाकीर निठोरे , रविराज गायकवाड, किशोर ढवळे सौ. स्वाती कुचेकर, स्मिता कुलकर्णी , शमा मुल्ला , सारीका गांधी व स्वाती देशपांडे  यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली व शाळेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या . 
 तसेच श्री.  विजय पिसाळ यांनी स्वतः  शाळेवर केलेल्या कवितेचे वाचण करून  शाळेतील आठवणी कवितेतून जाग्या केल्या . 
डॉ. बा. ज दाते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन बी दीक्षित सर,  प्रा.श्री एस एस  शिंदे सर, सहशिक्षक श्री पी वाय बडवे सर व सौ.  एस एस कुलकर्णी मॅडम  यांनी त्याकाळातील शाळेतील सर्व आठवणीही  अनुभवकथन केल्या  व सर्वांना मंत्रमुग्ध केले . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन औदुंबर बुधावले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नारायण काळे यांनी मानले . 
 शाळेतील  कार्यक्रमाची  सांगता जनगनमन या  राष्ट्रगिताने करण्यात आली व त्यानंतर सर्व शिक्षकांचे हस्ते सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना गुलाबपुष्प देऊन शाळेतून  निरोप दिला . श्री रविराज गायकवाड यांनी सर्वांना सातारी कंदी पेढ्यांचे वाटप करून सर्वांचे तोंड गोड केले .  त्यांतर वन भोजनासाठी व पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी  सर्वांनी मौजे खुडूस ता . माळशिरस या निसर्ग पर्यटनस्थळाला भेट दिली व मौजे खूडूस येथे छानपैकी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि एकमेकांचा परिचय करून देत फोटोशेशनही केले . आणि दिवसभराचे सर्व कार्यक्रम आनंदाने पार पाडत परत कधीतरी असेच एकत्र येऊया व एकमेकांच्या संपर्कात राहुया असे म्हणून सह्रदय वातावरणात सायंकाळी ५ वा . एकमेकांचा निरोप घेतला .  
सदर कार्यक्रमाला सन १९९२/१९९३ बॅचचे खालील  विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या . 
विजय पिसाळ,  सुखदेव ननवरे , सचिन दोशी , स्वप्नील गांधी, रमेश राऊत, राहूल बोत्रे, रविंद्र दावडा, जितेंद्र साळी, नितीन पाठक, नारायण काळे, संदीप गटकुळ, सुरेश बापु पांढरे , अरूण पांढरे, संतोष पागे, दिपक दळवी, समिर सोरटे, अजिंक्य व्होरा , सुधीर काळे, शिवाजी सोरटे, विशाल भंडारी , ज्ञानदेव ननवरे , विठ्ठल रुपनवर, राजवल्ली नदाफ, संतोष कुलकर्णी , रविंद्र बरडकर, विनोद रुपनवर, अशोक डोंबाळे, जावेद शेख, बापुराव रुपनवर, चेतन लाळगे, सुदर्शन बनसोडे , सुरेश गणपत पांढरे , अजय होळ, जाकीर निठोरे, दादा बनसोडे , तुळशीराम राऊत, सचिन डफळ, प्रज्योत डुडू, विशाल दोशी , सत्यजित दोशी , सुभाष पिसे , जयंत चिंचकर, सुनिल महामुनी , नितीन पवार, सतिष बरडकर, किशोर ढवळे , नानासाहेब गोरवे, शिवाजी सावंत, रविराज गायकवाड  , संतोष साळुंखे  , 
उषा ढवळे , मनिषा ठोंबरे , शैलजा लाळगे, परवीन तांबोळी , संयोगिता डुडू, दिपाली इंगोले , निता भरते, सुजाता गांधी, मधुमती झगडे , सारिका गांधी, शैला जाडकर, सुनिता दोशी  , स्मिता कुलकर्णी  , अनुजा गांधी, स्वाती दोशी , दिपाली टकले, शमा मुल्ला , स्वाती देशपांडे , स्मिता शहा , सुरेखा पदमन, पौर्णिमा दळवी, स्वाती कुचेकर, दिपाली उराडे , रुपाली भरते, हेमा भरते हे सर्वजण उपस्थित होते . 
सदर स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी , दाते प्रशाला मित्र मैत्रिणी परिवार व स्नेहमेळावा संयोजन समितीने आहोरात्र परिश्रम घेतले . या मध्ये नियोजनाची संपुर्ण जबाबदारी विजय पिसाळ यांनी पार पाडली तर सुखदेव ननवरे , सचिन दोशी  , समिर सोरटे, जितेंद्र साळी, राहूल बोत्रे, जयंत चिंचकर, या सर्वांनी मोलाची साथ दिली . 
मानपत्र लेखन व शब्दांकन आणि कविता लेखन व वाचन श्री  विजय पिसाळ यांनी केले तर मानपत्राचे डिझाईन करून घेण्यााचे  व  सौजन्य श्री रविराज रामराव गायकवाड यांनी स्वखर्चाने केले ,  अशा प्रकारे सन १९९२/१९९३ वर्षीच्या १०च्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा गुरूजनांचे उपस्थित पार पडला !




मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

आर्थिक मंदीचे दुष्परिणाम!

चालू घडामोडींचे विश्लेषण
आर्थिक मंदीचा छोटासा आढावा . . . . !
आर्थिक मंदी . . . ! 
आज संबंध देशातील प्रत्येक उद्योगधंद्यामधून रोज आर्थिक मंदीची  बातमी येत आहे ....मंदीमुळे इतके कामगार काढले , अमुक तमूक उद्योगपतीचे दिवाळे निघाले . . या कंपनीचे शेअर गडगडले , त्या कंपनीला टाळे लागले. 
पण हे घडतय का ? नेमका प्रॉब्लेम काय? 
इतके तज्ज्ञ असताना , भारताची अर्थव्यवस्था मजबूत असताना हे का घडतंय? 
या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा माझा छोटासा  प्रयत्न, उत्पादीत मालाला उठाव नसणे व बाजारपेठेत मागणी घटने म्हणजे मंदीची सुरूवात होणे पण मागणी अचानक घटत नाही . . .  *लोकांची खरेदी  क्षमता हळूहळू  कमी होत जाते  किंवा याचाच दुसरा अर्थ लोकांचे उत्पन्न नैसर्गिक आपत्ती , सरकारी धोरणे , देशातील  परकीय गुंतवणूक काढून घेतली जाणे , लोकांच्या हाताला काम नसने , नवीन रोजगाराची संधी कमी होत जाणे ,  परदेशात आपल्या मालाची निर्यात कमी होणे , जागतिक स्पर्धेत आपला निभाव न लागणे , वाढती लोकसंख्या  , स्पर्धेत टिकू न शकल्याने  लघू व कुटीर  उद्योगधंदे बंद पडणे  व  शेतातील तोट्यामुळे  ग्रामीण भागात पैसा नसणे ,   याचा परिणाम म्हणून,  ऐकून लोकसंख्ये पैकी ८० लोकांचे विविध कारणांनी उत्पन्न व क्रयशक्ती   घटली  की  , लोक (जनता) मार्केट (बाजारपेठत) मध्ये कमीतकमी खर्च करायला सुरूवात करतात, नवीन गाड्या , नवीन कार व लोकांकडून  छोटीमोठी वहाणे खरेदी बंद केली जाते ,  नवीन घर बांधनी, नवीन गुंतवणूक, लोक नवीन खरेदी  हे प्लॅन पुढे ढकलतात, कारण त्यांना भविष्यात  खिशात पैसा येईल कि नाही याची काळजी व चिंता लागून राहिलेली असते , त्यामुळे सहाजिकच   लोकांच्या खिशात भांडवल कमी होत गेले तर त्याचा फटका  व्यापार औद्योगिक क्षेत्र  आणि बांधकाम क्षेत्राला प्रथमता बसत असतो .
बसणारा फटका कधीकधी पतधोरण, जागतिक उत्पन्न व जागतिक डिमांड यावरही अवलंबून असतो . . 
व्यवसायातील मंदी हटायची असेल तर देशातील शेतीसह सर्वच उत्पादीत मालाची निर्यात होणे व रोजगार निर्माण होणेही  तितकेच गरजेचे असते . . 
त्यासाठी सरकारला उचित पावले उचलून  शेती व उद्योगधंदे यांना काही सवलती व अनुदानेही देऊन हातभार लावावा लागतो . . त्यातून संबंधित वर्गाची शक्ति वाढली की रोजगार निर्मिती होते , रोजगार निर्मिती झाली की, लोकांच्या हातात पैसा खेळतो व तोच पैसा परत मार्केटमध्ये उपलब्ध होऊन, उद्योगधंदे व व्यापार पूर्ववत सुरू होतात. . . 
पण त्यासाठी आपली निर्यात वाढून,  आपल्याकडे परकीय गंगाजळी वाढली पाहिजे . . 
मंदी हाटवत असताना थोडीफार महागाई वाढण्याचीही शक्यता असते . . . 
मंदी हटवण्याचा आपल्या देशासाठी तरी  सर्वात चांगला उपाय म्हणजे जास्तीत जास्त शेतात गुंतवणूक वाढून,  शेतातून रोजगार निर्माण करणे ,  लघू व कुटीर उद्योगातून युवक व युवतींच्या  हाताला काम देणे व सामान्य लोकांच्या हातात पैसा कसा जाईल याचा विचार करणे होय! 
तरच मंदी हटू शकते 
विजय पिसाळ नातेपुते . .

सोमवार, २९ जुलै, २०१९

नव नेतृत्वाचा उदय !

चालू घडामोडींचे विश्लेषण
पुर्णपणे लेख वाचा , पटला तर शेअर करा . . चालू घडामोडींचे विश्लेषण केले आहे . . कोणत्याही एका पक्षावर टिका नाही . . . पण भारतीय लोकशाहीतील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे . . . . 
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९

नव नेतृत्वाचा उदय. . . व सत्ता 
परिवर्तन हा तर  निसर्गाचा नियम. . . . . . . . 
काळ बदलतो तशीच सत्तेवरील माणसेही बदलत असतात. . . 
जगातील प्रत्येक देशात बदल सहजासहजी  स्वीकारले जातात व देशाच्या नेतृत्वाची सुत्रे कुणाच्या तोंडातही नसलेल्या नावाच्या व्यक्तींच्या हाती आनंदाने सोपवली जाते .  
आपल्याकडे बदल तातडीने स्वीकायची लोकांची मानसिकताच नसते . . 
नुसती व्यक्तीपुजा करत बसल्याने व नव नेतृत्वावर सहजासहजी विश्वासच  बसत नसल्याने आपले लोक ५०, ६०  ते ७० वर्ष एका एका व्यक्तीच्या , एका एका घराच्या  प्रेमात पडतात यातील दोन पाच टक्के लोक प्रतिनिधी व घराणी  ही  सक्षम व कर्तृत्ववान असतात ते निवडून आले तर दुःख वाटत नाही पण काही लोक प्रतिनिधी जेंव्हा , जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, सत्तेचा , पदाचा व भ्रष्टाचारातुन मिळवलेल्या पैशाचा बेसुमार वापर करून परत परत सत्तेवर येतात आणि राज्य करतात तेंव्हा मात्र भारतीय लोकांची  मानसिकता आणि लोकांचं अशा लोकांना मिळणारं समर्थन पाहून वाईट वाटतं . . . 
अमेरीकेत कित्येक चांगले कर्तबगार  राष्ट्राध्यक्ष होऊन गेले तरी त्यांची नावे  वारंवार तिथले  लोक घेताना दिसत नाहीत आणि आमच्याकडे मात्र वर्षानुवर्ष काही ठराविक लोकांच्या भवती राजकारण फिरताना दिसते . . . . . 
जुन्यांनी जरूर  चांगला कारभार केला असेल काही चांगले निर्णय घेतले असतील काही आदर्श घालूनही दिले असतील पण याचा अर्थ असा होत नाही की नवीन येणारे सगळे अकार्यक्षम असतील. कदाचित जुन्या लोकांपेक्षाही चांगले काम करू शकतील . . . संधी मिळाली तर असंख्य नवे तरूण सुद्धा जोमाने व नेटाने काम करु शकतात. 
संधी ही नेतृत्वगुण व कार्यक्षमता पाहून मिळायला हवी,  अगदी एखादी व्यक्ती मोठ्या घरातील आहे व तिच्यात जर क्षमता असेल तर त्या व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळायलाच हवी पण इथल्या लोकांची मानसिकताच इतकी विचित्र आहे की , आजोबा , वडील, नातु , पंतू , अजून, शी सुद्धा धुवायला न येणारी पोरं,  अशांना इथले लोक डोक्यावर घेतात. . आणि मग चालू होते , बॅनरबाजी व पोस्टरबाजीकरून, एखाद्या  इव्हेंट कंपनीच्या मार्फत  उमलते नेतृत्व, भावी नेतृत्व, सक्षम नेतृत्व, भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री  अशा उपाध्या देऊन गुणगान गाऊन लोकांवर ही मंडळी लादली जातात व लोकही यांना स्वीकारतात. . . किरकोळ पैसा व तुकड्या साठी पाया पडायला   मोकळेच असतात लोक. . . 
आणि मग 
मिसरूड फुटायच्या आत, रेव्ह पार्ट्या करणारे , पबमध्ये विदेशी ब्रँड रिचवणारे , ललनांसोबत नाचणारे मोठ मोठ्या निवडणूकीला उभे केले जातात, अजोबाच्या व वडीलांच्या पुण्याईवर काही पेंग्गवीन मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पाहतात व सत्तेसाठी काही दळभद्री लोक त्याच समर्थन करतांना दिसतात. . . 
काही निर्लज्ज तिकिटासाठी चप्पल उचलतात तर काही पाया पडतात. . आणि वरूण स्वाभिमानी नेतृत्व असी बिरूद मिरवतात. . .
नेतृत्व चुकत असेल तरीदेखील ब्र शब्द काढलाच जात नाही काही लोकप्रतीनिधी कडून, केवळ तिकिटासाठी व सत्तेसाठी लाचारी पत्करली जाते इथे ,  पण इथली  जनता 
सत्तेचा माज आणि सत्तेची गणिते  झटपट बदलत असते  जनतेला चिरकाल गृहीत धरून जर कोणी हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न केला तर जनता माफ करत नाही . . . 
सत्ता ही कधीच एका ठिकाणी चिरकाल राहात नाही . . . 60 वर्ष काँग्रेस सत्तेवर होती , पण काँग्रेसने स्वतःला बदलले नाही , तेच ते चेहरे तिच ति निष्क्रिय   घराणेशाही, जरूर यातील  काही घराणी निश्चितपणे चांगली होती, जनसेवक होती पण कित्येक घराणी ही सत्ता आणि पक्षाची लोकप्रियता व पैसा यावरच पोसली गेली होती , त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवच राहिलेली नव्हती त्यामुळेच तिथल्या स्थानिक  लोकांनी परिवर्तन करून  नव नेतृत्वाच्या हातात सत्तेची चावी  सोपवली, पण काँग्रेसने त्या ठिकाणी त्यावेळी नेतृत्व बदलले नाही . . व ही वेळ आली . . 
आज भाजपाचा उत्कर्षाचा  काळ आहे . . भाजपा सुद्धा काँग्रेसच्या मार्गानेच जाताना दिसतोय. . .  कित्येक घरात असंख्य पदे व नेत्यांच्या मुलांनाच वारसा हक्काने तिकिटे वाटत सुटलाय! 
ठरावीक चांगल्या लोकांना पक्ष  प्रवेश दिले तर ठिक आहे पण  इथे तर सगळ्यांनाच पवित्र करून घेतले जात आहे . . . जणू गंगेत डुबकी मारावी व पवित्र व्हावे तसे !  कशासाठी तर विरोधक संपवण्यासाठी आणि सत्ता चिरकाल राहण्यासाठी ? पण जनतेला थोडेच हे पसंत पडेल! 
आतातर सरकार चालवतानाही . . . 
फुकटच्या सवयी लोकांना लावल्या जात आहेत. . यात, उद्योगपतींनाही खिरापती दिल्या जात आहेत. . . 
अनुदाने खिरापती प्रमाणे वाटली जात आहेत. . . 
जनतेला फुकटचे काहीच नको असते . . . 
फक्त पायाभूत सुविधा आणि साधनांची उपलब्धता  हवी असते . . 
उद्योजकांना , जशी जागा, रस्ते ,  पाणी , बाजारपेठ,व  सुरक्षितता हवी तसेच, युवकांना रोजगार, शेतकर्यांना   शेततळी , योग्य  बाजारभाव व बाजापेठा, व काही पिकांसाठी  हमीभाव आणि  पुर्ण दाबाने विजेचे गरज असते . . ..क्वचित प्रसंगी दुष्काळ, नापिकी , यात विमा आणि सरकारी मदत आवश्यक असते . . . कोरडवाहू शेतकर्यांना मदत केली तर वाईट वाटायचे कारन नाही पण इथे तर करोडोंची कमाई करणार्‍यांनाही अनुदान स्वरूपात  पैसे दिले जात आहेत! 
मजूरांनाही हाताला काम व त्याचा योग्य मोबदला पाहिजे असतो . . . 
शिक्षणासाठी भरघोस तरतूद हवी असते . 
इथे मात्र काँग्रेस सारखेच  विविध अनुदाने , खात्यात पैसे टाकने चालू आहे  ही गोष्ट टॅक्स भरणार्या  सामान्य लोकांना  न पटणारी आहे . . . कारण सामान्य जनताच टॅक्स भरत असते म्हणून देश चालतो . . 
आज भाजपातही घराणेशाहीचा सुळसुळाट आहे . . . कित्येक अशी उदाहरणे आहेत की , वारसा हक्काने पदांचे वाटप चालू आहे . . . 
जनता कोणत्याही नेत्याला व पक्षाला फार काळ सहन करत नसते . . . 
दिल्ली हे त्याचं बोलकं उदाहरण आहे . . लोकांनी दोघांनाही नाकारून तिसरा पर्याय दिला . . . 
आंध्रातही लोकांनी जुन्या पक्षांचे हाल केले . ..व तिसरा पर्याय दिला व जुन्यांना  त्यांनी  बेदखल केले . . . 
आज काँग्रेस विचारसरणीचे लोकांना वाईट वाटत असेल पण काँग्रेसनेही एका घरासाठी , त्या घराला आव्हान देणारे एक एक जनाधार असलेले  नेते  बाजूला केले व आपोआपच  काँग्रेसची अवस्था वाईट झाली , भाजपातही तेच चालू आहे , मोदी शहां व फडणवीस यांचेसाठी जोशी , अडवाणी , सिन्हा , राजनाथ, सुषमाजी  , खडसे, तावडे, मुनगंटीवार,  यातील कुणाला दुय्यम स्थान दिले तर कुणाला  बाजूला केले गेले . . जेंव्हा सत्ता जाते तेंव्हाच कळते  आपण काय चुक केली ति ! 
सत्तेत असतांना  सत्तेचा वापर करून आपल्याच सहकार्यांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न केला तर, सत्ता जाताच सगळे  पत्ते उलटे पडतात व सगळ्या  हिशेबाची परतफेड केली जाते , नुसती परतफेडकेली जाते असे नव्हे तर ति सव्याज केली जाते . . . 
त्याचाच अनुभव अजितदादा आज  घेत असावेत. . . 
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे . . हा सर्वांनाच लागू होतो . . . 
त्यामुळे सत्तेच्या नसेत कुणीच वावरून उपयोग नसतो . . . 
अजून पाच दहा वर्षात पुढे काय होईल हे छातीठोकपणे कुणीच सांगू शकत नाही . . . 
फक्त बदलांना सामोरे जाण्याची व चांगल्या लोकांच्या मागे उभे रहायची तयारी ठेवायला हवी . . . 
तरूणांनी नेतृत्व करण्यासाठी सक्षमपणे पुढे आले पाहिजे . . . राहुल गांधी राजीनामा देण्यासाठी सहजासहजी तयार झाले नाहीत तर लोकांनीच तसा मेसेज दिलाय. .  तुम्ही सुधरा नाहीतर तुम्हाला संधी नाही ! 
तसीच परिस्थिती येणाऱ्या काळात सर्वच पक्षांची असणार आहे . . . 
विजय पिसाळ नातेपुते ! ९४२३६१३४९

रविवार, ३० जून, २०१९

कवीता . . स्वप्न. . .





स्वप्न हे स्वप्न असते !
फक्त गोड गोड झोपेतच पडत असते !
वार्‍याची झुळुक यावी तशी भेट झाली तुझी क्षणभर!
परत हळुहळू कमेकांची गोड मैत्री  झाली फोनवर!
खूप छान  मैत्रीचे नाते झाले  आपले  खरोखर!
एकमेकांचे स्वभाव, एकमेकांना आवडू लागले , मैत्री रुजली खोलवर !
 अशात एक  स्वप्न पडले रात्री , दचकलो ग मि क्षणभर!
तु सहज बोलली जायचं का फिरायला दुरवर!
नकार देऊच शकत नव्हतो , तुझा भरोसा आणि विश्वास फक्त  माझ्यावर!
आनंदाच्या भरात,दिसू लागले नयनरम्य जग समोर!
हवेत झेपाऊ लागले विमान उंच उंच  वरवर!
तसे माझे आणि तुझे पाय कापू लागले थरथर!
आकाश आणि पृथ्वी यांच्या मध्ये फक्त होता  हवेचाच थर!
साक्षात निर्वार्त पोकळीतून प्रवास किती किती छान आणि  सहज सुंदर!
बघता बघता पोहचलो   आपण मलेशिया,  सिंगापूर इतक्या दुरवर !
आनंदाने नाचत होतो , केवळ झोपेतील पहाटेच्या स्वप्नावर !
मस्तपैकी टॅक्सीने गेलो  हॉटेलवर!
हॉटेल अगदी मस्तपैकी होते बीचवर!
पाहतो तर काय छानपैकी निळा निळा  समुद्राचा किनारा !
हॉटेलच्या परिसरात हिरवा हिरवा   बागबगीच्या सारा !
किती सुंदर होती बाग, त्यातून चालत होतो दोघेच भरभर!
हिरवळ सगळीकडे पसरलेली ,पण लक्ष फक्त गोड गुलाबाच्या  कळीवर!
स्वर्ग अजून काय असतो , वाटायचं इथेच रहावं जन्मभर!
मस्तपैकी खेळावं हिरव्यागार गालिच्यावर!
ताव मारावा छानपैकी गरमागरम जेवणावर!
नाचावं थोडंसं रिमिक्स गाण्याच्या तालावर!
सिनेमाला जावं , रोमँटिक व्हावं,  सगळं कसं आपल्याच मनावर!
अचानक जागी आली , एकटाच डोळे चोळत बसलो होतो बेडवर!
पण मनापासून वाटलं
 असचं  फिराव आणि आनंदी रहावं इतके स्वप्न माझे सुंदर!
स्वप्न इतकं गोड आणि  सुंदर होतं , विसरु गेलतो मि मलाच मि क्षणभर!
कवी . . . विजय पिसाळ नातेपुते . .

रविवार, १६ जून, २०१९

बाळासाहेबांच्या नंतर, मा श्री राजसाहेब संपुर्ण हिंदू धर्माला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे . संपुर्ण हिंदू एकत्रित करायची ताकद फक्त तुमच्याकडेच आहे.

चालू घडामोडींचे विश्लेषण


प्रती . . . 
आदरणीय, मा. श्री . राजसाहेब ठाकरे . . . . . 

विषय. .
प्रखर राष्ट्रवाद व हिंदुत्वाची कणखर भूमिका घेणे बाबत. . . . 

महोदय. . . . . . 

कारणे विनंती पत्रास कारण की ,  
आपण राजकारणातील अभ्यासू व व्हीजन असलेले नेतृत्व आहात. तुमच्या कडे आम्ही आदरणीय बाळासाहेब यांच्या नजरेतूनच  पाहतो. तुमचे वक्तृत्व, कर्तृत्व आणि लोकांप्रति तुमची असलेली  बांधिलकी क्षणोक्षणी जाणवते .   विकासाठी  असणारी तुमची  तळमळ  सातत्याने दिसून येते  . . . 
तुमचे सर्व पक्षात चांगले मित्र आहेत व  संबंध आहेत या बद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. . . 
पण 
मुळातच तुमची संपुर्ण जडणघडण ही बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली व हिंदुत्ववादी विचारसरणीत झाली आहे . . तुमचा संपुर्ण चाहतावर्ग व मतदारही हिंदुत्वाला मानणारा आहे. 
पण सध्या  तुम्ही हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विचारसरणी कडे झुकू लागल्याने तुमचा चाहता वर्ग अस्वस्थ होत असून तो हळुहळू  घटत आहे . खरेतर  तुमच्यावर आजही लाखो हिंदू व  मराठी जनता व जुने शिवसैनिक मनापासून प्रेम करतात. पण तुम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसला पुरक भूमिका घेतल्याने तुमचे हक्काचे  असंख्य लोक  तुमच्यापासून दुर जात आहेत. . . 
मुळातच तुमचा पिंड कडवट हिंदुत्ववादी व सच्चा राष्ट्रप्रेमी असाच आहे ..प्रथम तुम्ही हिंदुत्वादी असल्याने , भाषावाद , प्रांतवाद  हे प्रादेशिक व हिंदू -हिंदू मध्ये एकमेकात फुट  पाडणारे  मुद्दे सोडून, प्रखर राष्ट्रवाद आणि कट्टर हिंदुत्ववादी विचार  घेऊनच  मैदानात उभे ठाकले पाहिजे . . . 
समान नागरी कायदा . .
यासाठी तुम्ही कठोर भूमिका घेतली पाहिजे . 
देशद्रोही व पाकिस्तान धार्जिण्या  विरूद्ध तुमचा आवाज घुमला पाहिजे  व सर्व  हिंदू  एक व्हावेत यासाठी तुमचे योगदान असायला पाहिजे ही तमाम भारत देशातील लोकांची इच्छा आहे . कारण भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी व बेगडी आहे . . 
त्यासाठीच  आदरणीय राज ठाकरे साहेब येणार्‍या निवडणूका तुम्ही  राष्ट्रवाद व हिंदुत्व याच मुद्यावर लढवल्या पाहिजेत. . 
महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण देशाला व हिंदू समाजाला   तुमची गरज आहे . 
शिवसेनेच्या विरुद्ध जास्त उमेदवार उभे न करता , भाजपारुपी ढोंगी हिंदुत्व धारण करून सत्ता गिळंकृत करणार्‍या  अजगराच्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या  विरूद्धच तुम्ही लढले पाहिजे . . . म्हणजे शिवसैनिक सुद्धा जिथे शिवसेनाचा उमेदवार नाही तिथे तुम्हाला साथ देईल. . 
मुळातच तुम्हाला संपुर्ण हिंदूचा पाठिंबा आहे व यापुढेही  राहिल फक्त काँग्रेसच्या सुरात सुर मिळवला तर मात्र तुमचा मतदार हा भाजपाकडे जाणार तसेच  तुम्हाला काँग्रेस व राष्ट्रवादीचा मतदारही कधीच मतदान करणार नाही . . . 
परिणामी निवडणूकीत यश कमी मिळेल. . . 
आंध्र प्रदेशात ज्या पद्धतीने वाय एस आर काँग्रेस स्वतःच्या ताकदीने पुढे आली त्या प्रमाणेच मनसे पुढे येऊ शकते . . . 
फक्त हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवाद आणि समान नागरी कायदा या जोरावर. . 
मुळात तुमचा करिश्मा जबरदस्त आहे व तो  कधीच कमी होणार नाही , 
तुम्हाला जर परत एकदा तुमचा जुना करिश्मा दाखवून द्यायचा असेल, सत्तेवर यायचे असेल तर कट्टर  हिंदुत्वा शिवाय तरणोपाय नाही , भाषा वाद व प्रांतवाद शक्यतो करू नका सगळ्या देशातील, प्रत्येक राज्यातील हिंदू साठी काम करा  असे  जनतेचे मत आहे . . 
देशद्रोही , गद्दारांना तुम्हीच धडा शिकवू शकता . . . 
पवार साहेब, असोत कि, राहूल गांधी असोत यांच्या बद्दल आदर असला तरीदेखील त्यांची सेक्युलर विचारसरणी इथल्या जनतेला विशेषतः तरूणांना   मान्य नाही . . 
ते त्यांच्या जागी कसे का असेनात पण  तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहात व तुम्हाला संपुर्ण हिंदू समाज मानतो म्हणून तुम्ही हिंदुत्व घेऊन लढाई लढली पाहिजे . . . 
शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार शक्यतो  जर कमी दिले व भाजपा विरूद्ध जास्तीत जास्त उमेदवार उभे केले तर सहाजिकच सगळे शिवसैनिक तुमचा छुपा प्रचार करतील व भाजपाच्या उमेदवारवाराला मतदान करण्या ऐवजी तुमच्या मागे येतील कारण तुम्हाला जनता बाळासाहेब म्हणून पहाते. . 
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नादी लागू नका संपुर्ण महाराष्ट्रात तुम्ही जिंकाल अशा कट्टर  हिंदुत्ववादी विचारसरणी असणार्‍या मतदारसंघात ताकदीने  उतरा व कडवट हिंदुत्व जपा हीच मनोमन इच्छा ! 
हिंदुत्वावाला विकासाची जोड द्या . . विकासाच्या बाबतीत तुम्ही जिथे जिथे काम केले तिथे तिथे विकास दिसून आला आहे . 
महाराष्ट्रात शिवसेना कमी होऊन आपल्याला स्पेस मिळणार नाही तर भाजपा कमी होऊन आपल्याला स्पेस मिळेल असे मला वाटते . . . 
एक राज्य शास्त्राचा अभ्यासक म्हणून मला जे वाटते ते तुम्हाला कळवावे वाटले ते  कळवले तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा . . . . 

विजय पिसाळ नातेपुते . . 
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९