पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का बसण्याची प्रमुख कारणे सांगायची म्हटलं तर लेख तसा मोठा होईल पण तरीही थोडक्यात आपण लिहिण्याचा प्रयत्न करुयात..
भाजपाचे संघटन खूप मोठे आहे, भाजपाकडे अत्यंत प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे, भाजपाकडे सत्ता आणि प्रचंड पैसा आहे.
भाजपा बुद्धीभेद करण्यात व फेक नैरेटिव पसरवण्यात माहिर आहे तरीही भाजपाचा पराभव झाला हे कसं शक्य झालं? आम्ही म्हणू तेच होणार , आम्ही करु तेच करायचं , आम्ही लादु तोच उमेदवार असणार आणी हे भाजपा नेतृत्वाचे धोरण यावेळी लोकांना आवडले नाही, खरेतर सातत्याने विजयाचा उन्माद साजरा करणाऱ्या भाजपाच्या निष्ठावंतांना हा पराभव जिव्हारी लागणार आहे ..
मुळात भारतीय जनता पक्षाची गल्ली ते दिल्ली सत्ता आहे तरीही त्यांना जनतेची नस ओळखता येत नाही. हे आता सिद्ध होत आहे.
देशात कधी नव्हे तो प्रचंड भ्रष्टाचार भाजपा राजवटीत सुरु आहे, भाजपाच्या धोरणांनी सामान्य जनतेला महागाईचा प्रचंड त्रास होत आहे.
खतांच्या व किटकनाशक, बुरशीनाशक या शेतीला लागणाऱ्या औषधांच्या व बियाण्यांच्या किंमती बेसुमार वाढलेल्या आहेत मजुरीचे दरही प्रचंड वाढले आहेत पण शेतमाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. केंद्र सरकारने शेतमालाची एम एस पी अगदीच तुटपुंजी वाढवली आहे, साखरेच्या बाबतीत केंद्र सरकारचे धोरण अत्यंत उदासीन आहे मार्केट मध्ये साखर पन्नास ते साठ रुपये असताना साखरेची एम एस पी मात्र फक्त बत्तीस रुपये आहे ती किमान अठ्ठेचाळीस रुपये होणे अपेक्षित आहे.
महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार व त्यातच आलेला दुष्काळ यामुळे जनता होरपळून निघाली आहे. तर भाजपा प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्यात व्यस्त आहे.
भारतीय जनता पक्षाने पाण्याचे व दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य बिलकुल ओळखलेले दिसत नाही, आज शेतकऱ्यांकडे खरीप पुर्ण वाया गेला असल्यामुळे , चारा उपलब्ध नाही आणि भांडवल पण नाही अशा परिस्थितीत दुष्काळी तालुक्यात सरसकट शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आवश्यक असताना सरकार पंचनाम्यांचा खेळ करत शेतकऱ्यांनाच कामाला जुंपत आहे. महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या मदतीची वाट पहात आहे व केंद्र सरकार पण तातडीने मदत करत नाही. भाजपाकडे निवडणुकीत वाटायला प्रचंड पैसा आहे पण शेतकऱ्यांना द्यायला यांचेकडे काहीही नाही, कर्जमाफीत 5% शेतकऱ्यांना सुद्धा यांनी कर्जमाफी दिली नाही.
यामुळे ग्रामीण भागातील जनता भाजपाला आता कंटाळलेली दिसते.
सरकारने एमपीएससी परीक्षा आम्ही पारदर्शक घेऊ हा विश्वास एमपीएससी करणाऱ्या मुला- मुलींना देणे आवश्यक होते , त्या भिमनवारला आणि त्याच्या सर्व टिमला घरी पाठवणे गरजेचे होते आणि जे दोषी असतील त्यांना जलदगती न्यायालयात केस चालवून तुरुंगात टाकणे गरजेचे होते पण सरकारने मुलांच्या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, मुलांना राजकारणाचं काहीही घेणंदेणं नाही हे भाजपाच्या लोकांना कळलेच नाही.
उलट भाजपाचा प्रवक्ता तो नवनाथ बन हा विद्यार्थ्यांची खिल्ली उडवत होता, चित्रा वाघ ,गोपीचंद पडळकर, नारायण राणेंचा तो नेपाळी दिसणारा छोटा पोरगा,सदा खोत आणि भाजपाने पोसलेला सदावर्ते या वाचाळवीरांनी भाजपाची प्रतिमा अक्षरक्षः मलिन केली आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये रोष वाढत गेला.
ग्रामिण भागात शेतीपंपांच्या भारनियमनाने शेतकरी अक्षरक्षः मेटाकुटीला आलेले दिसून येतोय पण भाजपाचे आमदार खासदार व लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पहायला तयार नाहीत, आता 50% शेतकरी पदवीधर आहेत हे भाजपाच्या लक्षात आलेले दिसत नाही.
भाजपात शेकडो इच्छुक असताना निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्याला उमेदवारी न देता आयत्यावेळी ज्या पक्षाच्या सदस्य नाहीत अशा व्यक्तीला उमेदवारी बहाल केली.
भाजपाने ही निवडणूक तिथेच 50% गमावली होती.
भाजपाने अरुण लाड व शरद लाड यांना अमिष दाखवून फोडाफोडीचे राजकारण केले याचाही लोकांना राग आला. या उलट हर्षदा देशमुख या सहा ते सात वर्ष एकाच पक्षात निष्ठेने काम करत होत्या , पदवीधरांचे प्रश्न, एमपीएससी आंदोलन यात हर्षदा देशमुख यांनी सातत्याने लक्ष दिले व आपली उमेदवारी मजबूत केली.
भाजपाकडे सत्तेची मस्ती व मगरुरी प्रचंड वाढलेली असल्यामुळे भाजपाने प्रत्येक गावात गुंडाना राजाश्रय दिलेला दिसून येत आहे. ज्याची सामान्य जनतेला भीती वाटते , महिलांना असुरक्षित वाटते आणि त्यामुळे सामान्य जनता भाजपा पासून दुरावत चालली आहे.
भाजपात कित्येक वर्ष निष्ठेने काम करणारांना आता कोणतेही काम उरलेले नसल्यामुळे ते नाराज आहेत आणि भाजपात बाहेरुन इतकी भर्ती झालीय की मुळचा कट्टर भाजपाचा कार्यकर्ता अडगळीत पडलेला दिसून येतो.
याउलट काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाकडे फारशी यंत्रणा राहिलेली नव्हती, तळागाळात काम करणारे कार्यकर्ते अगदी बोटावर मोजतील इतकेच होते, पाच जिल्ह्यात सामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक पैसाही उपलब्ध नव्हता तरीही ही निवडणूक सुज्ञ पदवीधरांनी हातात घेतली होती.
भाजपाचे 100 कार्यकर्ते समोर असतील तर मविआचे फक्त चार पाच कार्यकर्ते काम करत होते. पण मविआसाठी सोशल मिडीयात काम करणारे कार्यकर्ते हे गेमचेंजर ठरलेले दिसतात तसेच मविआकडून ज्यांची जनमानसावर पकड आहे असे नेते होते, शरद पवार हे कुठेही सक्रिय नव्हते पण त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते प्रचंड आहेत हे या निमित्ताने परत एकदा अधोरेखित झाले , भाजपाने राजु शेट्टी व महादेव जानकर यांना जो त्रास दिला, त्यांचे संघटन खिळखिळे केले ते लोकांना बिलकुल पटले नाही. मविआकडे
सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील, सांगली जिल्ह्यात जयंत पाटील व विश्वजीत कदम , व विशाल पाटील कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील ,सातारा जिल्ह्यात शशिकांत शिंदे , पृथ्वीराज चव्हाण व खुद्द प्रभाकर देशमुख आणि पुणे जिल्ह्यात रोहित पवार व सुप्रिया सुळे यांनी जोमाने काम केले..
भाजपाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराला आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न केला वजनदार पाकिटे पदवीधरांना वाटली अशी चर्चा आहे पण पदवीधरांनी पाकिट घेऊन सुद्धा मतदान केले नाही हे आता सिद्ध झालंय कारण पदवीधर हे हुशार असतात त्यांना चांगली अक्कल असते हे भाजपाला कळलेच नाही केवळ लोकांची दिशाभूल करुन व पैशाचा प्रचंड वापर करुन निवडणूक जिंकता येत नाही हे या निवडणुकीत सिद्ध झाले.
भाजपाने सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचे कार्यकर्ते फोडून व दबावतंत्राचा वापर करुन आणि मोहिते पाटलांचे खच्चीकरण करुन , मोहिते पाटलांचे राजकारण संपवण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो भाजपाच्या वेळोवेळी अंगलट आलेला दिसतोय, सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा आणि आताची पदवीधर निवडणुक ही मोहिते पाटलांनी अतिशय सुक्ष्म प्लॅनिंग करुन हाताळली जवळ असलेल्या कार्यकर्त्याना सातत्याने संपर्क ठेवला खुद्द खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संपर्क करुन बळ दिले तर रणजितसिंह मोहिते पाटील व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सातत्याने जनसंपर्क ठेवलेला दिसून येतो.
या उलट भाजपाने राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडायचे काम केले ते लोकांना आवडले नाही, राम सातपुते अतिशय खालच्या लेवलला जाऊन मोहिते पाटील परिवारावर टिका करतात हे लोकांना पटत नाही, ज्या मोहिते पाटलांनी राम सातपुते व उत्तम जानकर यांना आमदार केले त्यांना भाजपाने केवळ टिका करण्यासाठी वापरलेले दिसून येते.
भाजपाने आतातती पैशाच्या व फोडाफोडीच्या राजकारणा पासून बाजूला होऊन निष्ठावंतांची कदर करावी..
काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोक फोडून किती दिवस राजकारण करणार ?
इतरांची मुलं दत्तक घेऊन तुमचं नाव लावण्या ऐवजी , तुम्ही मुलं जन्माला घाला व तुमचे नाव लावा..
दत्तक घेतलेली मुलं थोडीच रक्ताची असतात? तुमची सत्ता आहे तोपर्यंत ती तुमची राहतील .
विधानसभा लाडक्या बहिणींनी वाचवली पण प्रत्येक वेळी हे गलिच्छ राजकारण यशस्वी होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी आतातरी महाराष्ट्रात विनाशकारी प्रकल्प राबवू नयेत मग वृक्षतोड असो की एआय डेटा सेंटर असो.
विजय पिसाळ नातेपुते..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा