vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आनंदी क्षण कसे जगावेत

चालू घडामोडींचे विश्लेषणजीवन जगत असताना आपल्याला स्वतःसाठी, कुटुंबासाठी, नातेवाईक ,मित्र परिवार, आणि आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जगता आलं पाहिजे, आनंद देताही व घेताही आला पाहिजे. आनंदाचे क्षण  सोबतीने साजरे करता आले पाहिजेत. मिळून मिसळून राहता आले पाहिजे. हेही सत्य आहे की,
सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतीलच असेही नाही. कुठेतरी समाधानी असले पाहिजे. सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात सुद्धा
काही गोष्टी मनापासून पोटतिडकीने मांडायच्या असतात , बोलायच्या असतात, काही गोष्टी फक्त मनात ठेवायच्या असतात तर काही गोष्टी प्रत्यक्ष करुन कृतीतून दाखवून द्यायच्या असतात.
कोणतीही गोष्ट मनात तपासून करायची असते व ती  करताना सर्वांची मने जपण्याचा आपण प्रयत्न जरुर केलाच पाहिजे, मात्र सगळ्याची मने आपण जपताना कोणतीही गोष्ट सर्वांच्या मनाप्रमाणे होईल याचीही खात्री नसते.कधी कधी आपण खूप चांगले वागतो पण समोरच्या व्यक्ती आपल्याला समजून घेतीलच  याची शाश्वती नसते, आपल्याला काही वेळेस त्रास होतो , पण तुम्ही आम्ही कोण प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, यांनाही त्रास झालाय , कधीकधी आपण प्रामाणिक काम करतो तरीदेखील त्रास होतो पण  अशावेळी त्रास सहन करत आपल्या कामावर लक्ष देत राहणे केंव्हाही चांगलेच , त्रास देणारांकडे  दुर्लक्ष करणे आणि पुढे जाणे हा एकमेव पर्याय असतो.सर्वांच्या मनाप्रमाणे आपण कधीच असू शकत नाही व तेही आपल्या मताप्रमाणे असतील किंवा आपलेही सर्व योग्य असेलच हेही निश्चितपणे सांगता येत नाही.
म्हणून आपण या जीवनात सर्वांबरोबर चांगलेच वागायचे ठरवायचे  मग समोरची व्यक्ति किंवा समाज कसाही असो !
चांगले वागत राहिलो तर आपोआप लोक जोडले जातात व जीवन आनंदी होते किंबहुना सर्व सुखाची प्राप्ती होते.
विजय पिसाळ नातेपुते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा