vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

काय ती झाडी ! काय ते डोंगर !!!


चालू घडामोडींचे विश्लेषण


काय ती झाडी ,काय ते डोंगर!!

*काय ती झाडी ?काय ते डोंगर? सगळीकडे कशी  छान छान हिरवळ !*
*रोज रोज हॉटेलमध्ये खाऊन व्हायची आम्हाला मळमळ !*
*बाहेरच खाऊन पहाटे  पोटात यायची कळ मग नुसती पळापळ, पळापळ*
*राज्यात  माजली तेव्हा भलतीच  खळबळ!*
*निधीचे कारण केले आम्ही पुढे ,पण पुरावा नव्हता सबळ !*
*कोर्ट कचेरी सुरु झाली नुसती बघा रोजची पळापळ*
*स्थापन झाले दोघांचे घाई घाईत मंत्रिमंडळ !*
*कोर्टाचा  निकाल लागेना   आमची नुसतीच तळमळ !*
*मंत्रीपद मिळाले नाही तरीसुद्धा  करणार नाही आम्ही वळवळ !*
*तेंव्हा मनमोकळे बोलूही देत नव्हते कडक शिस्तीचे झिरवळ !*
*विकास निधी पाहिजे इतकीच  आमची मुख्यमंत्री साहेबांना गळ !*
*मंत्रीपद मिळाले तर आम्हालाही येईल हत्तीच बळ*
विजय पिसाळ नातेपुते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा