vijaypisal49. blogspot. com

बुधवार, १ मे, २०१९

दुष्काळाची दाहकता . . . व पाणी आडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम!

चालू घडामोडींचे विश्लेषण


विविध ठिकाणी पाणी फौंडेशनची व विविध स्वयंसेवी संस्थांची  कामे चालू आहेत. . . . पाणी आडवले गेले  पाहिजे पाणी जमिनीत  जीरले पाहिजे . . . 
पण जमिनीची धूप न होता हे झाले पाहिजे . . . 
बर्याच ठिकाणी चर खोदकाम केले जाते व मातीचा भराव टाकला जातो ,  पण याची भिती अशी  आहे की . . .  मोठा पाऊस झाला की , खळखळ पाण्यामुळे सगळी माती पाण्या बरोबर वाहत जाते ,  जमीन खचते व अपेक्षित पाणी सुद्धा साठत नाही , माती समुद्राला जावून मिळते , कृत्रिम जलसाठे निर्माण केलेले आहेत त्यातही प्रचंड प्रमाणात गाळ साठतो ,  पर्यायाने  मनुष्यबळ, श्रम व पैसा पाण्यात वहात जातोय. . . मुळातच  हे 
आपण  निसर्गावर अतिक्रमण करतोय असे  माझे ठाम व पुर्णपणे विचार करून व्यक्त  केलेले मत आहे . . . 
पाणी साठवण्याची ही शाश्वत पद्धत नाहीच! 
पाणी जमिनीत मुरण्यासाठी . . . . 
झाडे लावणे झाडांना समांतर चर खोदून व झाडांच्या मुळामार्फत जि जमिनीला रंध्र (भेगा)पडतात त्यातून पाणी  मुरवणे हाच पर्याय असतो . . 
आणी ज्या ज्या ठिकाणी भरपूर झाडे असतात त्या ठिकाणी दुष्काळाची तिव्रता बिलकुल जाणवत नाही . . 
मुळात प्रचंड वृक्षाची कत्तल सुरू असल्याने पाऊस कमी झालाय, त्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही , यामुळे  तापमान वाढलेले आहे व त्यामुळे जमीनी धुप सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे , धुळीचे लोट वाळवंटातील वादळासारखे उडत आहेत,  शासनाने व लोकांनी मनापासून  झाडे जगवली पाहिजेत  व नैसर्गिक ओढे नाले यावर छोटे छोटे बंधारे बांधले पाहिजेत व दुसरी गोष्ट जुन्या काळी ज्या प्रमाणे  मोठ्या प्रमाणात कोल्हापुर पद्धतीचे बंधारे बांधले , लघु प्रकल्प उभारले गेले , छोटी छोटी तळी निर्माण केली गेली व त्यातून जलसाठे निर्माण केले गेले तोच पॅटर्न महत्वाचा आहे . व तोच राबवला जात नाही . 
आज विविध ठिकाणी  स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे , मात्र पुर्णपणे जलतज्ज्ञांची मदत न घेतल्याने बहुतांश कामे अशास्त्रीय पद्धतीची चालु आहेत. . . 
सर्रासपणे ओढे उपसून वाळूची वाट लावली जात आहे वाळू व माती बाहेर काढल्याने त्यात पाणीच मुरत नाही . ..फक्त फोटो काढायला पावसाळ्यात दिसते व बाष्पीभवन होऊन पाणी संपुण जाते ,  शासनाचा पैसा मात्र पुरेपूर  मुरतोय. . 
म्हणून करोडोंचा खर्च होऊनही पाणी काही साठत नाही व दुष्काळही हाटत नाही . . 
हे असेच चालू राहिले तर जमिनीचा -हास ही गंभीर समस्या निर्माण होणार हेही तितकेच खरे आहे . . . 
विजय पिसाळ नातेपुते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा