चालू घडामोडींचे विश्लेषण
चाळीशीच्या उंबरठ्यावरील जीवनप्रवास होत आला . . . . . . . ..पण अजूनही स्वतःसाठी जगायचेच राहून गेले की काय? असे बहुतेकांना मनातून वाटत तर नाही ना ?
या साठी हा लेखन प्रपंच. . . . . .
विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९
पुरुष असो की महिला असो . . . . आयुष्यातील एकदा का चाळीशीचा टप्पा जवळ आला किंवा चाळीशीत आला की , जवळपास तो पुरूष किंवा ति महिला पुर्णपणे प्रगल्भ होते अशी आपल्या समाजात रुढ मान्यता आहे. चाळीशीत पोहचलेल्या किंवा चाळीशी पार केलेल्या पुरूष व महिलांचा तारुण्यातील सुखद व धकाधकीचा प्रवास आता एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपलेला असतो .
मुलांचं शिक्षण चालू झालेले व बर्यापैकी खर्च वाढलेले असतानाच स्थिरस्थावर होऊन कुठेतरी राहण्यासाठी आवश्यक असलेलं स्वतःचं टुमदार घर, एखाद्या छोटीसी का होईना , चारचाकी गाडीचे स्वप्न. . ही नवीन संसारातील गरज निर्माण झालेली असते , भरपूर आव्हाने तर असतातच पण त्यातही व्यवसाय किंवा नोकरी यात तो बर्यापैकी सेटल असेल तर काही अडचण असायची शक्यता असत नाही ! मात्र काहीजणांना विशेषतः प्रायव्हेट सेक्टर मधे कमी पगार असेल तर व व्यवसाय बेताचा चालत असेल तर आर्थिक आघाडीवर तर झुंजावे लागतेच मात्र प्रपंचाचा डोलारा सांभाळताना खूप ओढाताण सुद्धा होत असते . बहुतेकांना कॉम्प्युटर चे व बैठे काम असतेच, त्यामुळे डोळ्यांना त्रास निर्माण होतो, मग चेष्मा , शुगर बीपी , कंबरदुखी , असे छोटेमोठे आजार डोके वर काढायला सुरूवात झालेली असते . जो चाळीसी मध्ये सुद्धा या कोणत्याही समस्यांचा सामना करत नाही तो खरोखर तंदुरुस्त असतो . त्याला भाग्यवान म्हटले पाहिजे !
आज मि चाळीशीच्या उंबरठ्यावरील लेख लिहण्याचे प्रायोजन काय हा माझ्या बहुतेक वाचकांना प्रश्न पडला असेल. .?
मित्रांनो . . . आयुष्यातील प्रत्येक वळणावर मनुष्य वेगवेगळी स्वप्न पहातो . . शालेय जीवनात खूप अभ्यास करावा, नाव कमवावे , चांगली नोकरी किंवा योग्य व्यवसाय करून स्थिरस्थावर व्हावे व सुयोग्य जोडीदार मिळावा ही स्वप्न बहुतांश मुला मुलींची असतात. ..व आईवडील सुद्धा तसेच संस्कार करत असतात, यात गैर काहीच नसते . . बहुतेकजणांची मेहनतीने ही स्वप्न पुर्ण होतात सुद्धा . . . गोजिरवाण्या घरात एकदोन मुलं आई वडील बायको असा सुखाचा संसार चालू असतो . . . जणू जग जिंकल्याच्या थाटात वावरू लागतो मनुष्य प्राणी . . .
पण खरी आयुष्याची गंमत किंवा मजा तिस वय संपून हळूहळू जसा तो पुढे सरकू लागतो . . . तेंव्हा चालू होते ! . . आईवडील व्यवसाय किंवा नोकरीतून रिटायर्ड होत असतात. त्यांचा दवाखाना चालू होतो. पण मुला मुलींना कामामुळे आईवडील यांच्याकडे लक्ष देताना धावपळ होत असते विशेषतः दवाखान्यात तासंतास वेटिंग मुळे !
मुलंही मोठी होतात, त्यांचे शिक्षण, आजारपण व इतर खर्च वाढतच असतात, त्यातच घरासाठी , गाडीसाठी , बहुतेकजण लोन काढून स्वप्न पुर्ण करायचा प्रयत्न करतात . मग घराचा ईएमआय (हाप्ता) गाडीचा इएमआय, दैनंदिन घर खर्च यातून मिळणारा पगार किंवा व्यवसायातील इन्कम अपुरा वाटायला लागतो . . कितीही जास्त पगार असो पण पुरतच नाही . . . .
नोकरीवाला तर वाढत्या खर्चाची चिंता असल्याने सुट्टी घेत नाही , उलट ओव्हर टाईम करून जास्तीची कमाई होईल का यासाठी प्रयत्न करतो ! व्यवसायिक सुद्धा जास्तीत जास्त नफा यासाठी रात्रंदिवस पळत असतो . . . हे सर्व करताना तो कधीच स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही . हळूहळू वय वाढत जाते . . त्यातून आईवडील वयस्कर होऊन आजारी तरी पडतात किंवा जगाचा निरोप तरी घेतात. . .
आयुष्याची ओढाताण मात्र सुरूच असते . . .! नुसते धावणे आणि धावणे . . .
यात तो मनुष्य मग स्त्री असो कि पुरूष स्वतःसाठी जगायचे विसरूनच जातात. . .
अगदी , ओझे वाहणारे गाढव, घाण्याच्या बैल हे तरी बरे त्यापेक्षा वाईट अवस्था केवळ मोठेपणासाठी करून घेतलेली असते . . .
इतरांचे पाहून कधीकधी मुलांना भरमसाट फि असणार्या शाळेत घालण्यासाठी ओढाताण करून घेणे, शासकीय किंवा नजिकच्या दवाखान्यात चांगले उपचार मिळत असताना सुद्धा लक्झरी सेवा देणाऱ्या दवाखान्यात उपचार करून घेणे , घरातील सामान खरेदी करताना ब्रँडच्या नावाखाली पैशाची वारेमाप उधळपट्टी करणे , महागडे कपडे, महागडे फर्निचर, यातून मोठेपणा मिरवणे . .
बँकांच्या फसव्या जाहिरातीला भुलून क्रेडिट कार्डचा गर्वाने वापर करून समस्या गंभीर करने ,
गरज नसतानाही क्लब जॉईन करने . . . ओघानेच हे सर्व करताना कधीच स्वतःकडे मात्र लक्ष न देणे अशा चुका करत असतो बहुतेकजण आपण. . .
या जीवनप्रवासातील किती वेळ स्वतःसाठी देतो आपण, कितीवेळा मित्र मैत्रिणी यांना भेटतो आपण. . . गरजा वाढवतोच व त्या पुर्ण करण्यासाठी परत डाँकी वर्क करत राहतो यापलीकडे बहुतेकजण जगतच नाहीत. . . आपण!
पैसा जरूर कमवा, खूप मोठे व्हा, स्वप्न सुद्धा मोठी असूद्या , पण हे करताना आपले जगणे मात्र दुःखी निरस्त करू नका . . .
आणि तुमच्या जीवणाचे मुल्यमापण करण्याची हीच चाळीशीतील योग्य वेळ ओळखायला शिका ! . . .
जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे व वर्षा दोन वर्षातून घरातील सर्वजण किंवा मित्र मैत्रिणी , यांच्या सोबतीने छोट्या मोठ्या सहलीला गेले पाहिजे . . .
चाळीमध्ये येऊन तुम्ही जगलाच नाही पुढे तुम्ही मनसोक्त काय जगणार? स्वतःचे जीवन नुसते असेच कष्टात घालवून काय मिळवणार?
चाळीशी पर्यंत मजबूत असणारे शरीर हळुहळू कमजोर होत जाणार, हळूहळू जबाबदाऱ्या वाढणार, परत मुलींच्या लग्नाचे व मुलांच्या सेटलमेंटचे दडपण मनावर येणार व यातूनच विविध आजारांचा नव्याने जन्म होणार. .
हे सर्व टाळायचे असेल तर केवळ आणि केवळ सर्व करत असताना स्वतःसाठी वेळ द्या , मित्र मैत्रिणी यात मिसळा , एकमेकांना फोन करा , थोडंतरी म्यॅच्यअर्डपणा कृतीतून दिसूद्या , जीवनाचा आनंद घ्या , बिनधास्त मनसोक्त जगायचा प्रयत्न करा . . गरजा कमी करून बचतीचे मार्गच तुमचे भविष्य सुरक्षित करतात हे जरी खरे असले तरीदेखील स्वतःचा जीव कधीच मारू नका . . . प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा मनमोकळा , मनमुराद प्रयत्न करा . .
जेंव्हा तुम्ही चाळीशी ओलांडून पन्नासीकडे जाल तेंव्हा जगायचे राहूनच गेले असे व्हायला नको. तरूपणी तुम्ही कमावते असता तेंव्हा तुम्हाला परिवारात मानसन्मान असतो तेंव्हाच जीवनाचा आनंद लुटा . . सुना बाळा आल्यावर जगण्याची परिभाषाच बदलते हे जेष्ठांच्या तोंडून ऐकू येतेच ना ? म्हणून वयाचा महत्वाचा टप्पा हा चाळीशीनंतरचा सुरक्षित करा व जीवनाचा प्रवास मानव म्हणून करा . . .
लेखक. . .
विजय पिसाळ नातेपुते
एम ए राज्यशास्त्र. . . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा