vijaypisal49. blogspot. com

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

शेतकर्यांची परवड थांबेल कधी

शेतकर्यांची परवड  थांबेल कधी ?

कधी पाण्याची चिंता, कधी अनियमित वीज,कधी डीपीचा घोटाळा, कधी मोटारीचा घोटाळा,  तर कधी बेभरवशी बाजार भाव तर कधी ओले संकट तर कधी दुष्काळ, तर कधी
भांडवलाची कमतरता,
कधी वादळ तर कधी गारपीट
कधी रोगराई तर कधी मजुर टंचाई तर कधी  जंगली जणावरे व उंदीर घुस यांचा त्रास कधी भेसळयुक्त खते तर कधी
डुप्लिकेट बीयाने तर कधी
बोगस खते शेकंडरीच्या नावाने २५० रु बॅग ७००रू शेतकर्यांना विकणे,

या सर्व समस्यांचा सामना करत शेतकरी शेती करतो
पण याची जाणीव कित्येक लोकांना नाहीच,
बीगर चप्पलने अनवाणी फिरणारा शेतकरी, गाई, गुरे वासरे, शेळ्या मेंढ्या कोंबड्या सांभाळत संसाराची गाडी ओढणारा शेतकरी बांधव बघून वाईट वाटते, त्याच्या मुलांना शिक्षणासाठी सवलत नाही, त्याला मोफत दवाखाना नाही, त्याच्या लेकी बाळींना संरक्षण नाही, सणासुदीला कपडे नाहीत, आनंदाचे काहीही नाही, वरून बँका सावकार यांचा जाच चालूच, शेतकर्यांना सगळे कायदे कडक,
कित्येक वर्ष झाली महाराष्ट्रात आजही काही ठिकाणी हात रुमाला खालून व्यापर होतोय, मुंबईत तर शेतकरी अक्षरशः लुटला जातोय,
आडत मुक्तीची घोषणा झाली तरीही अनेक ठिकाणी डायरेक्ट रोख रक्कम पट्टीवर न दाखवता आडत वसूल केली जात आहे,
शेतकर्यांची कोंडी केली जात आहे,
जो पर्यंत शेतकर्यांचा माल बाजारांत येत नाही तो पर्यंत कोणताही माल दुप्पट तिप्पट किंमतीला ग्राहकाला विकला जातो,
पण तोच माल शेतकर्या जवळ आला कि बाजारांत दर प्रचंड प्रमाणात घसरतात नव्हे पाडले जातात,
यातूनही शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो,
रात्रंदिवस कष्ट करून उत्पादन घेतो
पण
सरकारचा जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायदा,
आयात निर्यात धोरण शेतकर्यांच्या  मुळावर उठते!
शेतकरी मेला तरी चालेल पण
फुकट खाणारा, लांखोंची कमाई असूनही फक्त शेतमालाच्या महागाई बाबतीत बोंबाबोंब करणारा वर्ग जगला पाहिजे हे धोरण
शेतकर्यांच्या मुळावर उठते आहे,
जगाच्या बाजार पेठेतून परकीय चलन घालवून शेती माल आयात केला जातोय, पण इथे शेतमाल कवडीमोल दराने जावूनही निर्यात  बंदी करून शेतकर्यांची कोंडी केली जाते आहे,  स्वदेशीचा पुरस्कर करणारे आपण
विदेशी कंपण्यांना भारतात गुंतवनूक करायला पोत्साहन देत आहोत,
हजारो कोटीचे कर्ज व टॅक्स उद्योजकांना माफ होतोय
पण
सामान्य शेतकरी यांची कर्जमाफी होत नाही,  मध्यम व छोटे व्यापारी यांची टॅक्स साठी वेगवेगळया नियमाने छळवणूक केली जात आहे,
शेतकरी मालाची वाहतुक व आवक जावक करणारांकडून भरमसाठ टोल वसुली केली जात आहे,
पण
चैनीच्या लाखो रुपयांच्या कार गाड्यांचा टोल मात्र माफ होत आहे,
आंतरराष्ट्रीय बाजारत क्रुड तेलाच्या किंमतही ७० %घटूनही
ग्राहकाला मात्र पेट्रोल डीझेल महागाईनेच घ्यावे लागत आहे
शेतकरी विकास फक्त भाषणात व थातूरमातूर योजणात निव्वळ दाखवला जातो आहे,
शेतकरी व शेतमजूर गोरगरीब आज मरत आहेत व उद्योगपती मात्र आनंदात आहेत
याचा शेतकर्यांच्या मुलांनी विचार करायला पाहिजे,
जातीपातीच्या बंधना ऐवजी शेतीसाठी पुरक धोरणे राबणारे जे कोणी काम करेल त्यालाच साथ दिली पाहिजे,
घरात पिठ नसल्यावर कोणी पावणा रावळा, आपल्या जाती धर्माचा म्हणून पिठ आणून देत नाही,
शाश्‍वत शेतीचा विकासच देशाला प्रगती करू देवू शकतो

विजयकाका पिसाळ नातेपुते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा