vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

हिंदू धर्म

हिंदू धर्म. . . .

धर्माला , देवाला नावे ठेवणं तसं फार सोप्पं असतं त्यातल्या त्यात असंख्य लोकांना दुसर्‍याच्या धर्माला जास्त नावे ठेवायला आवडते !
पण धर्म समजून घेणे त्याचे रोजच्या जीवनात आचरण करणे तसे महा कठीण काम!
शिव्या घालायला थोडेच पैसे लागतात!
म्हणून धर्म जाणून घ्या , वाईट प्रवृत्तींकडे लक्ष देवू नका , सर्वच धर्मात वाईट लोक असतात म्हणून धर्माला वाईट म्हणता येत नाही !
आजही ९९% धर्माचे पालन करतात पण, ते स्वतःच्या पातळीवर करतात!
काही मतभेद असतात, मात्र त्याचे रूपांतर मनभेदात होवू नये !
चर्चा करताना धर्मातील अनिष्ट प्रथावर बोलताना कोणी मार्ग सांगितले म्हणून लगेच त्याला धर्मद्रोही म्हणू नये !

हिंदू धर्म आहे की हिंदू संस्कृती आहे की, जीवन जगण्याची कला आहे हे निश्चित पणे मला तरी  सांगता येत नाही ,पण
 माझ्या मते
मनःशांती साठी प्रार्थना करणे  माता पिता व संस्कृती या बद्दल कृतार्थ भाव असणे . .
गुरू बद्दल आदर, पुर्वजा बद्दलचा अभिमान, जेष्ठांचा मानसन्मान, ज्या  चराचरात आपण रहातो खातो, पितो वाढतो , याच्या संवर्धनासाठी,  त्याचे जतन करण्यासाठी,  विविध मार्गाने त्याची उपासना करणे म्हणजे संस्कृती जपणे हीच ति संस्कृती आहे . .
जिथे, सुर्य चंद्र तारे ग्रह यांची उपासना केली जाते !  देव देवतांना मानुन उपासना केली जाते, उपवास केले जातात,
त्यामुळे शरीर व मन शुद्ध होते ! थकवा कमी होतो !
देवाला नमस्कार केल्याने देव प्रसन्न होईल की नाही मात्र देवालयाच्या पायर्या चढताना , फेर्या मारताना निश्चित शरीराला फायदाच होतो . .
देवाच्या नैवेद्याच्या निमित्ताने आपल्याच गोडधोड मिळते , नव नवीन पदार्थ खावून आनंददायी जीवन जगता येते !
हीच शिकवण सर्व  धर्मामध्ये असते . . .
कारण  धर्मीक कार्यातून व सर्वच गोष्टीतून,
 प्रत्येकातून मानवाला आवश्यक अशी उर्जा प्राप्त होत असते . . त्यांचे मानवी जीवनात असाधारण महत्व आहे !
या नैसर्गिक गोष्टीतून मानवी जीवन समृद्ध बनत असते . . जसे
निसर्गातील उर्जा असेल तरच अन्न वस्त्र निवारा यांची निर्मिती होते म्हणून आपण निसर्गातील, वेली , पाने , फुले , फळे , याचा जगण्यासाठी उपयोग करत असतो . . तसेच
परमेश्वराच्या नावाने आणलेले फुल देवघरात देवाला वाहिल्यानंतर संपुर्ण घरात सुगंध दरवळू लागतो हाच भाव देव पुजेमागे असावा असे मला तरी वाटते . .
देव आहे की नाही यात न जाता . .
त्याची पुजा अर्चा श्लोक पठण, आरती उच्चारण,  केल्याने मन तर प्रसन्न होतेच पण आपल्या वाणीमध्ये मधुरता येते , पाठांतराची आवड निर्माण होते . .
एक प्रकारे  चांगले वागण्याचे मनावर संस्कार होत असतात!
या साठी सर्व गोष्टी स्वतः करायच्या असतात,असतात,हो  केवळ स्वतःच!
बाहेरील गुरूजी बोलावून पारायण केल्याने , किंवा पुजा घातल्याने स्वतःवर संस्कार ते काय होणार?
कार्यक्रम केल्याने  लोकांना खायला घालून लोकांना सोबत घेतल्याने जरूर मनाला आनंद मिळतो पण तेही करताना आपली आर्थिक परिस्थिती बघून करावे . . .
नुसते पुण्य लाभेल या भ्रमात न राहता . .
असंख्य लोकांना गाव जेवण घालून थोडेच पुण्य लाभते ?
त्यासाठी सत्कर्म करावे लागते . .
रोजच्या जगण्यात सत्यपना लागतो , कुणाचीही फसवणूक आपल्या हातून होता कामा नये !
हाच हिंदू धर्म सांगतो
केवळ एखादा सत्यनारायण घातला तर फक्त. .
गुरूजी येणार त्यांच्या वेळेच्या नुसार थोडेफार मंत्र उच्चारण करणार पण ते आपल्या डोक्यात काय जाणार?
त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास. .
जोपर्यंत एखादी गोष्ट आपण स्वतःहून आवडीने करत नाही , तिची सत्यता पडताळत नाही   तिचा सर्व कसोट्यावर  अभ्यास करत नाही , तोपर्यंत तिचा फायदा किंवा तोटा कधीच आपल्याला समजत नाही . .
हिंदू संस्कृती ही देव, देवळे, पुजा अर्चा , अभिषेक, नारायण नागबळी या पुरती नुसती  मर्यादित नाही तर ति खूप महान व विशाल आहे , तसेही ही  कर्मकांडे करण्याची  गरज नाही ! हिंदू धर्मातील परंपरा थोर आहेत. .
हिंदू  संस्कृती कितीतरी मोठी आहे , या संस्कृतीचा आणि भारतीय जनतेचा तसाही खूप मोठा संबंध आहे .
हिंदू संस्कृती ही कृषी संस्कृती आहे म्हणून हिंदू संस्कृती मध्ये गायीला पवित्र स्थान आहेच  ,,मात्र  प्राण्यासाठी सुद्धा सण उत्सव आहेत,  गाईचे  दुध दुपते व तिच्या पासून मिळणारे पशूधन हे शेतीसाठी आवश्यक आहे!  यातील काही गोष्टी  खूप मनाला भावतात आणि कुठल्याही संस्कृती मधील ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच स्वीकारायच्या असतात. .
वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो
तसेच या हिंदू संस्कृती बाबतीत आहे
यात काही चुकिची कर्मकांडे, चातुरवर्ण व्यवस्था , जातीभेद हे तसेही चुकच आहेत,
कुणाला उच्च कुणाला नीच समजने हेही गैर आहे
मात्र हिंदूच्या  सर्वच धर्मग्रंथामध्ये या वाईट गोष्टींचे कुठेही समर्थन दिसून येत नाही . . .
काही ठिकाणी घुसखोरी झाली असेलही . .
पण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे . .
आपली संस्कृती कोणत्याही समुदायाचा द्वेष करायला शिकवत नाही . . . कोणत्याही जातीचा द्वेष करणे हि आपली परंपरा नाही ,
म्हणून आपली असलेली हिंदू संस्कृती अबाधित राहिली पाहिजे !
ति आपली आहे , तिचे महत्व मोठे आहे ति संस्कृती परकीय  लोकांची नाही !
या भुमिवरील पवित्र हिंदू धर्माचे कोण वाटोळ करत  तर नाही ना याचाही विचार करूया !

धर्म हि गोष्ट पवित्र आहे, त्यात शांती असते, त्यात जीवन जगण्याचा मार्ग असतो . .
धर्म हा अभ्यासाचा विषय आहे . .
कुणी राजकीय फायद्यासाठी धर्मचा वापर करू नये, केवळ आणि केवळ राजकारण धर्मात आल्यामुळे धर्मात विविध विचार प्रवाह निर्माण झाले . . राजकारण विरहित धर्म जपला पाहिजे तरच सर्व हिंदू बांधव एकत्र येवून जगाला आदर्श असा हा देश बनवू शकतील!  पण .
राजकीय लोकांमुळे धर्म बदनाम होत आहे ! 

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा