vijaypisal49. blogspot. com

रविवार, १२ मे, २०१९

झाडे वाचली तरच आपण वाचणार!

चालू घडामोडींचे विश्लेषण





























वृक्ष संवर्धना शिवाय. . . . निसर्गाचा समतोल कठीणच. . . . . 
©® लेखन. .    विजय पिसाळ नातेपुते . . . . . ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

आज जिकडे तिकडे प्रचंड उकाडा , तापमान वाढ आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारे  पाऊसमान, यामुळे वारंवार  पडणारा दुष्काळ या दुष्टचक्रात भारत देशातील ७० %भाग आडकला आहे ! 
"डोंगर उजाड झाले , पाऊसमान संपून गेले" 
ही अवस्था आज जवळ जवळ ७० %भारत देशाची झाली आहे . . 
दरवर्षी करोडोंचा खर्च वृक्ष लागवडीसाठी व देशातील विविध भागातील दुष्काळ निवारणासाठी केला जातो . . पण दुष्काळ व तापमानवाढ ही समस्या तशीच राहते आहे . . . देशातील किंवा राज्यातील  सरकार कोणतेही असो सुदैवाने  वृक्ष लागवड  तर केली जाते मात्र  दुर्दैवाने  लावलेले वृक्ष संवर्धन करण्यासाठी ना सरकारला अस्था असते ना सामाजिक स्थरावरील लोक पुढाकार घेतात. . मुळातच देशातील नागरीकांना प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असे वाटते ! जनसहभाग नसेल तर कोणतीही योजना यशस्वी होत नाही . . 
आज अनैसर्गिक पद्धतीने, अशास्त्रीय पद्धतीने  ओढे नाले साफसफाई केली जातेय तोच गाळ कडेला टाकला जातोय व तोच गाळ परत ओढ्यात येतोय,  जमिनीवर चर खोदून सुपीक जमिनीत पाणी मुरवण्याचा अयशस्वी प्रयोग केला जातोय, मुळात जमिन खोदून माती काढून तिची प्रचंड प्रमाणात धूप केली जातेय व तिच माती ओढे व धरणे यात परत येऊन साचतेय व ओढे आणि धरणे गाळाने भरत आहेत,  मुळात नैसर्गिक ओढे व त्यातील वाळूच जर उपसली गेली तर पाणी जमिनीत मुरणार कसे !  वाळू  उपसून ओढा खोलीकरण व रुंदीकरण केले गेल्यावर वाळूच नष्ट होणार व  यात वाळू  नष्ट झाल्यामुळे बंधार्यात फक्त  पावसाळ्या मध्ये  मुबलक दिसते , छानपैकी फोटो काढले जातात पण ते पाणी मात्र टिकत नाही ! त्याचे प्रचंड  बाष्पीभवन होऊन ते पाणी  संपुष्टात येते व परत दुष्काळ मात्र पाचवीला आहेच! 
या साठी निसर्ग नियमानुसार ओढ्यात व नद्यात वाळू आवश्यक आहे व त्याचा उपसा सुद्धा नियंत्रणात गरजेनुसार व्हायला हवा !     मुळात जलतज्ज्ञ , डॉ राजेंद्रसिंह, समाजसेवक  अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांनी जे पॅटर्न राबले ते खूप महत्वाचे होते व आहेत! त्यात 
चराई बंदी, कु-हाड बंदी करणे व  यातून वृक्ष आणि  जंगलाचे संरक्षण आवश्यक आहे .
पडणारे पाणी झाडामुळे तर जमिनीत मुरतेच पण  साखळी बंधारे ,,नाला बंडीग,  कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व लघू प्रकल्पच  यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब आडवला जाऊन  दुष्काळ हटवता येऊ शकतो  व डोंगराळ भागात याला भरपूर स्कोप आहे पण मुळात, कोणत्यातरी शासकीय अधिकार्याच्या सुपीक डोक्यातील कल्पना राबवून दुष्काळ हटवण्याचे प्रयोग केले जात आहेत. . त्याचाच एक नमुना म्हणजे अनैसर्गिक पद्धतीने चालू असलेले जलयुक्त शिवार अभियान. . . यात ठेकेदार, ट्रॅक्टर मालक व जेसीबी मालक हे आणि अधिकारी मालामाल झाले पण पाणी पातळी पावसाळा सोडला तर जैसे थे ! 
मुळात जल संवर्धन हे जंगल संवर्धनावर अवलंबून आहे .  जंगल नसेल तर पाऊस पडणार नाही व पाणीच पडले नाही तर वॉटरकप काय? जययुक्त शिवार काय? नुसता उलटा कार्यक्रम होणार हे नक्की ! 
आज कित्येक ठिकाणी झाडाची अनियंत्रित कत्तल चालू आहे . वनसंरक्षक व वनअधिकारी हे समाजातील गाव गुंड व सरपन आणि झाडांची तस्करी करणारे  संबधित लोकामुळे हतबल झालेले आहेत. 
काही ठिकाणी तर वनसंरक्षक व वनअधिकारी यांचे आशीर्वादानेच संरक्षित वनांची कत्तल होत आहे. 
कागदोपत्री वृक्ष लागवडीचे करोडोंचे आकडे दरवर्षी प्रसिद्ध होतात मात्र लावलेली झाडे किती वाचवली जातात हा खरा  मुख्य   संशोधनाचा  विषय आहे . . . 
वाढते शहरीकरण व रस्त्यासाठी , कित्येक डोंगर आणि झाडे भुईसपाट करावी लागत आहेत पण त्याची भरपाई इतर ठिकाणी झाडे लावून व ति  मोठी करून केली जात नाही . . 
डोंगररांगा जर गच्च झाडांनी वेलींनी वेढल्या व डोंगरांना जाणीव पुर्वक आगी लावायचे बंद झाले नाही तर मात्र सर्व कठीण आहे . . 
आज काही नालायक लोक बीडी सिगारेट ओढून पेटती काडी व सिगारेट बीडी रस्त्यावर किंवा डोंगरावर टाकतात व क्षणात ते ठिकाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडते . . . या बिडी व सिगारेटला पायबंद कोण घालणार! 
काही दारूडे जंगलात जाऊन दारू पितात व दारूनंतर तिथेच बीडी सिगारेट व मटणाच्या पार्ट्या करून आग न विझवता तसेच नशेत येतात त्यानेच जंगलांना आगी लागलेल्या दिसून येते ! 
सांगायचा मुद्दा हाच आहे की, 
त्याला पायबंद घातला पाहिजे ! 
यापुढे सरकारने 
 शेतकर्यांना सुद्धा  उपयुक्त  आणि निसर्गासाठी  आंबा , चिक्कू, चिंच, आवळा , कळक(बांबू ) ही बांधावर व कंपल्सरी कायदा करून झाडे लावायला लावली पाहिजेत त्याला काही वर्षे अनुदान दिले पाहिजे . वनजमीनीवर झाडांचे संवर्धन करण्यासाठी , तलाठी , ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल, कृषी सहाय्यक  व सामाजिक संस्था आणि होतकरू तरूणांच्या सहभागातून विविध कार्यक्रम राबवून झाडे लावा व त्याचे संवर्धन करा हा उपक्रम हाती घेतला पाहिजे . . 
नुसती दरवर्षी झाडे लावून व ति जळून जाऊन तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन हे रोखले जाऊ शकत नाही . 
त्यासाठी झाडे मर्यादित लावावीत मात्र ति किमान ८०%जगावीत तरच काहीतरी साध्य होईल! 
संपुर्ण देशात व राज्यात संपुर्ण वनक्षेत्रात कु-हाड बंदीची अंमलबजावणी १००%व्हायला पाहिजे ! 
आज रस्त्याच्या कडेचे लिंब, चिंच, वड, आंबे,  सुद्धा शेळ्या मेंढ्यांच्या चार्यासाठी तोडले जात आहेत. . 
त्यावर कुणाचाही अंकुश दिसून येत नाही .
म्हणून सरकार आणि समाजातील जागृत घटकांनी पुढे आले पाहिजे . . . 
प्रत्येक शाळा, कॉलेज आणि प्रत्येक गावाला झाडे जगवण्याचे टार्गेट दिले पाहिजे व त्यावरूनच त्याला अनुदान सुद्धा निश्चित केले गेले पाहिजे ! 
व त्या झाडांचे अॉडीट केले पाहिजे तरच संपुर्ण भारत व आपले राज्य दुष्काळ मुक्त होईल! 
लेखक. . विजय पिसाळ नातेपुते ©®९४२३६१३४४९/९६६५९३६९६९

शनिवार, ११ मे, २०१९

स्वभाव.

चालू घडामोडींचे विश्लेषण


स्वभाव. . . . . . प्रकरण १. . . . .
©®विजय पिसाळ नातेपुते . . . . .
मनुष्य हा प्राणी जगातील एकमेव प्राणी असा असावा की , त्याच्या बाबतीत सतत म्हटले जाते "जगात प्रत्येक आजारावर औषध आहे,  पण स्वभावला औषध नाही "  आणि जवळ जवळ हे सत्य आहे,  असे वाटते .
समाजातील विविध  वयोगटांतील लोकांचे निरीक्षक केले तर पटकन लक्षात येते , लहाण व्यक्तींचा स्वभाव, मध्यम वयाच्या व्यक्तींचा स्वभाव, प्रौढ व्यक्तींचा स्वभाव आणि वयोवृद्धांचे स्वभाव यात जमिन अस्मानाचा फरक दिसून येतो व त्यामध्ये खूप  बदल सुद्धा जाणवतात  किंवा वेगवेगळ्या गाटातील स्वभाव वेगवेगळे असतात. तसेच  वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसेच  विविध जाती धर्मातील परंपरा किंवा त्यामध्ये होणारे संस्कार यामुळे सुद्धा जाती धर्मानुसारही स्वभावात फरक पडतो . प्रत्येक धर्मात सुद्धा  विविध पंतामध्ये लोकांचे विभाजन झालेले पहायला मिळते व त्यातही लोकांच्या स्वभावात  परत बदल झालेले  दिसून येतात. जेंव्हा शहरी भागातील लोकांचे स्वभाव  वेगळेच असतात राहणीमान व  त्यानुसार त्यांचे स्वभाव बदलते दिसून येतात,  ग्रामीण भागातील लोकांचे स्वभाव वेगळेच असतात,  आदिवासी  असो की  झोपडपट्ट्या  असोत,  सुशिक्षित की ,  कमी शिक्षित किंवा अडाणी असोत, अशा वेगवेगळ्या  लोकांमध्ये  फिरत  असताना ,  तुम्हाला विभिन्न स्वभावाचे लोक पहायला मिळतात. . . पाटील, देशमुख ते देशस्थ कोकणस्था पर्यंत, आगरी कोळी ते दलित वस्त्या पर्यंत, सोन्याचांदीचा व्यवसायिक ते रस्त्यावर बुट पॉलिश करणारा पर्यंत, किरणा दुकानदार ते फळविक्रेता ,,शेतकरी ते शेतमजूर आणि क्लास वन ऑफिसर ते शिपाई कामगार इथपर्यंत  वेगवेगळ्या स्वभावाची माणसे तुम्हाला पदोपदी दिसून येत असतात. . .
मग हे स्वभाव कसे विभिन्न असतात, त्यात बदल कसे होतात याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की , कोणत्याही व्यक्तीमध्ये  आयुष्याच्या सुरवातीला त्याला  जे वातावरण मिळते , ज्या  समाजात व ज्या परिसरात  त्याची  वाढ होते व जो धर्म  जन्मताच त्याला मिळतो व  ज्यात त्याची जडणघडण होते ,  राहण्याची जागा व घरातील आर्थिक व समाजिक स्तर यावरून सुद्धा माणवी स्वभावात आमुलाग्र बदल झालेले दिसून येतात. . .
स्वभावातील बदल आणि संस्कार हे मनावर बिंबणार्या विविध घटनावर अवलंबून असतात. . . .
उदा . . .
लहाणपणा पासून जर एखाद्या घरातील लोक चोरी करून जगत असतील तर आपोआपच त्या घरातील मुलांवर चोरीचेच संस्कार होतात व अशा मुलांचे बाबतीत असे आढळून येते कि, या मुलांचा  देखील चोरी करण्याचा स्वभाव बनत असतो. सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीचा हा कल्चर म्हणजे संस्कृतीवर अवलंबून असतो . एखाद्या घरातील लोक जर आपली उपजीविका शिकार करून करत असतील तर सहाजिकच त्या कुटूंबातील लहाणांचे स्वभाव हे काहीप्रमाणात हिंसक असल्याचे दिसून येते . स्वभावाचा आणि आहाराचा सुद्धा काही अंशी संबध येतो , शांत व संयमी लोकांचा आहार बहुतांशी सात्विक असल्याचे दिसून येते . उदाहरण द्यायचे झाले तर कोणाताही शाकाहारी प्राणी हा हिंस्र असत नाही त्यावर सहजासहजी ताबा मिळवता येतो , मग त्यात हत्ती , घोडे, उंट, गाय, बैल, शेळ्या , मेंढ्या , हरीण, ससे अशा विविध प्राण्यांचा समावेश यात होतो व अशाच प्राण्यांचा वापर मानव सुद्धा करत आला आहे .
*स्वभाव ही गोष्ट कदापि बदलणारी असत नाही*
वर्षानुवर्ष जे लोक गुलामगिरीत जगत असतात ते त्या लोकांवरच धुर्त लोक अापला अंमल प्रस्थापित करत असतात मग गुलामगिरी पत्करणारे संख्येने कितीही जास्त असले तरीदेखील हे होत राहतेच.
कारण इतिहास हेच सांगतो की गुलामगिरीत ज्यांचा जन्म होतो तो गुलामगिरीच पत्करतो कारण गुणसूत्रा नुसार त्याचा स्वभाव गुलामगिरीस अनुकूल असा असतो .
प्रकरण(१) एक समाप्त. . . .
क्रमशः . . . .

शनिवार, ४ मे, २०१९

मित्रांनो आयुष्य आनंदी जगुया !

लेख पुर्णपणे वाचा नक्कीच उर्जा येईल. . .
























चालू घडामोडींचे विश्लेषण

🌺🍁🌸🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🌺
गुंतागुंत माझ्या मनाची
©®विजय पिसाळ
*या सुंदर आयुष्यात मि, दुःखी नाही व  कुणावर नाराज पण  नाही.*
*कारण आपल्या  आयुष्यात जे जे घडते ते आपल्या हातात  काहीच नसते व पुढे काय घडणार हे पण आपल्या ध्यानीमनी नसते, सगळा खेळ सृष्टीचा , विधात्याचा* माझ्या आयुष्यात
*कित्येक संकटे आली व त्यातून सातत्याने मार्ग निघाला , २००७ पासून जवळपास २०१८ पर्यंत तब्बल ११ वर्ष संघर्ष केला  कित्येक कठोर  अघात सोसले यात वडीलांचे अकाली जाणे असेल, नंतर आईचे अजारपण, नंतर माझे मनक्याचे काहीकाळासाठीचे पण महाभयंकर  आजारपण ज्यात प्रत्येक डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेले होते ,  जवळपास  जे सर्व डॉक्टरांना माझे बरे होणे व पहिल्या सारखे तंदुरुस्त होणे  अशक्य वाटत होते. पण हे कठीण आजारपण मि माझ्या  इच्छा शक्तीच्या बळावर पळवून लावले यासाठी मि प्रचंड चालणे , पोहणे व नियमित  व्यायाम  आणि अवघड  किल्ले चढाई यातून माझे ठणठणीत  पुर्णपणे बरे होणे  शक्य झाले , मि बरा होतोय तोपर्यंतच यात भरीस भर म्हणून   वादळात जवळपास केळीची ७ एकर बाग भुईसपाट होऊन  २० ते २२ लाखांचे नुकसान झाले  व या सर्वांवर कढी म्हणजे पत्नीचे  अजारपण व उपचारांचा प्रचंड खर्च तरीदेखील मि  कधीच डगमगलो नाही की, खचलो नाही सर्वांवर यशस्वी मात करत आयुष्याला जिंकायचा प्रयत्न केला व यशस्वी झालो . परमेश्वराची कृपा समजा किंवा नशीब म्हणा किंवा कष्टाचे फळ समजा पण  नोहेंबर २०१८ पासून सर्व संकटे संपली व परत आनंदी पर्व सुरू झाले, मुलीला  १० ला ९१%मार्क, लहान मुलगा व मुलगी सुद्धा  खूप हुशार  आहेत सोबतीला मनापासून साथ देणारी  पत्नी सदैव पाठीशी आहेच  ,  आईचे, मोठे बंधू व , बहिणींचींचे आशीर्वाद पाठिशी सदैव असतात  !   मग   ,  अजून काय लागते आयुष्यात,  हा प्रवास घरातील  सर्वांच्याच  पाठबळावर व मित्र  , सोबती,  हितचिंतक   यांनी दिलेल्या  मानसिक  ताकदीीवर  व वेळोवेळी एकमेकांच्या साथीमुळे व  आधारावर पुर्ण केला*
*हे सर्व काही घडत असताना*
  *वेदना कितीही झाल्या तरी खचलो नाही , आयुष्यभर जीवलग   मित्र खूप  मिळाले , त्यातील  काहीजण अडचणीत   दूर सुद्धा  गेले  थोडीशी मनाची  घालमेल  झाली मात्र  कधीच कुणावर  राग व्यक्त केला  नाही.* जीवनात
*मनातील भावना व्यक्त करताना कदाचित कुणी दुःखावतं तर कुणी सुखावतं हा नियमच सृष्टीचाच  मात्र मि कधीच कुणाशीही संवादाचे मार्ग बंद करत नाही* विसंवादला थारा नाही .
*मला सगळ्यांनाच समजून घेण्याची तशी सवय आहे व शक्यतो मि फारसा कुठे व्यक्त होत नाही पण जे आपुलकीने बोलतात आपले वाटतात, त्यांना मनापासून सर्व सांगतो कारण बोलून मन हालकं होतं हा विचार असतो*
*कित्येकवेळा माझ्याकडून चुकाही होतात, त्या जवळच्या मित्रांजवळ  कबूल सुद्धा करतो  व त्यावर मनन चिंतन करायची तयारी सातत्याने  ठेवतो , आणि कुणी समजून घेतले तर माझे मन  सुखावते , नाही समजून घेतले तरीदेखील मि  सोडत नाही माझ्यातला   शांतपणा  मात्र समोरच्या वैक्तीच्या डोक्यातील आपल्या बद्दलचा राग व गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत बैचेन मात्र होत  असतो मी*
*सर्व नात्यावर प्रेम करायची आवड असल्याने व ति नाती कधीच  तुटू नयेत असेच वाटते व तेच  माझे मन मला सांगते व त्यासाठी मि शक्य होईल तेवढी माघार घेणे पसंत करतो*
*समोरच्या व्यक्तीला आपल्याशी बोलून हालकं वाटतं असेल तरीही बोलतो किंवा एखाद्याला आपल्याशी  बोलायचे नसेल आपल्याला टाळायचे असेल  तरीदेखील माझी बिलकुल हरकत नसते कारण कुणालाच आपल्यामुळे ठेच लागू नये हेच वाटते* या आयुष्यात फक्त
*जिंकायचं आहे आपुलकी व प्रेमाने !  सर्वांनाच आपलेसे करायचे   आणि घट्ट करायचे आहेत मैत्रीचे बंध म्हणून कधीच कुणाबरोबर कधी किरकोळ दुरावलो तरी , स्वतःच पुढाकार घेऊन गैरसमज  दुर कसे  होतील हाच प्रयत्न असतो माझा  , व कुणीही असो मि  कधीच माझ्याकडून संवाद बंद करत नाही   ,  का ते  माहीत नाही पण माझा स्वभावच  तसाच आहे.*
*जगू वाटत स्वतःसाठी ,पण इतरांशीवाय कधीच करमत पण नाही आणि  जीव तुटतो खूप .*
*आयुष्य खुप सोपं आहे , गरजा मर्यादित आहेत , पण जगता येत नाही  एकटं एकटं हाच  मुळ स्वभाव आहे .*
*त्यामुळे आयुष्यात कित्येक मित्र मैत्रिणी जोडता आले, यादी खूप मोठी तयार झाली जेवढा जमेल तेवढा वेळ पण दिला सर्वांसाठी त्यातून बहुतेकांनी मनापासून प्रेम दिले,  हीच  कमाईच समजतो मी*
*लहान व्हायचं स्वप्न आता पुर्ण होणार नाही , मित्राांना मि सदैव म्हणतो  ,शाळा , कॉलेजचे दिवस परत नाहीत  , कधीतरी एकत्र येवूया   व आयुष्यातील काही आपुलकीचे मित्रांना  भेटूया ,  काहींना नसतो वेळ  पैसा पैसा करतात  पण त्याबद्दलही  माझी  तक्रार  नाही , माहिती आहे गेलेली वेळ परत येत नाही म्हणून क्षणात सर्व दुःख विसरुन छानपैकी जगावे वाटते मला.*
*माझी  सुखाची व्याख्या व परिभाषा सर्वांना समजून घेणे व सर्वांसाठी जगणे हीच आहे म्हणून  वाटते आयुष्यात जोडलेली प्रत्येक व्यक्ती सदैव माझी मित्र म्हणून रहावी व मैत्रीचे प्रेम जपणारी असावी , यात मला सुख आहे , मला कधीच माझ्यामुळे कुणाची नाती तुटावीत, कुणाला त्रास व्हावा असे चुकीचे  वाटतही नाही म्हणून मि सदैव सर्वांसाठी माघार घेतो व मैत्री  जपण्याचा प्रयत्न करत राहतो*व हे जीवन जगताना कुणाचेही मन दुःखी होईल, कुणाच्याही  स्वाभिमानाला ठेच  लागेल ही बिलकुल भावना नसते माझी , जगायचे ते साधेसरळ,  हीच माझ्या मनाची भावना असते व त्यातच सुख मानतो मि.*  मग तो मित्र असो , कि मैत्रिणी असोत की , नातेवाईक असतोत,
माझ्या आठवणी

*विजय पिसाळ  नातेपुते
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
                                                                            *😴🙏🏻तुमचा दिवस आनंदी जावो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना   🙏🏻😴