चालू घडामोडींचे विश्लेषण
माढा लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य वजनदार नेत्यांच्या भाजपामधील प्रवेशामुळे ,भाजपा उमेदवार
मा. श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे, श्री संजय शिंदे यांना कडवे आव्हान!
वाचा श्री. विजयकाका पिसाळ यांचे लेखणीतून. .
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
माढा लोकसभेच्या प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपून दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले . .
दोन्ही उमेदवार हे सतत पक्ष बदलणारे व कधी भाजपा कधी सेना कधी राष्ट्रवादी, तर कधी काँग्रेस तर कधी शेतकरी संघटना
यात कमीजास्त काम केलेले आहेत, तसेच ते जुने मित्र सुद्धा आहेत, दोघांकडेही साखर कारखाने व दुध संघ आहेत, त्यामुळे सहाजिकच आपआपल्या भागात त्यांनी लोकांना रोजगार दिला आहे व काही प्रमाणात दोघांकडेही बर्यापैकी लोकसंग्रह आहे असे असले तरीदेखील रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ज्या पक्षात काम करतात त्या ठिकाणी ते प्रामाणिक पणे पक्षासाठी झोकून देतात, त्याचप्रमाणे ते जो काही निर्णय असेल तो उघडपणे घेताना दिसतात.
या उलट संजय शिंदे यांनी मात्र राजकीय पदे मिळवण्याठी विविध राजकीय पक्षात प्रवेश केलेला आपणांस दिसून येतो . त्यांनी विधिसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला व राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल यांना अडचणीत आणले , विधानसभेची निवडणूक होताच काही महिन्यांतच लगेच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत जिल्हा परिषद अपक्ष लढवली व भाजपातील नेत्यांचा गोड गोड बोलून विश्वास संपादन केला आणि राष्ट्रवादीतील आपले बंधू बबनराव शिंदे यांच्या पाठिंब्याने व पवार साहेबांशी आतुन साधलेल्या संधानामुळे जिपचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले ..पवार साहेबांनी सुद्धा बबनराव शिंदे यांनी भावासाठी पक्ष विरोधी काम करून सुद्धा बबनराव शिंदे यांना पाठिशी घातलेले दिसून येते , संजय शिंदे यांनी वेळोवेळी भाजपा नेत्यांना गोड बोलून निधी मिळवला मात्र भाजपाच्या नेत्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवून परत एकदा राष्ट्रवादीची झुल पांघरली . . व भाजपासी दगाबाजी केली , भाजपाने वेळोवेळी विचारणा करून सुद्धा मि लोकसभा लढणार नाही, मला विधिसभा लढायची आहे. असे सांगुन ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली .
यामुळेच भाजपातील त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना तोंडघशी पडावे लागले! यामुळे कमालीचे नाराज झालेले मुख्यमंत्री व पालमंत्री यांनी तातडीने पावले उचलत त्यांना जिपच्या राजकारणात साथ देणारे , राजाभाऊ राऊत, प्रशांत परिचारक, विजयराज डोंगरे ,,यांना तर त्यांचे पासून बरोबर बाजूला केलेच मात्र त्यांचे कट्टर विरोधक श्री विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपात आणून यशस्वी चाल खेळली आजच्या घडीला त्यांच्याकडे त्यांचे बंधू बबनराव शिंदे हे सोडले तर मनापासून काम करणारा कोणताही नेता उरलेला दिसत नाही . . रश्मी बागल विधानसभेत झालेला पराभव सहजासहजी विसरतील असे वाटत नाही . करमाळ्यातून लिड द्यावे तर पुढे विधानसभला परत शिंदे कुटूंबातील कुणीतरी उभे राहण्याची भीती सतावत असणार? दीपकआबा साळुंखे यांचा विधान परिषदेत झालेला पराभवाचे मेन सुत्रधार कोण होते व पराभव कुणामुळे झाला हे त्यांनाही चांगले ठाऊक अाहे. त्यामुळे ते मनापासून काम करतील असे नाही (मुळात त्यांना किती जनाधार हा ही संशोधनाचा विषय)
या तुलनेने कमी वयात व स्वकर्तृत्वाने रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उदयाला आलेले आहेत. . वडिल जरी काही काळ शिवसेनेचे खासदार होते तरीदेखील त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने व धडाडीमुळे स्वराज्य उद्योगसमूहाची स्थापना करून आपल्या कामाची सुरूवात केलेली दिसून येते . . .
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण, माण खटाव व कोरेगाव भागातील जनसंपर्क व कामामुळे जास्तीचे लिड मिळण्याची शक्यता जास्त आहे व त्याच प्रमाणे त्यांचे भाजपा सेनेतील जुने सहकारी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे . .
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माण खटाव भागातून जास्तीचे सहकार्य मिळू शकते कारण पवार साहेबांनी देशमुख साहेबांना राजकारणात आणून गोरे बंधू यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेही दुखावले गेले आहेत, त्याचप्रमाणे अनिल देसाई व दिलीप येळगावकर यांचीही रसत नाईक निंबाळकर यांना मिळण्याची शक्यता आहे .
माळशिरसचा गेल्या १० वर्षातील इतिहास जगजाहीर आहे , वेळोवेळी मोहिते पाटील यांना डावलने त्रास देणे, मोहिते पाटलांचे विरोधात सातत्याने पक्षातूनच काही मंडळींना ताकद देऊन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणे मोहिते पाटलांच्या विरोधात निवडणूक जाहीर होण्याला अवधी असताना प्रभाकर देशमुख व दिपक साळुंखे यांना आघाडी उघडायला लावून, विरोध करायला लावून सातत्याने त्रास देण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केले आहे , मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत असूनही मोहिते पाटील यांचे तालुक्यातील विरोधक यांनाही बळ देण्याचे रसद पुरवण्याचे काम पक्ष नेतृत्वाने केले त्यामुळे नाईलाजाने मोहिते पाटील कुटुंबाने होणार्या कुचंबणेला कंटाळून पक्ष सोडला . .
त्यामुळे गेली दहा वर्ष शांत असणारा मोहिते पाटील यांचा गट कमालीचा चवताळला असून जिल्ह्यातील आपआपसातील सर्व मतभेद विसरून विजयसिंह दादांनी व रणजितसिंह दादांनी सर्वांची मोट बांधण्याचे काम केले आहे . मोहिते पाटील यांचेवरील अन्यामुळे राष्ट्रवादी विरोधात मोठ्याप्रमाणात सहानुभूतीची लाट माळशिरस तालुक्यात व परिसरात निर्माण झाली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यातुनही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल या सर्व गोष्टींना , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचेही पुर्णपणे पाठबळ आहे . .
मोहिते पाटील यांच्या मुळे राष्ट्रवादीसाठी सेफ असणारा मतदारसंघ जवळ जवळ राष्ट्रवादीच्या हातातून निसटला आहे असेच दिसते . .
आज भाजपाला विविध तालुक्यात वजनदार असणारे नेते जावून मिळत आहेत. यात जगताप गट, सविताराजे भोसले गट, नारायण पाटील गट, कल्याण काळे गट, राजू बापु पाटील गट, परिचारक गट, शहाजीबापू , श्रीकांत देशमुख, गोरे बंधू या सर्वांची ताकद व मोहिते पाटलांची प्रत्येक तालुक्यातील शक्ती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठिशी एकत्रितपणे उभी रहाताना दिसत आहे . . त्यामुळे आजच्या घडीला या दोन तुल्यबळ उमेदवारातील लढतीचे पारडे निंबाळकर यांच्याकडे झुकल्या सारखे वाटते. निवडणूकीचा आजच्या घडीला घेतलेला लेखाजोखा !
लेखक. . . विजयकाका पिसाळ नातेपुते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा